ETV Bharat / city

Mill Workers Agitation Mumbai : मुंबईत महाराष्ट्र दिनी गिरणी कामगारांचे आंदोलन - घरांसाठी कामगारांचे मुंबईत आंदोलन

घरांच्या प्रश्नांसाठी गिरणी कामगारांनी ( Mill workers Agitation Mumbai ) आज (रविवारी) महाराष्ट्र दिन आणि संयुक्त महाराष्ट्र लढ्याच औचित्य साधून सरकार विरोधात निषेध आंदोलन केले. मुंबईतील हुतात्मा चौकात ( Hutatma Chowk Mumbai ) कामगारांनी सरकार विरोधात जोरदार निदर्शने केली.

गिरणी कामगार आंदोलन
गिरणी कामगार आंदोलन
author img

By

Published : May 1, 2022, 3:05 PM IST

Updated : May 1, 2022, 3:40 PM IST

मुंबई - मुंबईतील जवळजवळ १ लाख ५० हजार गिरणी कामगार ( Mill workers ) आजही घरांच्या प्रतीक्षेत आहेत. सरकारने वचन देऊन सुद्धा आजही त्यांना घरासाठी वणवण भटकावे लागत आहे. याच पार्श्वभूमीवर गिरणी कामगारांनी ( Mill workers Agitation Mumbai ) आज (रविवारी) महाराष्ट्र दिन आणि संयुक्त महाराष्ट्र लढ्याच औचित्य साधून सरकार विरोधात निषेध आंदोलन केले. मुंबईतील हुतात्मा चौकात ( Hutatma Chowk Mumbai ) कामगारांनी सरकार विरोधात जोरदार निदर्शने केली.

प्रतिक्रिया देताना गिरणी कामगार संघटनेचे अध्यक्ष

सरकारचे प्रयत्न असफल : मुंबई शहर आणि उपनगरातील बंद कापड गिरण्यांच्या जमिनीवर गिरणी कामगारांना घरे देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला. याबाबत 2001 मध्ये अध्यादेशही काढण्यात आला. बंद गिरण्यांच्या एकूण जागेपैकी एक तृतीयांश जागा गिरणी कामगारांच्या घरासाठी देण्याची तरतूद करण्यात आली. या जमिनी घरे उभारून त्याचे वाटप करण्याची जबाबदारी सरकारने म्हाडावर सोपवली. त्यानुसार म्हाडाने कामगारांकडून ३ वेळा अर्ज मागवले. सर्व गिरणी कामगारांना मुंबईत घरे देणे अशक्‍य असल्याने राज्य सरकारने एमएमआरडीए मार्फत सुद्धा उभारण्यात आलेल्या भाडेतत्वावरील घरे गिरणी कामगारांना देण्याचा निर्णय घेतला. परंतु आजही हे गिरणी कामगार घराच्या प्रतीक्षेत आहेत.

'आजही १ लाख ५० हजार कामगार घरांच्या प्रतीक्षेत' : १ लाख ७२ हजार गिरणी कामगारांनी या संदर्भामध्ये अर्ज केले होते. त्यापैकी आतापर्यंत फक्त ७ हजार लोकांना घर देण्यात आलेली आहेत. तर ३० हजार अर्ज बाद करण्यात आलेले आहेत. एकंदरीत १ लाख ५० हजार गिरणी कामगार आजही घराच्या प्रतीक्षेत आहेत. विशेष करून छाननी प्रक्रियेत सरकारला वेळ लागत असला तरी या संपूर्ण प्रकरणाची कागदोपत्री व्यवस्थित छाननी व्हायला पाहिजे, असे मत श्रमिक गिरणी कामगार संघटनेचे अध्यक्ष उदय भट यांनी मांडले. त्यासोबतच मुंबईमध्ये १२ ते १३ गिरणीच्या जमिनी आजही शिल्लक आहेत. त्या जागेवर सरकारने जर गिरणी कामगारांसाठी घरे बांधली तर हा तोडगा लवकरात लवकर सुटू शकेल, अशी अपेक्षाही त्यांनी याप्रसंगी व्यक्त केली.

हेही वाचा - Maharashtra Day 2022 : महाराष्ट्राच्या निर्मितीत 'संयुक्त महाराष्ट्र समिती' मैलाचा दगड

Last Updated : May 1, 2022, 3:40 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.