ETV Bharat / city

Ashish Shelar Threatened : आशिष शेलारांना जीवे मारण्याची धमकी देणारा माहिममधून अटकेत - आशिष शेलारांना धमकी देणारा अटकेत

भाजपचे नेते आणि आमदार आशिष शेलार (Ashish Shelar) यांना कुटुंबासह जीवे मारण्याची धमकी (Threatening to Kill) देण्यात आली होती. धमकी देणाऱ्या व्यक्तीला माहिम (Mahim) येथून अटक करण्यात आली आहे.

BJP leader Ashish Shelar
भाजप नेते अशिष शेलार
author img

By

Published : Jan 8, 2022, 11:58 PM IST

मुंबई - भाजपचे नेते आणि आमदार आशिष शेलार (Ashish Shelar) यांना कुटुंबासह जीवे मारण्याची धमकी (Threatening to Kill) देण्यात आली होती. धमकी देणाऱ्या व्यक्तीला माहिम (Mahim) येथून अटक करण्यात आली आहे. ओसामा शमशद खान असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. ओसामावर यापूर्वी देखील अनेक गुन्हे दाखल असल्याची माहिती समोर आली आहे.

  • आशिष शेलार यांनी पोलिसात दिली होती तक्रार -

आशिष शेलार यांना सतत दोन वेगवेगळ्या मोबाईल नंबरवरून धमकी देण्यात येत होती. ओसामा त्यांना धमकी देत अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करत होता, अशी माहिती समोर आली आहे. या घटनेनंतर आशिष शेलार यांनी मुंबईचे पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांना शुक्रवारी पत्र लिहून तक्रार केली होती. दोन्ही मोबाईल नंबरची माहिती देऊन याबाबत तपास करण्याची विनंती आशिष शेलार यांनी पोलिसांना केली होती. ही तक्रार प्राप्त झाल्यानंतर मुंबई गुन्हे शाखेच्या युनिट क्रमांक नऊने तपास करून ओसामाला माहिम येथून अटक केली आहे.

  • ...म्हणून देत होता धमकी -

जमिनीच्या एका व्यवहारात ओसामा निराश झाला होता. या प्रकरणात त्याच्या मुलावर हत्येच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यामुळे त्याने हे कृत्य केले असे पोलीस अधिकार्‍यांनी सांगितले आहे. ओसामाचा मुलगा दोन महिन्यांपासून तुरुंगात असल्याने त्याने बांद्रा पश्चिमचे आमदार शेलार यांना मोबाईलवरून धमकी देत होता, असे पोलीस अधिकार्‍यांनी सांगितले आहे.

यापूर्वीही २०२० मध्ये अशाच प्रकारे शेलार यांना धमकी देण्यात आली होती. वांद्रे पोलिसांनी या प्रकरणात मुंब्रा येथून आरोपीला अटक केली होती. तर, यापूर्वी शेलार आणि अन्य दोन व्यक्तींची रेकी केल्याचे समोर आले होते. आता दहशतवाद्यांकडून नागपूरमधील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालयाची रेकी करण्यात आल्याचे उघड झाले आहे. त्याच दरम्यान आशिष शेलार यांना धमकीचे फोन येत होते,

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.