मुंबई - गुढीपाडवा हा मराठमोळा सण राज्यभर मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येत असून मराठी नववर्षाचे जल्लोषात स्वागत सुरू आहे. मुंबईसह राज्यभरातील मराठी बांधव मोठ्या उत्साहात स्वागत यात्रेत सहभागी झाले आहेत. तरुणांच्या गळ्यातील ताईत असलेली आर्ची म्हणजेच रिंकू राजगुरू देखील स्वागत यात्रेत सहभागी झाली आहेत. तर , उर्मिला मातोंडकरने शिवरायांच्या प्रतिमेचे पूजन करत स्वागत यात्रेत हजेरी लावली आहे.
शिवरायांच्या प्रतिमेचे पूजन करत उर्मिला स्वागत यात्रेत सहभागी
सुप्रसिद्ध अभिनेत्री उर्मिला मातोंडकर ही चारकोप येथील स्वागत यात्रेत मराठमोळ्या वेषात सहभागी झाली आहे. यावेळी उर्मिलाने महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या छत्रपती शिवरायांच्या प्रतिमेचे पूजन करत स्वागत यात्रेत हजेरी लावली.
आर्चीने कागरच्या कलावंतासोबत लावली स्वागत यात्रेत हजेरी
![Gudhi](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/images/3_0604newsroom_00146_1094.jpg)
![Gudhi](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/images/2_0604newsroom_00146_858.jpg)