ETV Bharat / city

पवारांच्या पक्षाचे नाव राष्ट्रवादी नाही तर घरभेदी असायला हवं होतं, पंकजा मुंडेंची टीका - निवडणूक

युपीएचे सरकार सत्तेत येताच नरेंद्र मोदी, अमित शाह यांना तुरुंगात धाडू - धनंजय मुंडे ..पवारांच्या पक्षाचे नाव राष्ट्रवादी नाही तर घरभेदी असालयाल हवं होतं, पंकजा मुंडेंची टीका...राहुल गांधी पंतप्रधान झालेले शरद पवार यांना चालणार आहे का? विनोद तावडेंचा राज ठाकरेंना सवाल...यासह अन्य राजकिय घडामोडींचा आढावा..

मतकंदन
author img

By

Published : Apr 7, 2019, 12:56 PM IST

Updated : Apr 7, 2019, 10:31 PM IST

  • युपीएचे सरकार सत्तेत येताच नरेंद्र मोदी, अमित शाह यांना तुरुंगात टाकू - धनंजय मुंडे

भंडारा - यूपीएचे सरकार सत्तेत आल्यास सर्वात पहिले देशातल्या दोन दाढीवाल्या बुवांना जेलमध्ये घालू, असे विधानपरिषदेचे विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे यांनी म्हटले आहे. भंडारा येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार नाना पंचबुद्धे यांच्या प्रचारासाठी आले असता ते पंतप्रधान मोदी आणि अमित शाह यांना उद्देशून बोलत होते. वाचा सविस्तर

  • पवारांच्या पक्षाचे नाव राष्ट्रवादी नाही तर घरभेदी असायला हवं होतं, पंकजा मुंडेंची टीका

परभणी - आपल्या सैन्यांना बेसावधपणे मारणाऱ्या पाकिस्तानी अतिरेक्यांचा बिमोड करण्यासाठी भारताने सर्जिकल स्ट्राइक केला. मात्र, या कारवाईचा विरोधक पुरावा मागत आहेत. हा पुरावा देण्यासाठी त्यांना बॉम्बला बांधून तिकडे पाठवायचे का? असा टोला महिला व बाल विकास मंत्री पंकजा मुंडे यांनी विरोधकांना लगावला आहे. वाचा सविस्तर

  • राहुल गांधी पंतप्रधान झालेले शरद पवार यांना चालणार आहे का? विनोद तावडेंचा राज ठाकरेंना सवाल

मुंबई - राहुल गांधी पंतप्रधान झालेले शरद पवार यांना चालणार आहे का? हे विचारा आधी, असा सवाल शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी मनसे प्रमुख राज ठाकरे यांना विचारला आहे. 'देश राहुल गांधीकडे द्या, तो खड्ड्यात तरी घालेल नाहीतर चालवेल तरी, असे आवाहनात्मक वक्तव्य मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुढी पाडवा मेळाव्यामध्ये मतदारांना केले होते. त्यावर, प्रत्युत्तर देत शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी राज ठाकरेंवर निशाणा साधला आहे. वाचा सविस्तर

  • 'xxx' दम असेल तर आरोप सिद्ध करा अन्यथा राजकारण सोडा, संदीप देशपांडेंचे तावडेंना आव्हान

मुंबई - मोदी सरकारच्या डिजिटल इंडिया योजनेची शनिवारी राज ठाकरेंनी पोलखोल केली. यानंतर विनोद तावडेंनी ठाकरे यांच्या पक्षावर गंभीर टीका केली. तावडेंच्या टीकेला उत्तर देताना, तावडेंच्या xxx दम असेल, तर त्यांनी आम्ही केलेले आरोप खोटे असल्याचे सिद्ध करावे अन्यथा राजकारण सोडावे, असे मनसे नेते संदीप देशपांडे यांनी म्हटले आहे. वाचा सविस्तर

