ETV Bharat / city

OBC Reservation : इतर राज्यांना वेगळा आणि महाराष्ट्राला वेगळा न्याय का? - मंत्री छगन भुजबळ - ओबीसी आरक्षणावरून छगन भुजबळ आक्रमक

मंत्री छगन भुजबळ हे दिल्ली दौऱ्यावर (Chhagan Bhujbal Delhi Visit) आहेत. त्यांनी दिल्ली येथे खासदार प्रफुल्ल पटेल आणि माजी खासदार समीर भुजबळ यांच्यासोबत ओबीसी आरक्षणप्रश्नी शरद पवार (NCP Chief Sharad Pawar) यांच्यासह ज्येष्ठ विधिज्ञांच्या भेटी घेतल्या. राज्य सरकारने ओबीसी आरक्षणाचा अध्यादेश काढला होता. हा अध्यादेश सर्वोच्च न्यायालयाने स्थगित केला आहे.

Minister chhagan bhujbal
अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ
author img

By

Published : Dec 9, 2021, 3:08 PM IST

मुंबई - ओबीसी आरक्षणावरून (OBC Reservation) देशातील इतर राज्यांना वेगळा आणि महाराष्ट्राला वेगळा नियम का? असा सवाल उपस्थित करत ओबीसी आरक्षणासह स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका (Local Body Election) घ्याव्यात किंवा सर्वच निवडणुका पुढे ढकला, अशी मागणी राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ (Minister Chhagan Bhujbal) यांनी केली आहे. मंत्री छगन भुजबळ हे दिल्ली दौऱ्यावर (Chhagan Bhujbal Delhi Visit) आहेत. त्यांनी दिल्ली येथे खासदार प्रफुल्ल पटेल आणि माजी खासदार समीर भुजबळ यांच्यासोबत ओबीसी आरक्षणप्रश्नी शरद पवार (NCP Chief Sharad Pawar) यांच्यासह ज्येष्ठ विधिज्ञांच्या भेटी घेतल्या.

  • सर्वोच्च न्यायालयाकडून ओबीसी आरक्षण स्थगित -

सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या इतर मागासवर्गीय उमेदवारांसाठी राखीव २७ टक्के जागांवर निवडणूक घेण्यास पुढील निर्णयापर्यंत स्थगिती दिली आहे. मात्र, ही तांत्रिक बाब आहे. यासाठी संपूर्ण समाजाला वेठीस धरणे चुकीचे आहे आणि यासाठीच आम्ही न्यायालयीन लढाई लढत आहोत, असे मत मंत्री छगन भुजबळ यांनी व्यक्त केले आहे.

7 डिसेंबरला दिल्ली येथे मंत्री छगन भुजबळ, खासदार प्रफुल पटेल आणि माजी खासदार समीर भुजबळ यांनी ज्येष्ठ विधिज्ञ मुकुल रोहतगी आणि पी. विल्सन यांची भेट घेतली. आज छगन भुजबळ हे कपिल सिब्बल यांच्यासोबत बैठक घेणार आहेत. राज्य सरकार ओबीसी आरक्षणासाठी न्यायालयीन लढाई लढणार आहे. त्यासाठी राज्य सरकारच्यावतीने बाजू मांडणाऱ्या वकिलांशी छगन भुजबळ यांनी चर्चा केली. स्थानिक स्वराज्य संस्थांमधील इतर मागासवर्गीयांसाठी राखीव असलेल्या २७ टक्के जागांवरील निवडणुकीला स्थगिती देण्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाला राज्य सरकार, अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद हस्तक्षेप याचिकेद्वारे आव्हान देणार आहेत. तसेच ओबीसी आरक्षण टिकवण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात निष्णात वकिलांची फौज उभी करणार असल्याची माहिती देखील छगन भुजबळ यांनी दिली आहे.

  • शरद पवार आणि छगन भुजबळ यांच्यामध्ये चर्चा -

मंत्री छगन भुजबळ आणि समीर भुजबळ यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची देखील भेट घेतली व ओबीसी आरक्षणप्रश्नी चर्चा केली. महाराष्ट्रासोबत इतर राज्यांमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये ओबीसी आरक्षण शाबूत आहे. एप्रिल २०२१ नंतर उत्तरप्रदेश, गुजरातमध्ये निवडणुका झाल्या तर मध्यप्रदेश आणि राजस्थानमध्ये आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लागल्या आहेत. मात्र, महाराष्ट्रातील ओबीसींवरच असा अन्याय का? असा सवाल देखील छगन भुजबळ यांनी उपस्थित केला आहे. देशातील इतर राज्यात राजकीय आरक्षणावर कोणताही परिणाम झाला नाही. मात्र, महाराष्ट्रात ओबीसी समाजाला राजकीय आरक्षणापासून वंचित ठेवले जात आहे, असेही छगन भुजबळ म्हणाले. नवी दिल्ली येथे झालेल्या ज्येष्ठ विधिज्ञांच्या भेटीत राज्य निवडणूक आयोगाने महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सर्व निवडणुका राज्य शासनाच्या अध्यादेशातील आरक्षणाप्रमाणे घ्याव्या. राज्य सरकार इंपिरिकल डाटा गोळा करून न्यायालयात दाखल करेल. तसेच महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सर्व जागांवर निवडणुका झाल्या नाही तर स्थानिक स्वराज्य संस्था स्थापन होणार नाही. त्यामुळे सर्वच निवडणुका पुढे ढकलण्यात याव्यात, अशा काही प्रमुख मागण्या सर्वोच न्यायालयात करण्यात येणार असल्याची माहितीही छगन भुजबळ यांनी दिली.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.