ETV Bharat / city

12 to 14 Years Boys Vaccination : मुंबईत 12 ते 14 वयोगटातील लसीकरणाला सावळ्या गोंधळात सुरुवात - 12 to 14 Years Boys Vaccination Started

मुंबईमध्ये 12 ते 14 वयोगटातील लहान मुलांचे आजपासून लसीकरण सुरू ( Mumbai 12 to 14 Years Boys Vaccination ) करण्यात आले आहे. या लसीकरणासाठी मुंबई महानगरपालिका आणि राज्य सरकारच्या 12 रुग्णालयांमध्ये लसीकरणाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. लसीकरण दुपारी बारा वाजल्यापासून सुरू केले जाईल असे सांगण्यात आले होते.

12 to 14 Years Boys Vaccination
मुंबईत 12 ते 14 वयोगटातील लसीकरणाला सुरुवात
author img

By

Published : Mar 16, 2022, 2:27 PM IST

Updated : Mar 16, 2022, 5:22 PM IST

मुंबई - मुंबईमध्ये गेले वर्षभर कोरोना प्रतिबंधक लसीकरण सुरु आहे. त्याचाच एक भाग म्हणून आजपासून देशभरात १२ ते १४ वयोगटातील लसीकरणाला सुरुवात ( Mumbai 12 to 14 years Boys Vaccination ) झाली. मुंबईमध्येही आजपासून या वयोगटातील लसीकरण सुरु ( 12 to 14 Years Boys Vaccination Started ) झाले. १२ केंद्रांपैकी काही केंद्रांवर लसीकरण करण्यात आले तर राजावाडी सारख्या रुग्णालयात लसीकरण उशिरा सुरु झाले आहे. यामुळे दिड ते दोन तास लसीकरणासाठी आलेल्या मुलांना आणि त्यांच्या पालकांना ताटकळत राहावे लागले.

मुंबईत 12 ते 14 वयोगटातील लसीकरणाला सुरुवात

१२ ते १४ वयोगटातील मुलांचे लसीकरण -

केंद्र सरकारच्या निर्देशानुसार, बृहन्मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रात १६ जानेवारी, २०२१ पासून कोरोना आजारासाठी प्रतिबंधात्मक लसीकरण सुरू करण्यात आले आहे. या लसीकरण मोहीमेत सुरुवातीला आरोग्य कर्मचारी, फ्रंट लाईन वर्कर, ६० वर्षांवरील वयोवृद्ध, ४५ वर्षांवरील आजार असलेले नागरिक, त्यानंतर १ मे, २०२१ पासून १८ वर्षे वयावरील सर्व नागरिकांचे आणि ३ जानेवारी, २०२२ पासून १५ वर्षे वयावरील सर्व नागरिकांचे लसीकरण करण्यात येत आहे. याचाच पुढील भाग म्हणून आजपासून १२ वर्ष पूर्ण ते १४ वर्षे वयोगटातील लाभार्थ्‍यांचे १२ केंद्रांवर कोरोना लसीकरण करण्‍याचे महापालिकेने घोषित केले.

यामुळे झाला लसीकरणाला उशीर -

मुंबई महापालिकेच्या १२ लसीकरण केंद्रांवर आज लसीकरण करण्यासाठी सकाळी ११.३० पासून पालक आणि लहान मुले आली. मात्र कोवीन ऍपवर स्लॉट मिळत नव्हता. त्यातच पालिकेच्या आरोग्य विभागाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दुपारी १ वाजता व्हिडीओ कॉन्फरन्सिंग झाल्याशिवाय लसीकरण सुरु नका असा संदेश दिला. या व्हिडिओ कॉन्फरन्सिंगमध्ये आरोग्य कर्मचाऱ्यांना लसीकरण कसे करावे याच्या सूचना दिल्या जाणार होत्या. ही व्हिडिओ कॉन्फरन्सिंग दुपारी २ च्या दरम्यान संपली त्यानंतर राजावाडी सारख्या काही केंद्रांवर लसीकरण करण्यात आले. तर बीकेसी कोविड सेंटरमध्ये उपस्थित असलेल्या मुलांना व्हिडिओ कॉन्फरन्सिंगची वाट न बघताच लसीकरण करण्यात आल्याचे समजते. यामुळे १२ ते १४ वयोगटातील मुलांचे आज पाहिल्याच दिवासाचे लसीकरण सावळा गोंधळात सुरु झाल्याचे पाहायला मिळाले.

हेही वाचा - Raghunath Kuchik Case : पुण्यातील 'ती' बेपत्ता तरुणी गोव्यात सापडली; इंजेक्शन देऊन पळवल्याचा चित्रा वाघ यांचा आरोप

Last Updated : Mar 16, 2022, 5:22 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.