मुंबई मुंबादेवी परिसरात एका वृद्ध महिलेला मारहाण केल्याची घटना समोर ( MNS activists Beating Woman ) आली. ही घटना दोन दिवसापूर्वी असल्याची माहिती मिळत आहे. गणेशोत्सवासाठी उभारण्यात येणाऱ्या बॅनरच्या वादातून ही मारहाण झाली आहे. मारहाणीचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर ( Mumbadevi viral video ) व्हायरल होत आहे. या वृद्ध महिलेचे मुंबादेवी परिसरामध्ये औषधाचे दुकान आहे. या दुकानाच्या बाहेर बॅनर लावण्याच्या वादावरून एका महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांने या वृद्ध महिलेला मारहाण केली. याबाबत आता पोलिसांनी कारवाई केली.
नागपाडा पोलिसांनी मारहाण करणाऱ्या मनसे कार्यकर्ते विनोद अरगिले, विनोद अरगिले आणि सतीश लाड यांना ताब्यात घेतले. पोलिसांकडून याबाबत कलम सात अंतर्गत 323 337 506 509 आणि 504 अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. तसेच याबाबत पुढील तपास पोलिसांकडून ( Controversy over Ganpati banner Mumbadevi ) सुरू करण्यात आला आहे.
महिलेला कार्यकर्त्यांची मारहाण महिलेने शिवीगाळ केल्याचा आरोप महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उपविभाग प्रमुख विनोद अरगिले ( MNS leader Vinod Argile ) त्यांच्याकडून वृद्ध महिलेला मारहाण झाली आहे. मुंबादेवी परिसरात राहत असलेल्या वृद्ध महिलेशी सार्वजनिक गणेश उत्सवासाठी मंडप उभारताना वृद्ध महिलेच्या मेडिकल्स खड्डा खोदत असल्याच्या वादातून हा प्रकार घडला. यावेळी वृद्ध महिलेने घाणेरड्या शिव्या दिल्या. त्यामुळेच आपल्या हातून वृद्धेला मारहाण झाली असल्याचे मनसे कार्यकर्ते सांगतात. तसेच यावेळी वृद्ध महिलेने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या बाबतही आक्षेपाहार्य वक्तव्य केले असल्याचा आरोपी मनसे कार्यकर्त्यांकडून करण्यात आला आहे. पण महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या तीन कार्यकर्त्यांना या घटनेनेनंतर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
हेही वाचा Chief Minister Eknath Shinde visit उद्धव ठाकरेंचे निकटवर्तीय असलेल्या मिलिंद नार्वेकरांच्या घरी मुख्यमंत्र्यांनी दिली भेट, कारण...