ETV Bharat / city

एमपीएससीला मराठा क्रांती ठोक मोर्चाची 'ही' मागणी, अन्यथा कार्यालयावर धडकण्याचा इशारा

एमपीएससीकडून होणाऱ्या अन्यायाविरोधात विद्यार्थी कोणत्याही क्षणी एमपीएससी कार्यालयावर धडक देतील, असा इशारा मराठा क्रांती ठोक मोर्चाचे समन्वयक आबासाहेब पाटील यांनी दिला.

Abasaheb Patil warn mpsc
एमपीएससी मागणी आबासाहेब पाटील
author img

By

Published : Dec 7, 2021, 5:34 PM IST

मुंबई - एमपीएससीकडून होणाऱ्या अन्यायाविरोधात विद्यार्थी कोणत्याही क्षणी एमपीएससी कार्यालयावर धडक देतील, असा इशारा मराठा क्रांती ठोक मोर्चाचे समन्वयक आबासाहेब पाटील यांनी दिला.

माहिती देताना मराठा क्रांती ठोक मोर्चाचे समन्वयक आबासाहेब पाटील

हेही वाचा - New Pay Hike to ST Workers : एसटी कर्मचाऱ्यांना आजपासून नवीन पगारवाढ लागू; पाहा कोणाला किती मिळणार पगार?

एमपीएससीकडून परीक्षेच्या तारखा जाहीर झाल्या, परंतु या तारखा जाहीर होऊनसुद्धा विद्यार्थ्यांना अडचणींना सामोरे जावे लागणार आहे. विद्यार्थ्यांची वयोमर्यादा शिथील करायची होती. त्याचप्रमाणे अटेम्प्टच्या संदर्भामध्ये एमपीएससी निर्णय घेत नाही. एससी एसटी प्रमाणे खुल्यावर्गातील व ओबीसी विद्यार्थ्यांनाही अमर्याद अटेम्प्ट देता याव्यात यासाठी लवकर परिपत्रक काढावे, घोषणा पत्र काढावे, अशी मागणी मराठा क्रांती ठोक मोर्चाचे समन्वयक आबासाहेब पाटील यांनी केली आहे. यासाठी मराठा क्रांती ठोक मोर्चा व शिक्षक समितीचे कार्यकर्ते आणि विद्यार्थी एमपीएससी कार्यालयावर कधीही धडक देतील. यातून कायदा सुव्यवस्था बिघडेल. यास सर्वस्वी जबाबदारी सरकारची व एमपीएससी कार्यालयाची राहील, असेही पाटील म्हणाले.

हेही वाचा - Balasaheb Thorat on OBC Reservation : सर्वोच्च न्यायालयाने ओबीसीचे आरक्षण रद्द करणे हे दुर्दैवी - बाळासाहेब थोरात

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.