ETV Bharat / city

मोदींचा शरद पवारांवर तर उध्दव ठाकरेंचा राहुल गांधीवर हल्लाबोल... या मतदारसंघात चालले तब्बल १४ तास मतदान... - review

शरदराव, विदेशी चष्म्यातून भारताकडे पाहू नका...नालायक राहुल गांधीला संसदेत पाठवू नका...या मतदार संघात चालले तब्बल १४ तास मतदान...या आणि यासारख्या राजकिय घडामोडींचा आढावा..

मतकंदन
author img

By

Published : Apr 12, 2019, 2:34 PM IST

शरदराव, विदेशी चष्म्यातून भारताकडे पाहू नका...
अहमदनगर - लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी पंतप्रधान मोदी यांची अहमदनगरमध्ये जाहीर सभा झाली. यावेळी त्यांनी शरद पवारांवर पुन्हा एकदा निशाना साधला. राष्ट्रवादी नाव देऊन पवार जनतेच्या डोळ्यात धुळ फेकत आहेत. पवार विदेशी चष्म्यातून भारताकडे पाहत आहेत. तसेच त्यांना भारतामध्ये दोन पंतप्रधान चालतील का? अशी टीका त्यांनी पवारांवर केली. वाचा सविस्तर..

नालायक राहुल गांधीला संसदेत पाठवू नका..
सांगली - स्वातंत्र्यवीर सावरकर यांना भित्रा म्हणणाऱ्या नालायकाला संसदेत पाठवू नका, असे आवाहन करत शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी राहुल गांधी यांच्यावर टीका केली. इस्लामपूरमध्ये आयोजित हातकणंगले मतदार संघातील महायुतीचे उमेदवार धैर्यशील माने यांच्या प्रचार सभेत ते बोलत होते. वाचा सविस्तर..

या मतदार संघात चालले तब्बल १४ तास मतदान..
गडचिरोली - चिमूर मतदार संघातल्या काही विधानसभा मतदारसंघामध्ये रात्री उशिरापर्यंत मतदान सुरू होते. या मतदारसंघातील गडचिरोली, आरमोरी, आमगाव व अहेरी या चार विधानसभा क्षेत्रात दुपारी ३ वाजेपर्यंत मतदान होणार होते. मात्र, ३ वाजताच्या सुमारास अचानक मतदारांनी बुथवर गर्दी केल्याने मतदान उशिरापर्यंत चालले. वाचा सविस्तर..

जळगाव भाजप अध्यक्ष उदय वाघ गुंडच..
जळगाव - जिल्ह्यातील अमळनेर येथे भाजपचे जिल्हाध्यक्ष उदय वाघ आणि त्यांच्या समर्थकांनी केलेल्या मारहाणीत जखमी झालेले माजी आमदार बी. एस पाटील यांच्यावर धुळे शहरातील सिद्धेश्वर हॉस्पिटल येथे उपचार सुरू आहेत. उदय वाघ आणि त्यांच्या समर्थकांवर कारवाई होत नाही तोवर पक्षाचे काम करणार नाही, असा पवित्रा बी. एस पाटील यांनी घेतला आहे. वाचा सविस्तर..

..म्हणून माजी आमदार डॉ. बी. एस. पाटलांना झाली मारहाण
जळगाव - भाजपचे अमळनेरचे माजी आमदार डॉ. बी. एस. पाटील यांना गुरुवारी अमळनेरात युतीच्या मेळाव्यात मारहाण झाली होती. या घटनेचे भाजपचे जळगाव जिल्हाध्यक्ष उदय वाघ यांनी समर्थन केले आहे. या वादानंतर वाघ दाम्पत्याने आपली भूमिका 'ई- टीव्ही भारत'शी बोलताना मांडली. वाचा सविस्तर..

कुठे आहेत अच्छे दिन?
रत्नागिरी - या ५ वर्षात महागाई कमी झाली का? अच्छे दिन आले का ?असे म्हणत महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे अध्यक्ष खासदार नारायण राणे यांनी सरकारसह उद्धव ठाकरे आणि विनायक राऊत यांच्यावर चौफेर टीका केली. रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातील महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे उमेदवार निलेश राणे यांच्या प्रचारार्थ संध्याकाळी जाकादेवी येथे त्यांची जाहीर सभा झाली. त्यावेळी ते बोलत होते. वाचा सविस्तर..

