मुंबई - महाराष्ट्र एटीएसच्या पथकाने धनवी रामनगर नालासोपारा (पू) येथील एका चाळीवर छापा टाकला. यात झारखंडमधील प्रतिबंधित सीपीआय (माओवादी) च्या प्रादेशिक समिती सदस्य कारु हुलास यादव याला Maoist detained by ATS in Nalasopara ताब्यात घेतले. त्याच्या डोक्यावर १५ लाखांचे बक्षीस असून वैद्यकीय उपचारासाठी तो महाराष्ट्रात आला होता, अशी माहिती एटीएसकडून देण्यात आली आहे.
![सीपीआयच्या (माओवादी) प्रादेशिक समिती सदस्य कारु हुलास यादव](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/mh-pal-01-nalasopara-ats-vis-mh10065_18092022160859_1809f_1663497539_358.jpg)
झारखंडमधील नक्षलवाद्याला अटक - नालासोपाऱ्याच्या धानिव बाग राम नगर परिसरातून महाराष्ट्र ATS ने एका नक्षलवाद्याला अटक केली आहे. करू हुलस यादव असे या नक्षल्याचे नाव असून त्यावर 15 लाखाचे इनाम जाहीर करण्यात आले होते. 2004 पासून हा आरोपी झारखंडमधील नक्षलवादी संघटनांमध्ये सक्रिय होता. अनेक अपराधिक घटनांमध्ये त्याचा सहभाग असल्याची माहिती समोर येत आहे. झारखंड मधून उपचारासाठी तो मुंबईत आला होता व नालासोपारा परिसरात लपून राहत होता. याची माहिती महाराष्ट्र ATS ला मिळाल्यानंतर त्यांनी आरोपीच्या राहत्या घरी धाड टाकून त्याला अटक केली. झारखंड पोलिसांना या कारवाईची माहिती देण्यात आली असून अधिक तपास केला जात आहे.