नवी मुंबई - पोटच्या दहा दिवसांच्या मुलीची अवघ्या अडीच लाखांत विक्री करण्याचा प्रयत्न (Mother tried to sold her ten-day-old daughter in Navi Mumbai) करणाऱ्या मातेसह चार आरोपींना नवी मुंबई (Navi Mumbai) पोलिसांनी गजाआड केले आहे. एनआरआय पोलीस ठाण्याच्या (NRI Police Station) पथकाने सापळा रचून ही कारवाई केली आहे.
पोलिसांना मिळाली गुप्त माहिती
नवी मुंबईतील उलवे सेक्टर 20 मध्ये एक महिला आपल्या पोटच्या 10 दिवसांच्या मुलीला अडीच लाखाचा विकणार असल्याची माहिती पोलिसांना गुप्त बातमीदारांच्या मार्फत मिळाली. माहिती मिळताच एनआरआय पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र पाटील यांच्या टीमने सापळा रचून मुलीच्या आईसह आणखी चार आरोपींना ताब्यात घेतले.
आईनेच केला अडीच लाखात मुलीचा सौदा
दहा दिवसांच्या बाळाची विक्री होणार असल्याची माहिती पोलिसांना मिळताच पोलिसांनी सापळा रचला. बाळाच्या आईसह चार जणांना ताब्यात घेतले. चौकशीअंती, रीतसर दत्तक घेण्याची कोणतीही प्रक्रिया पोलिसांना आढळली नाही. शिवाय नवजात बालकांची अनधिकृरीत्या विक्री (Unauthorized sale of newborns) होणार असल्याचे निष्पन्न देखील झाले. पोलिसांनी आईसह चौघांना अटक केले असता, आरोपींकडून 4 मोबाईल, पॅनकार्ड आणि पन्नास हजार रुपयांचे पाच बंडल असा मुद्देमाल हस्तगत करण्यात केला. सौदा होणारे बाळ व बाळाच्या आईला भिवंडीच्या बाल कल्याण समितीकडे हजर करण्यात येणार असल्याचे पोलीस उपायुक्त विवेक पानसरे (Vivek Pansare) यांनी सांगितले.
Mother Sold Daughter In Mumbai : माता न तू वैरिणी! पोटच्या दहा दिवसांच्या मुलीचा अडीच लाखात सौदा, मातेसह चार आरोपी गजाआड - Vivek Pansare
पैशांच्या हव्यासापोटी स्वतःच्याच दहा दिवसांच्या चिमुरडीची अडीच लाख रुपयांना विक्री करण्याचा प्रयत्न (Mother tried to sold her ten-day-old daughter) नवी मुंबईतील (Navi Mumbai) एका आईने केला. याप्रकरणी एनआरआय पोलीस (NRI Police Station) ठाण्याच्या पथकाने सापळा रचून या निर्दयी आईसह आणखी चौघा आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत.