ETV Bharat / city

MHADA Entrance Exam : म्हाडा भरती परीक्षा 5 डिसेंबरपासून - MHADA Entrance Exam

म्हाडाच्या(MHADA) विविध विभागातील रिक्त 565 पदांच्या भरतीसाठीची परीक्षा 5 डिसेंबरपासून सुरु होत आहे. 14 वेगवेगळ्या संवर्गातील पदांसाठी पावणेतीन लाख उमेदवारांनी अर्ज केले आहेत. क्लस्टर 7 मधील पदांसाठी 5 तर क्लस्टर 1,3,4 मधील काही पदांची परीक्षा 12 डिसेंबर रोजी होणार आहेत.

म्हाडा भरती परीक्षा 5 डिसेंबरपासून परीक्षा

author img

By

Published : Nov 26, 2021, 12:11 PM IST

मुंबई: म्हाडाच्या विविध विभागातील रिक्त 565 पदे भरण्याकरता ऑनलाइन अर्ज मागविण्यात आले होते. या परीक्षेचे वेळापत्रक म्हाडा प्रशासनाने जाहीर केले आहे. त्यानुसार परीक्षा 5 डिसेंबरपासून सुरु होणार आहे.

पावणेतीन लाख अर्ज

14 वेगवेगळ्या संवर्गातील पदांसाठी पावणेतीन लाख उमेदवारांनी अर्ज केले आहेत. यापैकी अनेक उमेदवारांनी एकापेक्षा अधिक पदांसाठी अर्ज भरले आहेत. त्यामुळे म्हाडाने विविध पदांसाठीची परीक्षा एकाच दिवशी आयोजित न करता विविध क्लस्टरमध्ये परीक्षांचे नियोजन केले आहे.

परीक्षा दोन सत्रात

5 डिसेंबरला क्लस्टर 7 मधील लघुटंकलेखक, स्थापत्य अभियांत्रिकी सहायक, भूमापक, अनुरेखक पदासाठी सकाळच्या सत्रात आयोजित करण्यात आली आहे. तर 12 डिसेंबर रोजी क्लस्टर 1 मधील कार्यकारी अभियंता (स्थापत्य), उप अभियंता (स्थापत्य), सहायक अभियंता (स्थापत्य) आणि क्लस्टर 3 मधील सहायक विधी सल्लागार या पदांची परीक्षा सकाळच्या सत्रात आयोजित केली आहे. तसेच 12 डिसेंबर रोजी क्लस्टर 4 मधील कनिष्ठ अभियंता स्थापत्य या पदासाठीची परीक्षा दुपारच्या सत्रात आयोजित केली आहे.

इतर परीक्षांचे वेळापत्रक लवकरच
परीक्षेसाठी अर्ज केलेल्या उमेदवारांना म्हाडाच्या संकेतस्थळावरून हॉल तिकीट मिळवता येणार आहे. याची सूचना मोबाईलवरही देण्यात येणार आहे. तर उर्वरित परीक्षांचे वेळापत्रक काही दिवसांतच जाहीर होणार असल्याचेही म्हाडाकडून सांगण्यात आले आहे. एकाहून अधिक पदांच्या परीक्षांसाठी अर्ज केलेल्या उमेदवारांना परीक्षेची संधी देण्यासाठी म्हाडाकडून विविध क्लस्टरमध्ये परीक्षा आयोजित करण्यात आली आहे. म्हाडाने 4 क्लस्टरमधील उमेदवारांची परीक्षा घेण्याचे वेळापत्रक जाहीर केले आहे. इतर क्लस्टरमधील उमेदवारांच्या परीक्षेचे वेळापत्रक लवकरच जाहीर येईल, असे म्हाडा प्रशासनाने सांगितले आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.