ETV Bharat / city

Jitendra Awhad On OBC : मला कोणी चुकीचं ठरवलं तरी मान्य.. पण, इतिहास पुसू शकत नाही : जितेंद्र आव्हाड - प्रवीण दरेकर यांची जितेंद्र आव्हाडांवर टीका

ओबीसी समाजाबद्दल वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी आता सावरासावर सुरु केली ( Jitendra Awhad Controversial Statement On OBC ) आहे. माझं वक्तव्य हे तोडून- मोडून दाखवण्यात आल्याचं ते म्हणाले. तसेच मंडल आयोगावरून ( Jitendra Awhad On Mandal Ayog ) मला कुणी चुकीचं ठरवलं तरी चालेल पण इतिहास पुसू शकत नाही असंही ते म्हणाले.

जितेंद्र आव्हाड
जितेंद्र आव्हाड
author img

By

Published : Jan 4, 2022, 10:03 PM IST

मुंबई - 'ओबीसींवर माझा विश्वास नाही. आरक्षण मागण्यासाठी जेव्हा लढायचं होतं तेव्हा ओबीसी मैदानात लढायला नव्हते', असं खळबळजनक वक्तव्य ( Jitendra Awhad Controversial Statement On OBC ) गृहनिर्माण मंत्री, राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी केले होते. आता यावर पडसाद उमटायला सुरुवात झाली असताना, माझं वाक्य तोडून मोडून दाखवण्यात आल्याचे आव्हाड यांनी सांगितले ( Jitendra Awhad Over Controversial Statement )आहे. तसेच ओबीसींना मंडल आयोग हा दलित जनतेमुळेच मिळाला असल्याचंही ते ( Jitendra Awhad On Mandal Ayog ) म्हणाले. मुंबईत बीडीडी चाळीच्या पुनर्विकास प्रकल्पाला सुरुवात केल्याप्रसंगी ते बोलत होते.

काय म्हणाले आव्हाड!

माझं वाक्य तोडून-मोडून- फोडून टाकायचं हे काम आहे. मंडल आयोग व्ही. पी. सिंग यांनी मान्य केलंय. त्या विरोधात कमंडलू राजकारण कोणी सुरू केलं. त्या कमंडलूच्या यात्रेत कोण कोण होतं. त्यामुळे त्यांनी मला ओबीसी शिकवू नये. मी आता पुनरुच्चार करतो, की मंडळ आयोग हा केवळ शरद पवार आणि तिथल्या दलित समाजामुळे आला आहे. ओबीसीला मिळालेला मंडल आयोग हा केवळ दलित जनतेमुळे मिळाला आहे. यात मला कोणी चुकीचं ठरवलं तरी मान्य.. पण, इतिहास पुसू शकत नाही. आरोप करणाऱ्यांनी ते होते कुठे हे सांगावं.. मग आपण पुढचं बोलू असे जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलं आहे.

आव्हाड यांनी ओबीसी समाजाची माफी मागावी : दरेकर

जितेंद्र आव्हाड हे खळबळजनक वक्तव्य करायला माहीर आहेत. अशा वक्तव्याने समाजात तेढ निर्माण करण्याचे काम ते नेहमी करत असतात. त्यांनी ओबीसी समाजाची माफी मागावी. कारण ओबीसी समाजाच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. याची किंमत त्यांना मोजावी लागेल, असे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी सांगितलं ( Pravin Darekar On Jitendra Awhad ) आहे. त्याचबरोबर अशा वक्तव्याने जितेंद्र आव्हाड आपल्या पक्षाला अडचणीत आणण्याचे काम सुद्धा करत आहेत, असेही ते म्हणाले.

ओबीसी समाजाबद्दल काय म्हणाले होते आव्हाड!

खरं तर ओबीसींवर माझा फारसा विश्वास नाही. आरक्षण मागण्यासाठी जेव्हा लढायचं होतं तेव्हा ओबीसी मैदानात लढायला ( Jitendra Awhad On OBC Reservation ) नव्हते. लढायला फक्त महार आणि दलित समाज होता. कारण ओबीसींना लढायचं नव्हतं. ओबीसींवर ब्राह्मणवादाचा पगडा इतका आहे की, आपण श्रेष्ठ आहोत असं त्यांना वाटतं. पण त्यांना हे माहित नाही की चार पिढ्यांपूर्वी आपल्या बापाला, आजोबाला देवळात सुद्धा येऊ देत नसतं. ते हे सर्व विसरले आणि आता आरक्षणासाठी पुढे येत आहेत. नुसतं घरात बसून व्हॉट्सअॅप करुन चालणार नाही. रस्त्यावर यावं लागणार आहे. केंद्र सरकारशी दोन हात करावे लागणार आहेत, असं जितेंद्र आव्हाड म्हणाले होते.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.