ETV Bharat / city

बेस्टला चार वर्षात २ हजार ४९० कोटींचा नफा असताना युनिटचे दर का वाढविले?- संदीप देशपांडे

author img

By

Published : Nov 30, 2020, 3:08 PM IST

Updated : Nov 30, 2020, 3:27 PM IST

मनसे नेते संदीप देशपांडे यांनी वीज दरवाढीवरून प्रशासनावर सडकून टीका केली आहे. ते म्हणाले, की बेस्टने एमएआरसीकडून खर्च वाढला अस सांगून वीजेच्या युनिटचे दर वाढवून घेतले आहेत. बेस्ट विद्युत विभागाने कामगारांना त्यांची थकबाकी दिली नाही. बेस्टच्या सबस्टेशनची दुरुस्ती केली नाही. मग यांना खर्च कोणता आहे?

संदीप देशपांडे
संदीप देशपांडे

मुंबई - वीज दरवाढीविरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेना आक्रमक झाली आहे. बेस्ट इलेक्ट्रिकल व्यवस्थापनने गेल्या चार वर्षात २ हजार ४९० कोटी रुपयांचा नफा मिळविला आहे. मग युनिटचे दर का वाढले जात आहेत,असा प्रश्न मनसे नेते संदीप देशपांडे यांनी उपस्थित केला आहे.

मनसे नेते संदीप देशपांडे यांनी वीज दरवाढीवरून प्रशासनावर सडकून टीका केली आहे. ते म्हणाले, की बेस्टने एमएआरसीकडून खर्च वाढला अस सांगून वीजेच्या युनिटचे दर वाढवून घेतले आहेत. बेस्ट विद्युत विभागाने कामगारांना त्यांची थकबाकी दिली नाही. बेस्टच्या सबस्टेशनची दुरुस्ती केली नाही. मग यांना खर्च कोणता आहे? हे सर्व खोटे सुरू आहे. बेस्ट विद्युत विभाग असे का करत आहे? इतर खासगी विद्युत कंपन्या काय करत असतील याचा विचार करावा लागेल. बेस्टने खोटा खर्च दाखविला आहे. बेस्ट महाव्यवस्थापकांनी राजीनामा द्यावा, अशी त्यांनी मागणी केली.

मनसे नेते संदीप देशपांडे

हेही वाचा-१ हजार ८८७ कोटी तुटीच्या अर्थसंकल्पाला बेस्ट समितीची मंजुरी

सर्व कंपन्यांवर सरकारने फसवणुकीचा गुन्हा दाखल करावा-

पुढे देशपांडे म्हणाले, की सरकारने सर्व वीज कंपन्यांवर ऑडिटर नेमावा. ग्राहकांचे अतिरिक्त पैसे परत दिले पाहिजे. उर्जामंत्र्यानी याचे उत्तर द्यावे. सर्व कंपन्यांवर सरकारने फसवणुकीचा गुन्हा दाखल करावा. सरकारला एक वर्ष पूर्ण झाले. हे जे रात्रीचे खेळ झाले याबाबत सध्या फक्त चर्चा सुरू आहे. सध्या फक्त एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करण्याचे काम सुरू आहे. बेस्ट २०१६ पासून २ हजार ४९० कोटींचा नफा कमविला आहे. मग, मार्च महिन्यात बेस्टला दरवाढ का मिळाली?

हेही वाचा-वीज दरवाढीच्या निषेधार्थ स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे आंदोलन

काही दिवसांपूर्वी मनसे राज्यभरात वीज बिलमाफीसाठी राज्यभरात आंदोलन केले होते. तर जनेतेने वीज बिल भरू नये, असे मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आवाहन केले होते.

Last Updated : Nov 30, 2020, 3:27 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.