  • भाजपला मतदान म्हणजे संविधानाच्या विरोधात मतदान - खरगे

अकोला - देशाचे संविधान वाचविण्यासाठी सर्वांनी एकत्र येणे गरजेचे आहे. त्यामुळे भाजपला मतदान म्हणजे संविधानाच्या विरोधात मतदान, असे म्हणून काँग्रेसचे प्रदेश प्रभारी मल्लिकार्जुन खरगे यांनी भाजपवर निशाणा साधला आहे. वाचा सविस्तर

निवडणुक काळातच मुंबईचे पोलीस सहआयुक्त देवेन भारतींची बदली

मुंबई - राज्य निवडणूक आयोगाने पोलीस खात्यातील कायदा व सुव्यवस्था सहआयुक्त देवेन भारती यांच्या बदलीचे आदेश दिले आहेत. महत्वाचे म्हणजे निवडणूक आयोगाने ऐन निवडणुकीच्या तोंडावर हे आदेश दिल्याने आश्चर्य व्यक्त केला जात आहे.काही दिवसांपूर्वी निवडणुकीच्या काळात कायदा व सुव्यवस्था टिकवून ठेवण्यासाठी देवेन भरती यांची बदली लांबवण्यात आली होती. तसेच निवडणूक आयोगाने ५ एप्रिलला कोलकात्याचे पोलीस आयुक्त अनुज शर्मा आणि बिधाननगरचे पोलीस आयुक्त ज्ञानवंत सिंग यांच्या बदलीचे आदेश दिले होते. या बदलीला आक्षेप घेत पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी निवडणूक आयोग आणि केंद्र सरकारला पत्र लिहिले होते. वाचा सविस्तर..

गुजरात सीमेवर खासगी वाहनातून १९ लाखांची रोकड जप्त

नाशिक - मतदारांना प्रलोभन दाखविण्यासाठी पैसा व दारुचा होणारा वापर टाळण्यासाठी निवडणूक आयोगाचे एसएसटी भरारी पथक कार्यरत आहे. या पथकाने शनिवारी मध्यरात्री महाराष्ट्र-गुजरात सीमेवरील पिठुंदी चेकपोस्टवर धडक कारवाई केली. यावेळी खासगी वाहनातून तब्बल १८ लाख ९० हजार ९७० रुपयांची रोकड जप्त करण्यात आली आहे. वाचा सविस्तर..

सात तालुक्यातील केंद्रांमध्ये महिलाराज

भंडारा - लोकसभा निवडणुकीच्या प्रक्रियेतही निवडणूक आयोग महिला सक्षमीकरणाचा संदेश देणार आहे. त्यासाठी जिल्ह्यातील ७ मतदान केंद्राची संपूर्ण जबाबदारी ही संपूर्ण महिला अधिकारी व कर्मचाऱ्यांकडे देण्यात येणार आहे. ही मतदान केंद्र सखी मतदान केंद्र म्हणून ओळखली जाणार आहेत. वाचा सविस्तर..

तुम्ही ऐकलंत का.. सेनेचे नवीन साँग 'आय लव्ह शिवसेना..शिवसेना'

मुंबई - लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी सुरू झाली आहे. पक्ष सोशल मीडिया, पोस्टर्स, बॅनर्स आणि टीव्हीवरील अॅडव्हर्टाइझच्या माध्यमाधून प्रचार करत आहेत. काही वर्षांपूर्वी शिवसेनेने 'शिवसेना-शिवसेना' हे गाणे प्रसारित केले होते. आता शिवसेनेने 'आय लव्ह शिवसेना' हे नवीन गाणे प्रसारित केले आहे. वाचा सविस्तर..

'साठी झाली..काठी आली, ऐंशी आली तरी तुम्ही खुर्चीला चिकटून रहाल'

रायगड - सुनील तटकरे एकदा निवडणुकीत पडल्यानंतर पुन्हा निवडून आले की, २०-२५ वर्षे खुर्ची सोडत नाही. त्यामुळे खासदार म्हणून निवडून आल्यानंतर पुढच्या २ टर्म झाल्यानंतर आम्हाला पण खुर्ची द्या. नाहीतर आमच्या हातात काठी आली तरी खुर्चीला चिकटून रहाल, असा मिश्किल चिमटा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष माणिक जगताप यांनी आपल्या जाहीर भाषणातून तटकरेंना मारला. वाचा सविस्तर..

