ETV Bharat / city

'मेट्रो 2 ब'मधून कुर्ला मेट्रो स्थानक वगळले, नागरिकांच्या सूचना-हरकती न मागवता आराखड्यात बदल

author img

By

Published : Sep 16, 2020, 7:44 PM IST

डी एन नगर ते मंडाले मेट्रो 2ब प्रकल्प एमएमआरडीएकडून उभारण्यात येत आहे. या मेट्रो मार्गाच्या आराखड्यात कुर्ला मेट्रो स्थानकाचा समावेश होता. पण आता मात्र हे स्थानक मेट्रो 2 ब मधून वगळण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. माहिती अधिकार कार्यकर्ते अनिल गलगली यांनी ही माहिती दिली आहे. गलगली यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि महानगर आयुक्त आर. ए. राजीव यांना पत्र लिहून याविषयी तक्रार केली आहे.

mmrda excluded kurla metro station from metro 2B in mumbai
'मेट्रो 2 ब'मधून कुर्ला मेट्रो स्थानक वगळले

मुंबई - डी एन नगर ते मंडाले मेट्रो 2 ब प्रकल्पाचे काम मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (एमएमआरडीए)कडून वेगात सुरू आहे. या मेट्रो मार्गामुळे मुंबईकरांना दिलासा मिळणार आहेच. पण त्याचवेळी कुर्ला येथे मेट्रो स्थानक येणार असल्याने हा कुर्लावासीयांसाठी मोठा दिलासा मानला जात होता. पण आता मात्र कुर्लावासीयांच्या पदरी निराशा पडली आहे. कारण मेट्रो 2 ब मधून कुर्ला मेट्रो स्थानक वगळण्यात आले आहे. धक्कादायक बाब म्हणजे हा बदल आराखड्यात करताना एमएमआरडीएने कुर्लावासीयांना विचारात घेतलेले नाही की यावर सूचना-हरकती मागवलेल्या नाहीत. त्यामुळे एमएमआरडीएच्या या मनमानी कारभारावर नाराजी व्यक्त होत आहे.

'मेट्रो 2 ब'मधून कुर्ला मेट्रो स्थानक वगळले, नागरिकांच्या सूचना-हरकती न मागवता आराखड्यात बदल
मुंबईत आंतरराष्ट्रीय दर्जाची वाहतूक व्यवस्था निर्माण करण्यासाठी एमएमआरडीएने मेट्रोचे जाळे विणण्यास सुरुवात केली आहे. त्यानुसार डी एन नगर ते मंडाले मेट्रो 2ब प्रकल्प एमएमआरडीएकडून उभारण्यात येत आहे. या मेट्रो मार्गाच्या आराखड्यात कुर्ला मेट्रो स्थानकाचा समावेश होता. पण आता मात्र हे स्थानक मेट्रो 2 ब मधून वगळण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. माहिती अधिकार कार्यकर्ते अनिल गलगली यांनी ही माहिती दिली आहे. कुर्ला रेल्वे स्थानक महत्वाचे स्थानक असून दररोज यावरून लाखो प्रवाशी प्रवास करतात. तेव्हा या रेल्वे स्थानकाशी मेट्रो स्थानक जोडणे महत्वाचे होते. त्यामुळेच कुर्ला मेट्रो स्थानक मूळ आराखड्यात समाविष्ट करण्यात आले. पण आता अचानक एमएमआरडीएने हे स्थानक आराखड्यात वेगळल्याने गलगली यांनी नाराजी व्यक्त केली आहे.गलगली यांनी आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि महानगर आयुक्त आर ए राजीव यांना पत्र लिहून याविषयी तक्रार केली आहे. हे स्थानक वगळू नये अशी विनंती त्यांनी केली आहे. एमएमआरडीएने बदल करताना नियम पाळले नसल्यानेही गलगली यांनी नाराजी व्यक्त केली आहे. कारण हा बदल करताना एमएमआरडीएने सूचना-हरकती ही मागवलेल्या नाहीत. त्यामुळे याचाही विचार करत याची चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.