मुंबई - मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर सापडलेल्या स्कॉर्पिओ गाडीतील स्फोटकांच्या संदर्भात एटीएसकडून तपास केला जात असताना या स्कॉर्पिओ गाडीतून बाहेर आलेल्या एका व्यक्तीचा फोटो समोर आला आहे. पीपीई किट घालून हा व्यक्ती इमारतीच्या परिसरात फिरत असल्याचे समोर आलेा आहे. सध्या एटीएस या व्यक्तीचा शोध घेत आहे. दरम्यान एटीएस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार सदरची ही व्यक्ती जिलेटिन स्फोटकांनी भरलेल्या स्कॉर्पिओ गाडीचा चालक असल्याचा संशय वर्तविण्यात येत आहे. अद्याप या व्यक्तीची ओळख पटलेली नसून त्या संदर्भात तपास सुरू आहे.
सविस्तर वृत्त थोड्याच वेळात.