ETV Bharat / city

सीएएच्या अंमलबजावणीचा देशातील मुस्लिमांना कोणताही धोका नाही - mukhattar abbas nakvi

मुस्लिमांचा धर्म, आचार-विचार आणि ओळख पुसून टाकण्याचा हा प्रयत्न असल्याचा अपप्रचार काही लोक करत आहे. मात्र त्याला देशातील जनता अजिबात भुळणार नाही, असे केंद्रीय मंत्री मुख्तार अब्बास नकवी म्हणाले. शनिवारी एनआरसीच्या विषयावर देशव्यापी जनजागरण अभियानासाठी ते मुंबईत आले होते.

mukhattar abbas nakvi
मुख्तार अब्बास नकवी
author img

By

Published : Dec 29, 2019, 4:37 AM IST

मुंबई - सुधारित नागरिकत्व कायद्याच्या अंमलबजावणीमुळे देशातील मुस्लिमांवर कोणताही परिणाम होणार नाही. मुस्लिमांचा धर्म, आचार-विचार आणि ओळख पुसून टाकण्याचा हा प्रयत्न असल्याचा अपप्रचार काही लोक करत आहे. मात्र त्याला देशातील जनता अजिबात भुळणार नाही, असे केंद्रीय मंत्री मुख्तार अब्बास नकवी म्हणाले. शनिवारी एनआरसीच्या विषयावर देशव्यापी जनजागरण अभियानासाठी ते मुंबईत आले होते. यावेळी पत्रकारांशी बोलताना त्यांनी हे स्पष्टीकरण दिले आहे.

सीएएच्या अंमलबजावणीचा देशातील मुस्लीमांना कोणताही धोका नाही

देशातील मुस्लीम बांधव मजबुरी म्हणून नाही तर पूर्ण मजबुतीने सुरक्षित आयुष्य जगत असल्याचे ते म्हणाले. त्यासोबतच या विषयावर विरोधक आणि बकवास ब्रिगेडचा बोगस बॅशिंगचा बाजार लवकरच बंद होणार असल्याचे सांगत मुख्तार अब्बास नकवी यांनी विरोधकांवर प्रहार केला. हा कायदा कुणाही व्यक्तीचे नागरिकत्व हिरावून घेण्यासाठी नाही. तर देशाबाहेरून देशात येण्यासाठी तडफडणाऱ्या बांधवाना दिलासा देणारा कायदा आहे. सीएए, एनआरसीनंतर एनपीआर बाबतही समाजाच्या एका वर्गात भीती निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. असत्य कथन करून सत्य झाकण्याचा हा प्रयत्न असल्याचेही ते म्हणाले.

पंतप्रधानांनी एनआरसीबाबत मांडलेली भूमिका योग्यच

दिल्लीतील रामलीला मैदानातील रॅलीला संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एनआरसीच्या राष्ट्रव्यापी अंमलबजावणीबाबत अजून कॅबिनेटमध्ये काहीच ठरवण्यात आलेले नसल्याचे वक्तव्य केले होते. नकवी यांनी पंतप्रधान यांचे हे विधान योग्य असल्याचे म्हटले आहे. एनआरसीची प्रक्रिया 1951 पासून सुरू झाली असून सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार ती आसाम राज्यात राबविण्यात आली होती. मात्र इतर कोणत्याही राज्यात ती राबावण्याबाबत काहीही ठरलेले नाही. हेच सत्य पंतप्रधानांनी पुन्हा सांगितल्याचे नकवी यांनी स्पष्ट केले.

सरसंघचालक सर्व भारतीय 'हिंदी' आहेत म्हणाले 'हिंदू' नाही

सरसंघचालक मोहन भागवत यांनी या देशात राहणारे सर्व भारतीय हे हिंदूच असल्याचे वक्तव्य केले होते. त्यावर बोलताना नकवी यांनी भारतीय मुसलमान हज यात्रेला जातात तेव्हा आम्हाला इतर देशातील मुसलमान 'हिंदी' अशीच हाक मारतात. त्यावर कुणीही आक्षेप घेत नाही. त्यामुळे वेगवेगळ्या जातीत आणि धर्मात आपण जन्माला आलो असलो तरीही आपण सारे हिंदीच आहोत. त्यामुळे सरसंघचालकानी काहीही चुकीचे म्हटले असे मला तरी वाटत नसल्याचे नकवी म्हणाले.

आंदोलनाच्या नावाखाली सर्वसामान्य लोकांवर अत्याचार होत असेल तर ते चुकीचे

एनआरसी आणि सुधारित नागरिकत्व कायद्याच्या अंमलबजावणीवरून देशभर सुरू असलेल्या आंदोलनात काही जण नाहक भरडले जात आहेत. उत्तरप्रदेश आणि हरियाणा येथे झालेल्या आंदोलनात काही जणांचा मृत्यू झाला आहे. याबाबत बोलताना विनाकारण रस्त्यावर येऊन आंदोलन करून सार्वजनिक मालमत्तेच नुकसान कुणी करत असेल तर त्याच्यावरील कारवाई योग्यच आहे. मात्र या आंदोलनाच्या अडून कुणी गैरफायदा घेण्याचा प्रयत्न करत असेल तर त्याच्यावर कारवाई करायला हवी. पोलिसांनी काही प्रसंगात अधिकाराचा गैरवापर केल्याचे निदर्शनास आल्यास त्याच्यावर देखील कारवाई होईल.

Intro:सुधारित नागरिकत्व कायद्याच्या अंमलबजावणीमुळे देशातील मुसलमनावर कोणताही परिणाम होणार नाही. त्याचा धर्म, आचार विचार आणि ओळख पुसून टाकण्याचा हा प्रयत्न असल्याचा अपप्रचार काही लोक करत असून त्याला देशातील जनता अजिबात भुळणार नाही असं केंद्रीय मंत्री मुख्तार अब्बास नकवी यांनी सांगितलं. आज एनआरसीच्या विषयावर देशव्यापी जनजागरण अभियानासाठी ते मुंबईत आले होते. यावेळी पत्रकारांशी बोलताना त्यानी हे स्पष्टीकरण दिल आहे.

देशातील मुसलमान मजबुरी म्हणून नाही तर पूर्ण मजबुतीने सुरक्षित आयुष्य जगत असल्याची ग्वाही त्यांनी दिली. त्यासोबतच या विषयावर विरोधक आणि बकवास ब्रिगेडचा बोगस बॅशिंग बाजार लवकरच बंद होईल अस देखील त्यांनी स्पष्ट केलं.

हा कायदा कुणाकडूनही त्याच नागरिकत्व हिरावून घेण्यासाठी नसून उलट भारत देशाबाहेरून देशात येण्यासाठी तडफडणारर्या बांधवाना दिलासा देणारा कायदा आहे. सीएए एनआरसीनंतर एनपीआर बाबतही समाजाच्या एका वर्गात भीती निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात असून असत्य कथन करून सत्य झाकण्याचा हा प्रयत्न असल्याचं त्यांनी सांगितलं.

पंतप्रधानांनी एनआरसी बाबत मांडलेली भूमिका योग्यच

दिल्लीतील रामलीला मैदानातील रॅलीला संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एनआरसीच्या राष्ट्रव्यापी अंमलबजावणीबाबत अजून कॅबिनेट मध्ये काहीच ठरवण्यात आलेलं नसल्याचं वक्तव्य केले हॊते. नकवी यांनी पंतप्रधान यांचं हे विधान योग्य असल्याचं म्हटलंय. एनआरसीची प्रक्रिया 1951 पासून सुरू झाली असून सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार ती आसाम राज्यात राबविण्यात आली होती. मात्र इतर कोणत्याही राज्यात ती राबावण्याबाबत काहीही ठरलेले नाही हेच सत्य पंतप्रधानांनी पुन्हा सांगितल्याचे नकवी यांनी स्पष्ट केलं.

सरसंघचालक सर्व भारतीय 'हिंदी' आहेत म्हणाले 'हिंदू' नाही

सरसंघचालक मोहन भागवत यांनी या देशात राहणारे सर्व भारतीय हे हिंदूच असल्याचं वक्तव्य केले होते. त्यावर बोलताना नकवी यांनी भारतीय मुसलमान हज यात्रेला जातात तेव्हा आम्हाला इतर देशातील मुसलमान 'हिंदी' अशीच हाक मारतात. त्यावर कुणीही आक्षेप घेत नाही. त्यामुळे वेगवेगळ्या जातीत आणि धर्मात आपण जन्माला आलो असलो तरीही आपण सारे हिंदीच आहोत. त्यामुळे सरसंघचालकानी काहीही चुकीचे म्हटलं असे मला तरी वाटत नाही अस नकवी म्हणाले.

आंदोलनाच्या नावाखाली सर्वसामान्य लोकांवर अत्याचार होत असेल तर ते चुकीचं

एनआरसी आणि सुधारित नागरिकत्व कायद्याच्या अंमलबजावणीवरून देशभर सुरू असलेल्या आंदोलनात काही जण नाहक भरडले जात आहेत. उत्तरप्रदेश आणि हरियाणा येथे झालेल्या आंदोलनात काही जणांचा मृत्यू झाला आहे. याबाबत बोलताना विनाकारण रस्त्यावर येऊन आंदोलन करून सार्वजनिक मालमत्तेच नुकसान कुणी करत असेल तर त्याच्यावरील कारवाई योग्यच आहे. मात्र या आंदोलनाच्या अडून कुणी गैरफायदा घेण्याचा प्रयत्न करत असेल तर त्याच्यावर कारवाई करायला हवी. पोलिसांनी काही प्रसंगात अधिकाराचा गैरवापर केल्याचे निदर्शनास आल्यास त्याच्यावर देखील कारवाई होईल.

Body:.

Conclusion:.
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.