ETV Bharat / city

मुंबईत उद्या रविवारी लोकलचा मेगा ब्लॉक, दुपारपर्यंत माटुंगा ठाणे अप आणि डाउन धिम्या मार्गावर - Mega block of local in Mumbai tomorrow

मुंबईत उद्या रविवारी लोकलचा मेगा ब्लॉक असणार आहे (Mega block of local in Mumbai tomorrow). दुपारपर्यंत माटुंगा ठाणे अप आणि डाउन धिम्या मार्गावर धावतील. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून सकाळी सकाळी सव्वा दहा पासून दुपारी सव्वा तीन पर्यंत सुटणाऱ्या धीम्या मार्गावरील सेवा माटुंगा आणि मुलुंड स्थानकांदरम्यान दरम्यान डाउन जलद मार्गावर वळवण्यात येतील.

मुंबईत उद्या रविवारी लोकलचा मेगा ब्लॉक
मुंबईत उद्या रविवारी लोकलचा मेगा ब्लॉक
author img

By

Published : Sep 24, 2022, 12:44 PM IST

मुंबई - छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (Mega block of local in Mumbai tomorrow) मुंबई येथून सकाळी 10.14 ते दुपारी 3.18 वाजेपर्यंत सुटणाऱ्या धीम्या मार्गावरील सेवा माटुंगा आणि मुलुंड स्थानकांदरम्यान दरम्यान डाउन जलद मार्गावर वळवण्यात येतील. या सेवा माटुंगा आणि ठाणे स्थानकांदरम्यान शीव, कुर्ला, घाटकोपर, विक्रोळी, भांडुप मुलुंड आणि ठाणे या स्थानकांवर थांबून पुन्हा डाउन धिम्या मार्गावर वळवण्यात येतील (Matunga Thane up and down slow route). या सेवा गंतव्यस्थानी नियोजित वेळेच्या 15 मिनिटे उशीराने पोहोचेल.

कल्याण येथून सकाळी 10.25 ते दुपारी 3.10 वाजेपर्यंत अप धिम्या मार्गावरील सेवा ठाणे आणि माटुंगा दरम्यान अप जलद मार्गावर वळवण्यात येतील. या सेवा ठाणे, मुलुंड, भांडुप, विक्रोळी, घाटकोपर, कुर्ला आणि शीव येथे थांबतील. पुढे अप धीम्या मार्गावर वळवण्यात येतील आणि 15 मिनिटे उशिराने गंतव्यस्थानावर पोहोचतील.

सकाळी 11.00 ते 5.00 या वेळेत सीएसएमटीहून सुटणाऱ्या/पोहोचणाऱ्या सर्व अप आणि डाउन लोकल नियोजित वेळेपेक्षा 15 मिनिटे उशिरा पोहोचतील.

हार्बर लाइन - छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस - चुनाभट्टी/वांद्रे डाउन हार्बर मार्गावर सकाळी ११.४० ते सायंकाळी ४.४० पर्यंत. चुनाभट्टी/वांद्रे - छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस अप हार्बर मार्गावर सकाळी ११.१० ते सायंकाळी ४.१० पर्यंत

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई/वडाळा येथून सकाळी 11.16 ते सायंकाळी 4047 या वेळेत वाशी/बेलापूर/पनवेल करीता सुटणारी डाउन हार्बर मार्गावरील सेवा आणि वांद्रे/गोरेगाव येथून सकाळी 10.48 ते सायंकाळी 4.43 वाजेपर्यंत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई करीता डाउन हार्बर मार्गावरील सेवा रद्द राहतील.

पनवेल/बेलापूर/वाशी येथून सकाळी 9.53 ते दुपारी 3.20 पर्यंत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई करीता सुटणारी अप हार्बर मार्गावरील सेवा आणि गोरेगाव/वांद्रे येथून सकाळी 10.45 ते सायंकाळी 5.13 पर्यंत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबईसाठी सुटणारी अप हार्बर मार्गावरील सेवा बंद राहतील.

परंतु ब्लॉक कालावधीत पनवेल आणि कुर्ला (प्लॅटफॉर्म क्र. ८) दरम्यान विशेष सेवा २० मिनिटांच्या अंतराने चालवल्या जातील.

हार्बर मार्गावरील प्रवाशांना ब्लॉक कालावधीत सकाळी १०.०० ते संध्याकाळी ६.०० वाजेपर्यंत मेन लाइन आणि पश्चिम रेल्वेवरून प्रवास करण्याची परवानगी आहे.

हे मेंटेनन्स मेगा ब्लॉक्स पायाभूत सुविधांच्या देखभालीसाठी आणि सुरक्षिततेसाठी आवश्यक आहेत. प्रवाशांना होणाऱ्या गैरसोयीबद्दल रेल्वे प्रशासनाने दिलगीर व्यक्त केली आहे.

For All Latest Updates

TAGGED:

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.