ETV Bharat / city

Balasaheb Thorat on Budget 2022 : मोठमोठे आकडे आणि गुलाबी स्वप्ने दाखवणारा ‘अर्थ’हीन संकल्प - बाळासाहेब थोरात - अर्थसंकल्प 2022 सादर

आज सादर केलेला अर्थसंकल्प (Budget 2022) सर्व वर्गाची घोर निराशा करणारा दिशाहीन व अर्थहीन संकल्प आहे, अशी प्रतिक्रिया महसूल मंत्री बाळासाहेब थोरात (Minister Balasaheb Thorat) यांनी दिली आहे.

minister Balasaheb Thorat
मंत्री बाळासाहेब थोरात
author img

By

Published : Feb 1, 2022, 4:01 PM IST

Updated : Feb 1, 2022, 5:14 PM IST

मुंबई - मोदी सरकारने (Union Budget 2022) आपल्या नेहमीच्या पद्धतीने या बजेटमधून मोठमोठे आकडे फेकून भव्य दिव्य स्वप्न दाखवली आहेत. गुलाबी स्वप्नांशिवाय सर्वसामान्यांना काहीही मिळाले नाही. निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन, या अर्थसंकल्पाची मांडणी (Budget For Election) केली आहे. पुन्हा एकदा डिजीटल स्वप्न दाखवून लोकांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न अर्थमंत्री निर्मला सितारामन यांनी केला आहे. त्यांनी आज सादर केलेला अर्थसंकल्प सर्व वर्गाची घोर निराशा करणारा दिशाहीन व अर्थहीन संकल्प आहे, अशी प्रतिक्रिया महसूल मंत्री बाळासाहेब थोरात (Minister Balasaheb Thorat) यांनी दिली आहे.

बाळासाहेब थोरात - महसूलमंत्री

गेल्या अर्थसंकल्पातील घोषणांचे काय झाले?

केंद्रीय अर्थसंकल्पावर बोलताना थोरात म्हणाले की, सरकारी कंपन्या विकणे, टॅक्स आणि इंधनाचे दर वाढविणे यापलीकडे केंद्र सरकारकडे दुसरे काही धोरण नाही. सरकारी पैशांतून व्यवस्था उभ्या करायच्या आणि पुन्हा त्या विकायच्या हेच मागील सात वर्षात सुरु आहे आणि तेच भविष्यातही सुरु राहणार आहे. यावर आजच्या अर्थसंकल्पातून शिक्कामोर्तब केले आहे. मोदी सरकारने गेल्या सात वर्षांत सादर केलेले अर्थसंकल्प बघितले तर, ते कायमच अर्थसंकल्पातून भविष्याची स्वप्न दाखवता आले आहे. मात्र, गेल्या सात वर्षात काय केले हे सांगत नाही. १०० स्मार्ट सिटी, सांसद आदर्श ग्राम योजनेची काय स्थिती आहे? यावर सरकार शांत आहे. मुद्रा लोन, स्टार्टअप योजना याविषयी यापूर्वी केलेल्या घोषणांवर सरकार बोलत नाही. गेल्या अर्थसंकल्पातील घोषणांचे काय झाले तेही अर्थमंत्र्यांनी सांगितले नाही, असा आरोप थोरात यांनी केला आहे.

केंद्र सरकारकडे कोणतेही धोरण नाही!

मुळात कोविडच्या या संकट काळात देशातील जनता मोठ्या आर्थिक संकटातून जात आहे, छोटे उद्योजक, हातावर पोट असणारे गाव खेड्यातील व्यावसायिक यांची स्थिती अत्यंत कठीण झाली आहे. त्याबाबत केंद्र सरकारकडे कोणतेही धोरण दिसत नाही. कोविडमध्ये जीव गमवावा लागलेल्या नागरिकांच्या कुटुंबियांना 2 लाख रुपयांपर्यंत केंद्र सरकार सरसकट मदत करेल अशी अर्थसंकल्पाकडून अपेक्षा होती, त्याबद्दल चकार शब्दही अर्थमंत्र्यांनी काढला नाही, असेही थोरात म्हणाले.

सर्व वर्गाची घोर निराशा करणारा दिशाहीन अर्थसंकल्प-

या अर्थसंकल्पातून शेतकरी, कष्टकरी, कामगार, मध्यमवर्ग, छोटे व्यापारी, बेरोजगार तरूण, विद्यार्थी, महिला, दलित, अल्पसंख्यांक यांना काहीही मिळाले नाही. निवडक उद्योगपती मित्र सोडता समाजातील सर्व वर्गाची घोर निराशा या अर्थसंकल्पाने केली आहे. थोडक्यात हा मोदी सरकारने आपल्या स्वभावाप्रमाणे केलेला संकल्प आहे, जो पूर्ण करण्यासाठी ते बांधील नाहीत. सात वर्षातही तसे कधी झाले नाही, किंबहूना ते करण्याचा प्रयत्नही झाला नाही हेच सत्य असून बाकी सर्व अर्थहीन आहे, असे थोरात म्हणाले.

Last Updated : Feb 1, 2022, 5:14 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.