ETV Bharat / city

फेसबुकवर महिलेशी मैत्री करणे पडले 40 लाखात, दिल्लीतून सात आरोपींना अटक

author img

By

Published : Nov 3, 2020, 12:19 PM IST

मुंबईतील तक्रारदार प्रकाश नारायण जाधव या व्यक्तीची फेसबुकवर मर्सी ग्रेस या महिलेच्या नावाने असलेल्या अकाऊंट-वापरकर्त्यासोबत फेब्रुवारी 2020 मध्ये मैत्री झाली होती. मर्सी ग्रेस अमेरिकन आर्मीमध्ये कॅप्टन पदावर नियुक्त असल्याचे भासवण्यात आले होते. टप्प्याटप्प्याने वेगवेगळ्या बँकांमध्ये जवळपास 39 लाख 80 हजारांची रक्कम तक्रारदाराने भरल्यानंतर फेसबुकवरील बनावट प्रोफाईल असलेल्या मर्सी ग्रेस या नावाने अकाऊंट चालवणाऱ्या भामट्याने तक्रारदार प्रकाश यांच्याशी संपर्क साधणे बंद केले.

मुंबई फेसबुकवरून आर्थिक फसवणूक न्यूज
मुंबई फेसबुकवरून आर्थिमुंबई फेसबुकवरून आर्थिक फसवणूक न्यूजक फसवणूक न्यूज

मुंबई - फेसबुकवर एका अनोळखी महिलेशी मैत्री करणे मुंबईतील एका व्यक्तीला महागात पडले आहे. समाज माध्यमांवर मैत्री केल्यानंतर आर्थिक व्यवहारांच्या भूलथापांना बळी पडून लाखो रुपयांना लुटले जाण्याचे प्रकार सध्या सतत घडत आहेत. असाच काहीसा प्रकार मुंबईतील डोंगरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलेला आहे.

फेसबुक मैत्री झाली, स्वतः अमेरिकन आर्मीत असल्याचे सांगून केली फसवणूक

मुंबईतील तक्रारदार प्रकाश नारायण जाधव या व्यक्तीची फेसबुकवर मर्सी ग्रेस या महिलेच्या नावाने असलेल्या अकाऊंट-वापरकर्त्यासोबत फेब्रुवारी 2020 मध्ये मैत्री झाली होती. लॉकडाऊन दरम्यान सतत एकमेकांशी बोलत असताना मर्सी ग्रेस या नावाने असलेल्या वापरकर्त्याने ती अमेरिकन आर्मीमध्ये कॅप्टन पदावर नियुक्त असून अफगाणिस्तानमध्ये पोस्टिंग दरम्यान मिळवलेला पैसा भारतात व्यवसायात गुंतवायचा असल्याचे या वापरकर्त्याने महिलेचे अकाऊंट असल्याचे भासवत तक्रारदार प्रकाश जाधव यांना सांगितले होते. यासाठी प्रकाश जाधव यांना सदरची रक्कम बँक खात्यात पाठवते, अस सांगून व्यवसाय उभारण्यासाठी मुंबईतील स्थानिक नागरिक म्हणून मदत करण्यासाठी तिने तक्रारदाराला विनंती केली होती.

पैसे बँकेत पाठवले आहेत, स्थानिक टॅक्स भरण्यास सांगितले

या अकाऊंटच्या वापरकर्त्याने तक्रारदारासोबत भागीदारीत शॉपिंग मॉल सुरू करण्यास उत्सुक असल्याचे भासवले. यासाठी अफगाणिस्तानमधून एक मोठी रक्कम तक्रारदाराच्या बँक अकाउंटमध्ये आपण ट्रान्सफर करत असल्याचे सांगण्यात आले होते. यासाठी बनावट मनी ट्रान्सफर रिसीट बनवून तक्रारदारास व्हॉटस् अ‌ॅपवर पाठवण्यात आलेले होते. मात्र, हे पैसे बँक खात्यात क्रेडिट करण्यासाठी स्थानिक कर भरावा लागेल, त्यासाठी एका वेगळ्या अकाऊंटचे डिटेल्स तक्रारदारास देण्यात आले होते. यानंतर, मर्सी ग्रेस हे अकाऊंट चालवणाऱ्या व्यक्तीने प्रकाश जाधव यांच्याकडून टप्प्याटप्प्याने 39 लाख 80 हजार रुपये वेगवेगळ्या बँकेत मागून घेतले होते.

पैसे भरल्यानंतर संपर्क साधणे बंद

टप्प्याटप्प्याने वेगवेगळ्या बँकांमध्ये जवळपास 39 लाख 80 हजारांची रक्कम तक्रारदाराने भरल्यानंतर फेसबुकवरील बनावट प्रोफाईल असलेल्या मर्सी ग्रेस या नावाने अकाऊंट चालवणाऱ्या भामट्याने तक्रारदार प्रकाश यांच्याशी संपर्क साधणे बंद केले. यामुळे संशय आल्याने यासंदर्भात डोंगरी पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल करण्यात आलेली होती. पोलिसांनी यामध्ये तपास केला असता सदरच्या या गुन्ह्यामागे एक टोळी कार्यरत असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. यातील काही जण हे दिल्लीमध्ये राहत असल्याचे कळल्यानंतर पोलिसांनी गुन्हेगारांना अटक करण्यासाठी विशेष पथकाची नेमणूक केली होती.

सात आरोपींना अटक

या प्रकरणी पोलिसांनी सात आरोपींना अटक केली असून यामध्ये नीरज रमेश वर्मा (वय 23), साबीर सिकंदर (वय 26), मनमोहन सिंग (वय 28 ), चन्‍द्रपाल नेत्रम शर्मा (वय 49), आसिफ शमशुद्दीन शेख (वय 23), वसीम अहमद खान (वय 32) व जेम्स कनोबी ओबीबुलं या आफ्रिकन आरोपीचा समावेश आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.