मुंबई कोरोनामुळे दोन्ही पालक गमावलेल्या विद्यार्थ्यांचे पदवी आणि पदव्युत्तर शिक्षण शुल्क माफ who have lost both their parents in Corona करण्यासंदर्भात, आमदार शिरीष चौधरी shirish Choudhary यांनी प्रश्नोत्तराच्या तासात प्रश्न उपस्थित केला होता. या प्रश्नाला उत्तर देतांना उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील Chandrakant Patil यांनी माहिती दिली की, आतापर्यंत 931 पदवी शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना आणि २२८ पदव्युत्तर शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना राज्य सरकारच्या वतीने शिक्षण शुल्क माफ करण्यात govern the education expenses of students आले आहे. यासाठी दोन कोटी 76 लाख 84 हजार रुपये वितरित करण्यात आले आहेत. तर राज्यातील सर्व कृषी विद्यापीठांना कोविड 19 च्या प्रादुर्भावामुळे दोन्ही पालक गमावलेल्या विद्यार्थ्यांचे शिक्षण पूर्ण होईपर्यंत ची संपूर्ण फी माफ करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
शिक्षण पूर्ण होईपर्यंत शुल्क माफीचा निर्णय दरम्यान उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी विधानसभेत घोषणा केली की, ज्या विद्यार्थ्यांनी कोरोना काळात पालक गमावलेले आहेत, अशा विद्यार्थ्यांचे सर्व शिक्षण पूर्ण होईपर्यंत राज्य शासनाच्या वतीने शुल्क माफ करण्यात येईल. याबाबत नवीन निर्णय दरवर्षी घेण्याची गरज पडणार नाही, असेही त्यांनी नमूद केले.
हेही वाचा Sanjay Raut संजय राऊतांचा तुरुंगातील मुक्काम वाढला, 5 सप्टेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडी