मुंबई - विधिमंडळाचे कामकाज सुरू असताना केवळ मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आणि विरोधी पक्ष नेत्यांना सभागृहात दोनतीन माईक दिले जात आहे. सभागृहातील बाकीच्या सर्व सदस्यांना केवळ एक माइक दिला जातो आहे. सभागृहामध्ये अशी असमानता कशासाठी असा सवाल भाजपचे आमदार आशिष शेलार यांनी विधानसभेत औचित्याच्या मुद्द्याद्वारे उपस्थित केला आहे.
यांचा आवाज कोणाला ऐकण्याची व्यवस्था आहे का मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आणि विरोधी पक्ष नेते यांचा आवाज अन्य कुणी ऐकावा यासाठी ही व्यवस्था आहे का की या तिघांवर अन्य कोणाची पाळत आहे नेमकं कशासाठी या तिघांना दोन माईक दिले गेले आहेत ते सभागृहात स्पष्ट करावे असेही अशी शेलार म्हणाले आहेत.
विधानसभा अध्यक्ष यांनी घेतली दखल दरम्यान आशिष शेलार यांनी उपस्थित केलेल्या या मुद्द्याची विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दखल घेतली आहे. याप्रकरणी सोमवार पर्यंत चौकशी करून अहवाल सादर करण्याचे निर्देश त्यांनी प्रशासनाला दिले आहेत.
हेही वाचा - हरिहरेश्वर येथे संशयित बोटी; तटकरेंची विधान परिषदेत चौकशीची मागणी