१ रुपया कमी द्या; पण बॅटलाच मतदान करा

कोल्हापूर - स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टींना यावेळी बॅट हे चिन्ह मिळाले आहे. या चिन्हाची राज्यात सर्वत्र चर्चा आहे. ज्या शेतकऱ्यांच्या प्रश्नावर शेट्टी २ वेळा खासदार झाले त्या शेतकऱ्यांचे प्रेम शेट्टींप्रती पाहायला मिळते. आठवडी बाजारात एका शेतकऱ्याने १ रुपया कमी द्या, पण यावेळी बॅटलाच मतदान करा असा प्रचार सुरू केला आहे. याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. वाचा सविस्तर..

मुंबई - राज्य निवडणूक आयोगाने पोलीस खात्यातील कायदा व सुव्यवस्था सहआयुक्त देवेन भारती यांच्या बदलीचे आदेश दिले आहेत. महत्वाचे म्हणजे निवडणूक आयोगाने ऐन निवडणुकीच्या तोंडावर हे आदेश दिल्याने आश्चर्य व्यक्त केला जात आहे. वाचा सविस्तर..

नंदुरबार लोकसभा मतदारसंघातील मतदानाच्या पूर्वतयारीची जिल्हाधिकाऱ्यांकडून पाहणी

नंदुरबार - नंदुरबार लोकसभा मतदारसंघात चौथ्या टप्प्यात २९ एप्रिलला मतदान होणार आहे. त्यासाठी जिल्हाधिकारी बालाजी मंजुळे यांनी नंदुरबार लोकसभा मतदारसंघातील मतदानकेंद्राच्या पूर्वतयारीची पाहणी केली. वाचा सविस्तर..

राहुल गांधी पंतप्रधान झालेले शरद पवार यांना चालणार आहे का?

मुंबई - राहुल गांधी पंतप्रधान झालेले शरद पवार यांना चालणार आहे का? हे विचारा आधी, असा सवाल शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी मनसे प्रमुख राज ठाकरे यांना विचारला आहे. 'देश राहुल गांधीकडे द्या, तो खड्ड्यात तरी घालेल नाहीतर चालवेल तरी, असे आवाहनात्मक वक्तव्य मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुढी पाडवा मेळाव्यामध्ये मतदारांना केले होते. त्यावर, प्रत्युत्तर देत शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी राज ठाकरेंवर निशाणा साधला आहे. वाचा सविस्तर..

प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांचा आवाज संसदेत उठवणार - राजाराम पाटील

पुणे - नैसर्गिक साधन संपत्तीने संपन्न असणाऱया मावळ लोकसभा मतदारसंघातील धरणग्रस्त, प्रकल्पग्रस्त बाधित शेतकऱयांचे प्रश्न गेल्या साठ वर्षांपासून प्रलंबित आहेत. केंद्र सरकारने बंदरांसाठी, औद्योगिकीकरणासाठी पारंपारिक शेती करणाऱया शेतकऱयांच्या, कोळी बांधवांच्या जमिनी ताब्यात घेतल्या. परंतू त्यांना न्याय्य मोबदला दिला नाही. या प्रश्नांवर मी लोकसभेत आवाज उठविणार असल्याचे मावळ लोकसभेचे वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार राजाराम पाटील यांनी पिंपरीत पत्रकार परिषदेत सांगितले.

आमदार जयदत्त क्षीरसागर 'मातोश्री'च्या दारात..
मुंबई - राष्ट्रवादी काँग्रेसचे नाराज असलेले आमदार जयदत्त क्षीरसागर हे शनिवारी मातोश्रीवर गेले होते. क्षीरसागर यांचे मातोश्रीवर जाण्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस तसेच राष्ट्रवादीचे उमेदवार बजरंग सोनवणे यांना मोठा धक्का बसल्याचे मानले जात आहे. वाचा सविस्तर..

