ETV Bharat / city

हिरेन मृत्यू प्रकरणाचा तपास 'एनआयए'कडे, तर वाझेंवर 'युएपीए'

ठाणे न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार, राज्य दहशतवाद विरोधी पथकाने मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणाचा तपास एनआयएकडे हस्तांतरीत केला. तसेच एटीएसने आपल्या ताब्यात असलेले विनायक शिंदे आणि नरेश गोर या दोन्ही आरोपींना बुधवारी एनआयएकडे सोपविले.

हिरेन मृत्यू प्रकरणाचा तपास 'एनआयए'कडे, तर वाझेंवर 'युएपीए' वाचा आज दिवसभरातील अपडेटस्

author img

By

Published : Mar 24, 2021, 8:31 PM IST

Updated : Mar 25, 2021, 9:43 AM IST

मुंबई : ठाणे सत्र न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणाचा सर्व तपास आता एनआयए करणार आहे. कोर्टाच्या आदेशानंतर राज्य दहशतवाद विरोधी पथकाने या प्रकरणी अटक केलेल्या दोन्ही आरोपींना एनआयएकडे सुपूर्द केले. तसेच हा तपासही एनआयएकडे हस्तांतरीत केला. दरम्यान, एनआयएने सचिन वाझेंविरोधात युएपीए कायद्याअंतर्गत आरोप लावले आहेत.

एटीएसकडून एनआयएकडे आरोपींचे हस्तांतरण

ठाणे न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार, राज्य दहशतवाद विरोधी पथकाने मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणाचा तपास एनआयएकडे हस्तांतरीत केला. तसेच एटीएसने आपल्या ताब्यात असलेले विनायक शिंदे आणि नरेश गोर या दोन्ही आरोपींना बुधवारी एनआयएकडे सोपविले. यापैकी विनायक शिंदे हा निलंबित पोलीस अधिकारी असून नरेश गोर हा बुकी आहे. आता एनआयएकडून या प्रकरणाचा तपास केला जाणार आहे.

एनआयएकडून वाझेवर युएपीएअंतर्गत गुन्हा दाखल

एनआयएने सचिन वाझेवर युएपीए म्हणजेच बेकायदा कृती प्रतिबंधात्मक कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. सचिन वाझेच्या कोठडीची मुदत 25 मार्च रोजी संपत असल्याने त्याची कोठडी वाढवून घेण्यासाठी एनआयएने विषेश न्यायालयात तातडीने अर्ज दाखल केला. यावेळी हे एक मोठे षडयंत्र असून यात अनेक लोकांचा सहभाग असण्याचा संशय असल्याचे एनआयएने कोर्टात म्हटले आहे.

दरम्यान, युएपीए हा बेकायदा कृत्ये रोखण्यासाठीचा अत्यंत कठोर तरतुदी अंतर्भूत असलेला कायदा आहे. हा कायदा संपूर्ण देशात लागू होतो. या कायद्याद्वारे एनआयए कोणत्याही दहशतवादी कारवायांमध्ये सहभागी असलेल्या संशयित आरोपीला दहशतवादी घोषित करू शकते. या कायद्यानुसार कारवाई झाल्यास सचिन वाझेंची सर्व संपत्तीही जप्त होऊ शकते.

रियाज काझी बनणार माफीचा साक्षीदार

सचिन वाझे यांचे अत्यंत जवळचे सहकारी समजले जाणारे रियाज काझी हे आता माफीचा साक्षीदार बनणार आहेत. त्यामुळे सचिन वाझेंच्या अडचणी वाढल्याचे बोलले जात आहे. अँटिलीया स्फोटक प्रकरण आणि मनसुख हिरेन खून प्रकरणाच्या चौकशीत ते वाझेंचे सहयोगी अधिकारी होते. रियाझ काझी यांना अंबानींच्या घराजवळ स्फोटके ठेवण्यापासून ते मनसुखची हत्या करण्यापर्यंतच्या घटनांची माहिती आहे. म्हणूनच, काझी माफीचा साक्षीदार बनल्याने सचिन वाझेंच्या अडचणी वाढल्याचे बोलले जात आहे. सचिन वाझे यांच्या सांगण्यावरूनच सर्व घटना घडवून आणल्याचे काझी यांनी एनआयएच्या चौकशीदरम्यान सांगितले आहे.

सोने व्यापाऱ्याने भरले वाझेचे हॉटेल बिल

मुंबईतील ट्रायडेंट या पंचतारांकित हॉटेलमध्ये सचिन वाझेच्या वास्तव्याचे बिल मुंबईतील एका सोने व्यापाऱ्याने भरल्याचे समोर आले आहे. मनिष छाचड असे या व्यापाऱ्याचे नाव असून या संदर्भात एनआयएने त्याची चौकशी केली आहे. ट्रायडेंट हॉटेलमध्ये सचिन वाझे सुशांत सदाशिव खामकर नावाच्या बनावट आधार कार्डच्या आधारे एका अलिशान खोलीमध्ये राहत होता. या बनावट आधार कार्डचा नंबर 72825 2857 6822 असा आहे. वाझेच्या वास्तव्याचे सुमारे 13 लाखांचे बिल मनिष छाचडने एका ट्रॅव्हल एजन्सीच्या माध्यमातून भरल्याचे समोर आले आहे.

हेही वाचा - सचिन वाझे प्रकरणात एपीआय रियाज काझी बनणार 'माफीचा साक्षीदार'

Last Updated : Mar 25, 2021, 9:43 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.