नांदेडमध्ये आज राज ठाकरेंची तोफ धडाडणार...!
नांदेड - महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची आज ( दि . १२ ) नव्या मोंढ्यातील मार्केट कमिटी मैदानावर सायंकाळी ५ वाजता जाहीर सभा आयोजित करण्यात आली आहे. या सभेची संपूर्ण तयारी झाली असून या सभेकडे राजकीय निरिक्षकांसह मतदारांचेदेखील लक्ष लागले आहे. वाचा सविस्तर..

आचारसंहिता लागू असतानाही झळकणार भाजपच्या जाहिराती..
धुळे - आचारसंहिता लागू असल्यामूळे निवडणूक आयोगाने कोणत्याही पक्षाती जाहिराती सार्वजनिक ठिकाणी प्रदर्शित घालण्यास बंदी घातली होती. धुळे बसस्थानकावरही भाजप आणि पंतप्रधान मोदी यांच्या जाहिराती प्रसारित करण्यासाठी आयोगाने बंदी घातली होती. मात्र, आता या ठिकाणी पुन्हा एकदा जाहिराती प्रसिद्ध होणार आहेत. वाचा सविस्तर..

भाजपच्या खासदारांना नागरिकांनी दाखवले काळे झेंडे..
मुंबई - गेल्या १० वर्षांपासून घराचा प्रश्न सुटत नाही म्हणून नाराज झालेले रहिवाशी काल आक्रमक झाले. लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान मतदान करा, असे आव्हान करण्यासाठी आलेल्या उत्तर मुंबई लोकसभा क्षेत्राचे भाजपचे उमेदवार व खासदार गोपाळ शेट्टी यांना काळे झेंडे दाखवून निषेध केल्याचा प्रकार घडला. वाचा सविस्तर..

अमरावतीत दारूचा महापूर..
अमरावती - निवडणुकीचा काळ म्हणजे दारू पिणाऱ्यांसाठी सुवर्ण काळच. त्यातही देशातील सर्वात मोठ्या लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत तर दारूला महापूर येतो. अमरावती लोकसभा मतदारसंघात निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दारू पिण्याचा आणि पाजण्याच्या मैफिली चांगल्याच रंगात आल्या आहेत. वाचा सविस्तर..

वंचित बहुजन आघाडी म्हणजे भाजपची टीम 'बी'
औरंगाबाद - वंचित बहुजन आघाडी म्हणजे भाजपची टीम-बी असल्याचा आरोप काँग्रेसचे ज्येष्ठ नेते हर्षवर्धन पाटील यांनी केला आहे. निवडणुकीच्या आधी जागावाटप संदर्भात चर्चा सुरू असताना प्रकाश आंबेडकर यांनी राज्यात आपले दौरे सुरू केले. इतकेच नाही तर काही ठिकाणी आपले उमेदवार देखील घोषित केले. त्यामुळे त्यांना आमच्यासोबत आघाडी करायची नव्हती. औरंगाबादचे काँग्रेसचे उमेदवार सुभाष झांबड यांच्या प्रचार सभेत हर्षवर्धन पाटील बोलत होते. वाचा सविस्तर..

वडिलांचे स्मारक बांधले नाही अन् निघाले राममंदिर बांधायला...
रत्नागिरी - सध्याची शिवसेना ही शिवसेना नसून, लुटशेना असल्याची टीका महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे अध्यक्ष, खासदार नारायण राणे यांनी केली. ते निलेश राणे यांच्या प्रचारार्थ रत्नागिरीतल्या जाकादेवी येथील सभेत बोलत होते. वडिलांचे अजून स्मारक बांधले नाही आणि राम मंदिर बांधायला चालला आहे, असा टोलाही त्यांनी उद्धव ठाकरे यांना लगावला. वाचा सविस्तर..

Intro:Body:Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.