ETV Bharat / city

मुंबई: स्थायी समितीमध्ये ५० टक्के प्रस्ताव राखून ठेवले, भाजपाकडून बॅनरबाजी

मुंबई महापालिकेच्या स्थायी समितीच्या आजच्या शेवटच्या सभेत सुमारे २०० प्रस्ताव मंजुरीसाठी सादर करण्यात आले होते. त्यापैकी ५० टक्के म्हणजेच, ९७ टक्के प्रस्ताव राखून ठेवण्यात आले आहेत. पालिकेचा कार्यकाळ संपण्याच्या शेवटच्या दिवशी म्हणजेच, ७ तारखेला स्थायी समितीची बैठक आयोजित करण्यात आली आहे.

proposals retained Standing Committee BMC
मुंबई महापालिका स्थायी समिती बैठक
author img

By

Published : Mar 2, 2022, 6:54 PM IST

मुंबई - मुंबई महापालिकेच्या स्थायी समितीच्या आजच्या शेवटच्या सभेत सुमारे २०० प्रस्ताव मंजुरीसाठी सादर करण्यात आले होते. त्यापैकी ५० टक्के म्हणजेच, ९७ टक्के प्रस्ताव राखून ठेवण्यात आले आहेत. पालिकेचा कार्यकाळ संपण्याच्या शेवटच्या दिवशी म्हणजेच, ७ तारखेला स्थायी समितीची बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीत आता हे प्रस्ताव मंजुरीला येणार आहेत. दरम्यान आजच्या बैठकीत भाजपाकडून बॅनरबाजी करण्यात आली.

माहिती देताना भाजप गटनेते आणि स्थायी समिती अध्यक्ष

हेही वाचा - No immediate relief to Nawab Malik : नवाब मलिकांना कोणताही तातडीचा दिलासा नाही, सोमवारी होणार सुनावणी

विशेष कॅगद्वारे ऑडिट करा -

मुंबई महानगरपालिकेची आज शेवटची स्थायी समिती सभा आयोजित करण्यात आली होती. आजच्या सभेसमोर मुंबईमधील विकासकामांचे १७९ नव्याने तर, याआधीच्या सभेतील काही प्रस्ताव असे एकूण सुमारे २०० प्रस्ताव मंजुरीसाठी सादर करण्यात आले होते. आजची स्थायी समितीची सभा अडीच वाजण्याच्या दरम्यान सुरू होऊन साडेतीन वाजता एका तासांत आटोपण्यात आली.

बैठकीत २०० पैकी ९७ प्रस्ताव मंजूर न करता राखून ठेवण्यात आले आहेत. यावर बोलताना जे प्रस्ताव चुकीचे आले आहेत, त्यावर प्रश्न उपस्थित करून उत्तरे घ्यावीत, अशी भूमिका भाजपाची आहे. गेले २ वर्षे पालिकेच्या भ्रष्टाचारावर आवाज उचलत आहोत. कोविड काळात ३ हजार ८०० कोटींचा खर्च करण्यात आला. त्यावर विशेष कॅगद्वारे ऑडिट करावे, अशी मागणी आम्ही केली आहे. यावर भाजपा सतत आवाज उचलत आला असल्याची माहिती भाजपचे गटनेते प्रभाकर शिंदे यांनी दिली.

पुढच्या बैठकीत प्रस्ताव मंजुरीसाठी -

सर्वांना बोलायला मिळावे म्हणून हे प्रस्ताव राखून ठेवण्यात आले आहेत. सर्वच प्रस्ताव महत्वाचे असतात. मुंबईकरांच्या हिताचे प्रस्ताव असतात. त्यांना मंजुरी देणे हे स्थायी समितीचे काम असते. पुढील बैठक ७ मार्चला आयोजित करण्यात आली असून, या बैठकीत प्रस्तावांना मंजूर केले जातील, अशी माहिती स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी दिली.

भाजपकडून बॅनरबाजी, घोषणाबाजी -

आज झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत भाजपकडून बॅनरबाजी करण्यात आली. शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी तसेच, समाजवादी पक्ष मिळून खाऊ खात असल्याचा भाजपकडून आरोप करण्यात आला. तसेच, सभा संपल्यावर घोषणाबाजी करण्यात आली.

हेही वाचा - Devendra Fadnavis on Maharashtra assembly session : देवेंद्र फडणवीस म्हणतात, माझी पत्रकार परिषद, मीच बोलणार!

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.