जळगाव मतदारसंघ : राजकीय गणिते बदलली..
जळगाव - जळगाव लोकसभा मतदारसंघात भाजपने उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी आपला उमेदवार बदलल्याने राजकीय गणितं बदलली आहेत. सुरुवातीला राष्ट्रवादीचे उमेदवार माजीमंत्री गुलाबराव देवकर यांच्यासाठी सोपी वाटणारी लढत आता चाळीसगावचे आमदार उन्मेष पाटील यांच्या उमेदवारीमुळे तुल्यबळ होण्याचे संकेत आहेत.
वाचा सविस्तर..

आज अमित शाहंची सभा, राहुल गांधींना काय प्रत्युत्तर देतात याकडे लक्ष
चंद्रपूर - आगामी लोकसभेच्या प्रचारासाठी भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांची सभा आज चंद्रपुरात आयोजित करण्यात आली आहे. आज संध्याकाळी साडेपाच वाजता ते सभेला संबोधित करणार आहेत. यासाठी स्थानिक नेत्यांनी जय्यत तयारी केली आहे. वाचा सविस्तर..

धक्कादायक! उच्चभ्रू लोक करत नाहीत मतदान
मुंबई - देशातल्या ईशान्य भागात एकीकडे ७० ते ७५ टक्के मतदान होते. तर उच्चभ्रू भागात ४० टक्क्यांचा आकडा गाठताना नाकीनऊ येतात. उच्चभ्रू समाजात मतदानाच्या या निरुत्साहबाबत राजकीय पक्षांसह आयोगही चिंतेत असल्याचे समोर आले आहे. दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघ हा उच्चभ्रू वसाहतींचा मतदारसंघ म्हणून ओळखला जातो. या मतदारसंघात मागील २०१४ च्या निवडणुकीत ४५ टक्के मतदान झाले तर विधानसभेत हाच आकडा ५३ टक्क्यांवर होता. वाचा सविस्तर..

सोलापूरात दलित पँथरचा सुशीलकुमार शिंदे यांना पाठिंबा
सोलापूर - लोकसभा निवडणुकीत सोलापूरात वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार अॅड. प्रकाश आंबेडकर यांना निवडून आणण्यासाठी दलित ऐक्य होत असताना नामदेव ढसाळ प्रणित दलित पँथरनं काँग्रेसच्या सुशीलकुमार शिंदे यांना जाहीर पाठिंबा दिला आहे. दलित पँथरचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष सुखदेव सोनवणे यांनी पत्रकार परिषद घेऊन ही घोषणा केली. वाचा सविस्तर..

प्रचार मोहिमेतील आज पहिला रविवार, उमेदवारांचा थेट जनसंपर्कावर भर
मुंबई - दक्षिण मुंबईतील लोकसभा उमेदवारांचा प्रचार चांगलाच जोर धरू लागला आहे. सोशल मीडिया प्रभावी माध्यम ठरत असले तरी थेट जनसंपर्कावर अधिक भर देण्यात येत आहे. प्रचारातला पहिलाच रविवार आल्याने उमेदवारांनी सकाळी ७ पासूनच भरगच्च कार्यक्रमाची आखणी केली. वाचा सविस्तर..

