ETV Bharat / city

कोरोना अपडेट : धारावीत ७४२, दादरमध्ये १०८३ तर माहीममध्ये १२५९ सक्रिय रुग्ण - dadar corona update

आज(3 एप्रिल) दादरमध्ये नवे ९२ रुग्ण आढळून आले असून सक्रिय रुग्णांची संख्या १०८३ वर तर माहीममध्ये १०५ नवे रुग्ण आढळून आल्याने सक्रिय रुग्णांची संख्या १२५९ वर पोहचली आहे.

mumbai corona
मुंबई कोरोना अपडेट
author img

By

Published : Apr 3, 2021, 8:04 PM IST

मुंबई - आशिया खंडातील सर्वात मोठी झोपडपट्टी म्हणून धारावीची ओळख आहे. या धारावीत आटोक्यात आलेल्या कोरोनाने पुन्हा डोके वर काढले आहे. मागील काही दिवसांपासून येथील कोरोना रुग्णांची आकडेवारी वाढत आहे. धारावीत आज(३ एप्रिल) ७४ नवे रुग्ण आढळून आल्याने सक्रिय रुग्णांची संख्या ७४२ वर गेली आहे. दादरमध्ये नवे ९२ रुग्ण आढळून आले असून सक्रिय रुग्णांची संख्या १०८३ वर तर माहीममध्ये १०५ नवे रुग्ण आढळून आल्याने सक्रिय रुग्णांची संख्या १२५९ वर पोहचली आहे.

धारावीत ७४२ अ‌ॅक्टिव्ह रुग्ण -

कोरोना धारावीतून हद्दपार होणार अशी स्थिती असतानाच फेब्रुवारीच्या मध्यापासून पुन्हा रुग्णसंख्या वाढू लागली आहे. २ फेब्रुवारीला मुंबईत दिवसभरात ३३४ रुग्ण आढळून आले होते. ही रुग्णसंख्या आज ३ एप्रिल रोजी ९०९० वर पोहचली आहे. धारावीतही काही दिवसांपासून कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होऊ लागली आहे. धारावीत ८ मार्चला दिवसभरात १८ रुग्ण आढळले होते. त्यानंतर सतत रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. १८ मार्चला ही रुग्णसंख्या ३० वर पोहचली होती. आज धारावीत ७४ नवे रुग्ण आढळून आले आहेत. धारावीत आतापर्यंत एकूण ५१३२ रुग्ण आढळून आले आहेत. त्यापैकी ४०७३ रुग्णांनी कोरोनावर मात केली असून ७४२ अ‌ॅक्टिव्ह रुग्ण आहेत.

हेही वाचा - मुंबईत कोरोनावाढीचा नवा उच्चांक.. दिवसभरात 9 हजार 90 नवे रुग्ण, 27 रुग्णांचा मृत्यू

माहीममध्ये १२५९ सक्रिय रुग्ण -

मुंबई महापालिकेच्या जी नॉर्थ विभागाच्या हद्दीत धारावी, दादर, माहीम हे विभाग येतात. धारावी प्रमाणेच दादर आणि माहिममध्येही रुग्णसंख्या वाढत आहे. दादरमध्ये आज ९२ तर आतापर्यंत ६३७६ रुग्ण आढळून आले आहेत. त्यापैकी ५१२७ रुग्णांनी कोरोनावर मात केली असुन १०२० ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. माहीममध्ये आज १०५ रुग्ण तर आतापर्यंत ६५१२ रुग्ण आढळून आले आहेत. त्यापैकी ५०९८ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. तर १२५९ अ‌ॅक्टिव्ह रुग्ण आहेत.

धारावीत सहावेळा शून्य रुग्ण -

मुंबईत गेल्यावर्षी मार्च महिन्यात कोरोनाचा प्रसार सुरू झाला. दाटीवाटीने असलेली घरे, सार्वजनिक शौचालय यामुळे धारावी कोरोनाचा हॉटस्पॉट झाली होती. धारावीत १ एप्रिलला पहिला रुग्ण आढळून आल्यापासून ट्रेसिंग, ट्रॅकिंग, टेस्टिंग आणि ट्रिटिंग या चार टी मॉडेल, धारावी पॅटर्न, मिशन झिरो आणि धारावीकरांनी दिलेली साथ यामुळे कोरोनाचा प्रसार रोखण्यात पालिकेला यश आले होते. जुलै ऑगस्टनंतर धारावीतील दोन अंकी असलेली रुग्णसंख्या आणि ऍक्टिव्ह रुग्णांची संख्या एक अंकावर आली होती. २४ डिसेंबर, २२ जानेवारी, २६ जानेवारी, २७ जानेवारी, ३१ जानेवारी, २ फेब्रुबारी या सहा दिवसात धारावीत शून्य रुग्णांची नोंद झाली आहे.

हेही वाचा - टीका करणे सोपे, पण उद्धव ठाकरे होणे अवघड; आव्हाडांचे फडणवीसांना प्रत्युत्तर

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.