ETV Bharat / city

कोरोनाची दहशत ! आमदार योगेश सागर मास्क घालून विधानभवनात... - Yogesh Sagar came Assembly by wearing mask

अनेक ठिकाणी मास्क चढ्या दराने विकले जात आहेत. तर काही ठिकाणी मास्क उपलब्ध नाहीत. मुंबईत कोरोना विषाणूचे दोन रुग्ण आढळले आहेत. नागरिकांनी गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे, असे आवाहन सरकारने केले आहे.

mla yogesh sagar
आमदार योगेश सागर
author img

By

Published : Mar 12, 2020, 1:55 PM IST

मुंबई - विधानभवन परिसरातील कर्मचारी, पोलीस आणि कामानिमित्त विधानभवनात येणाऱ्यांना सरकारने कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर मास्क उपलब्ध करावेत, या मागणीसाठी भाजप आमदार योगेश सागर यांनी मास्क घालून विधानभवनात प्रवेश केला.

आमदार योगेश सागर यांची प्रतिक्रिया...

हेही वाचा... ....तर बाबरी मशिदीचा संघर्ष टळला असता - शरद पवार

जागतिक आरोग्य संघटनेने कोरोना विषाणू जगभरात पसरल्याने महामारी घोषित केली आहे. सध्या देशातही रुग्ण अनेक आढळत आहेत. या स्थितीत नागरिकांच्या आरोग्याची काळजी सरकारने घ्यावी. अनेक ठिकाणी मास्क चढ्या दराने विकले जात आहेत. तर काही ठिकाणी मास्क उपलब्ध नाहीत. मुंबईत कोरोना व्हायरसचे दोन रुग्ण आढळले आहेत. नागरिकांनी गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे, असे आवाहन सरकारने केले आहे. मात्र, विधीमंडळाचे अधिवेशन सुरू आहेत. त्यामुळे विधानभवनात अनेक कार्यकर्ते सुरक्षा कर्मचारी, शासकीय कर्मचारी आणि अधिकारी यांची वर्दळ आहे. सरकारने त्यांना मास्क उपलब्ध करून द्यावेत, अशी मागणी आमदार सागर यांनी केली. जर मास्क महागड्या किंमतीत विकले जात असतील, किंवा उपलब्ध होत नसतील. तर ते उपलब्ध करून देण्याची जबाबदारी शासनाची आहे. शासन ती निश्चितपणे पार पाडेल, असा मला विश्वास असल्याचेही त्यांनी म्हटले.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.