Intro:खालील बातमीचा फोटो डेस्क च्या व्हाट्सएपच्या ग्रुप वर सेंड केला आहे....
**************

आमदार जयदत्त क्षीरसागर यांनी नव्या वर्षानिमित्त मातोश्रीवर जाऊन दिल्या उद्धव ठाकरेंना शुभेच्छा

बीड- मागील पंचवीस- तीस वर्षांच्या राजकीय स्थित्यंतरात आपले राजकीय अस्तित्व अबाधित ठेवलेले आ. जयदत्त क्षीरसागर हे मागील तीन वर्षापासून राष्ट्रवादी काँग्रेसवर नाराज आहेत. यावरून आमदार क्षीरसागर भाजपात जाणार का? अशी चर्चा जोर धरत असतानाच आ. जयदत्त क्षीरसागर व त्यांचे बंधू भारतभूषण क्षीरसागर यांनी थेट मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरे यांना गुढीपाडव्याच्या निमित्ताने शुभेच्छा देणारा फोटो सोशल मीडियावर व्हायरल केला, अन जिल्ह्यात एकच चर्चा सुरू झाली. आता आ. क्षीरसागर सेनेत जाणार का? आ. क्षीरसागर यांनी उद्धव ठाकरे यांना भेटून शुभेच्छा दिल्या असल्या तरी अद्याप पर्यंत शिवबंधन बांधलेले नसल्याचे आमदार क्षीरसागर यांच्या समर्थकांकडून सांगण्यात येत आहे.

Body:लोकसभा मतदार संघात राष्ट्रवादी काँग्रेसचे एकमेव आ. जयदत्त क्षीरसागर हे होते मात्र दोन दिवसांपूर्वी आ. जयदत्त क्षीरसागर यांनी आपल्या समर्थकांचा मेळावा घेऊन राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराविरोधात बीडमध्ये भूमिका घेऊन भाजपच्या उमेदवार डॉक्टर प्रीतम मुंडे यांना समर्थन दिले आहे. कार्यकर्ता मेळाव्या दरम्यान आ. जयदत्त क्षीरसागर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसकडून झालेल्या अन्यायाचा पाढाच कार्यकर्त्यांसमोर वाचून दाखवला. बीड लोकसभा मतदारसंघात जयदत्त क्षीरसागर यांनी भाजपच्या उमेदवाराला पाठिंबा दिला यावरून जयदत्त क्षीरसागर हे भाजपात जाणार अशी विरोधकांमध्ये चर्चा सुरू असतानाच आ. क्षीरसागर यांनी मात्र मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरे यांना गुढीपाडव्याच्या निमित्ताने शुभेच्छा दिल्या व तो फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्यामुळे विरोधकांसह कार्यकर्ते यांच्यात संभ्रम निर्माण झाला. गुढीपाडव्याच्या निमित्ताने झालेल्या भेटीदरम्यान आ. जयदत्त क्षीरसागर यांनी शिवबंधन बांधून घेतलेले नाही. यामुळे भविष्यात ते काय निर्णय घेतील याचा अंदाज विरोधकांना बांधणे अवघड जात असल्याचे चित्र आहे.

Conclusion:या सगळ्या घडामोडी ची दुसरी बाजू म्हणजे आ. जयदत्त क्षीरसागर यांचे पुतणे संदीप शिरसागर हे राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार बजरंग सोनवणे यांचा प्रचार करत आहेत. भविष्यात बीड विधानसभा मतदारसंघातून पुतणे संदीप क्षीरसागर यांनी राष्ट्रवादीच्या उमेदवारी वर दावा केला आहे. त्यांच्या या दाव्याला बीड जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसमधील काही नेत्यांनी समर्थन दिले आहे. आ. जयदत्त क्षीरसागर यांचे खच्चीकरण करण्यासाठी पुतणे संदीप क्षीरसागर यांना पुढे केले जात असल्याचा आरोप स्वतः आ. क्षीरसागर यांनी दोन दिवसापूर्वी झालेल्या मेळाव्यात देखील केला. आता बीड लोकसभा मतदारसंघात काका भाजपच्या उमेदवाराला लीड मिळवून देणार की, पुतणे संदीप क्षीरसागर हे राष्ट्रवादीला राष्ट्रवादीच्या उमेदवाराला मताधिक्य मिळवून देणार यावरच येणाऱ्या बीड विधानसभा मतदारसंघाचा नायक ठरेल.
Last Updated : Apr 7, 2019, 10:31 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.