मुंबई - किरीट सोमैया यांनी साखर कारखान्यात खोटी माहिती दिली आहे. तसेच ते जावयाचा आणि कुटुंबाचे नाव सातत्याने घेत असून, हा प्रकार निषेधार्थ आहे. मी आतापर्यंत याबाबत खुलासा केला आहे. 25 वर्ष मेहनत करून मी राजकारणात आलो आहे. त्यामुळे हे आरोप खोटे असल्याची प्रतिक्रिया ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली आहे. तसेच फुकट प्रसिद्धीसाठी सोमैया कोल्हापूर दौरा करत असल्याचेही मुश्रीफ म्हणाले.
हेही वाचा - Jalyukt Shivar : तत्कालीन फडणवीस सरकारच्या 'जलयुक्त शिवार योजने'ची चौकशी सुरू
- फुकट प्रसिद्धीसाठी सोमैयांचा कोल्हापूर दौरा - मुश्रीफ
ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर घोटाळ्याचा आरोप केल्यानंतर भाजपचे नेते किरीट सोमैया हे आज कोल्हापूर दौऱ्यावर आले आहेत. यावर हसन मुश्रीफ यांनी प्रतिक्रिया दिली. ते पुढे म्हणाले, सोमैया यांनी केलेला 1500 कोटी रुपये घोटाळ्याचा आरोप म्हणजे ओम फस आहे. त्यामुळे सोमैया हे काहीही बडबडत आहेत. तसेच ते पवार आणि मुख्यमंत्री यांना सतत टार्गेट करत आहेत. रजिस्टर ऑफ प्रोजीसरमध्ये जी कागदपत्रे दिली जातात, तेच सोमैया सादर करत आहेत.
हेही वाचा - सक्षम कारखाने अवमूल्यन करुन घशात घालणे ही पवार परिवाराची मोडस - किरीट सोमैया
किरीट सोमैया राज्य सरकारमधील मंत्र्यांविरोधात भ्रष्टाचारांच्या आरोपांची खैरात करताना दिसत आहेत. ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ आणि त्यांचा मुलगा नाविद मुश्रीफ यांनी 127 कोटींचा घोटाळा केला आहे, असा आरोप सोमैया यांनी मुश्रीफ पितापुत्रांवर केला होता.