ETV Bharat / city

महाविकास आघाडीची 'महाराष्ट्र एक्स्प्रेस' आता अधिक गतिमान होणार - अशोक चव्हाण - Leader of Opposition Devendra Fadnavis

विधान विधान परिषदेच्या शिक्षक आणि पदवीधर मतदारसघांतील पाच जागांसाठी झालेल्या निवडणुकीत महाविकास आघाडीचे तीन उमेदवार विजयी झाले आहेत.

सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण
सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण
author img

By

Published : Dec 4, 2020, 7:43 PM IST

मुंबई - विधान परिषद निवडणुकीचे निकाल राज्य सरकारला अधिक भक्कम करणारे आणि आत्मविश्वास दुणावणारे आहे. या निकालांमुळे महाविकास आघाडीची महाराष्ट्र एक्स्प्रेस अधिक गतिमान होणार आहे, असे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी म्हटले आहे. विधान विधान परिषदेच्या शिक्षक आणि पदवीधर मतदारसघांतील पाच जागांसाठी झालेल्या निवडणुकीत महाविकास आघाडीचे तीन उमेदवार विजयी झाले आहेत. पदवीधर मतदारसंघातील पुणे, औरंगाबाद आणि नागपूर या तिन्ही जागा महाविकास आघाडीने जिंकल्या आहेत.

महाविकास आघाडीची 'महाराष्ट्र एक्सप्रेस' देखील सुसाट होईल-

आजच्या निवडणूक निकालांवर प्रतिक्रिया व्यक्त करताना चव्हाण म्हणाले, की राज्यातील सरकारच्या स्थापनेनंतर थेट जनतेतून होणारी ही पहिलीच निवडणूक आहे. या निवडणुकीत जनतेने महाविकास आघाडीच्या उमेदवारांना कौल दिला. राज्य सरकारवर आपला विश्वास व्यक्त केला तर भाजपचा सपशेल पराभव केला. या निवडणुकीत कोल्हापूरपासून गोंदियापर्यंत एकूण २४ जिल्ह्यात थेट जनतेतून मतदान झाले व सर्वच्या सर्व पाचही मतदारसंघात भाजपाची पिछेहाट झाली. कोल्हापूर व गोंदिया या शहरांना जोडणाऱ्या महाराष्ट्र एक्स्प्रेसप्रमाणे आता महाविकास आघाडीची 'महाराष्ट्र एक्सप्रेस'देखील सुसाट होईल.

या निकालांनी राज्य सरकारचे हात अधिक बळकट झाले-

विधान परिषद निवडणुकीत काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना या तिन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांनी एकदिलाने काम केले. त्यामुळेच मागील अनेक वर्ष भारतीय जनता पक्षाचा बालेकिल्ले म्हणून ओळखले जाणारे नागपूर व पुणे पदवीधर मतदारसंघ महाविकास आघाडीने जिंकले. औरंगाबाद पदवीधर मतदारसंघात भाजपाच्या तुलनेत महाविकास आघाडीला दुप्पट मते मिळाली, तर पुणे शिक्षक मतदारसंघातही महाविकास आघाडी समोर आहे. या निकालांनी राज्य सरकारचे हात अधिक बळकट झाल्याचे अशोक चव्हाण यांनी सांगितले.

आम्ही आत्मपरिक्षण करू - देवेंद्र फडणवीस

विधान परिषद निवडणुकीत सपाटून मार खाल्ल्यानंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. 'आम्हाला पराभव मान्य असून, त्याचे नक्कीच आत्मपरीक्षण करू. मात्र, खरे आत्मपरीक्षण करण्याची गरज मुख्यमंत्री असलेल्या शिवसेनेला आहे,' असे फडणवीस म्हणाले आहेत. महाविकास आघाडीत असलेल्या काँग्रेस आणि राष्ट्रवादीला फायदा झाला. मात्र, शिवसेनेला एकही उमेदवार निवडून आणता आला नाही, अशी टीकाही त्यांनी केली.

पदवीधर मतदारसंघातील तिन्ही जागा महाविकास आघाडीला

पुणे पदवीधर मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसच्या अरुण लाड यांनी विजय मिळवला आहे. नागपूर पदवीधर मतदारसंघात काँग्रेसचे उमेदवार अभिजित वंजारी विजयी झाले. औरंगाबाद पदवीधर मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचे सतिश चव्हाण विजयी झाले. एकूणच पदवीधर मतदारसंघातील तिन्ही जागा महाविकास आघाडीला मिळाल्या असून दोन जागांवर राष्ट्रवादी काँग्रेस आणि एका जागेवर काँग्रेसचा उमेदवार विजयी झाला.

पुणे आणि अमरावती शिक्षक मतदारसंघातील अंतिम निवडणूक निकाल अद्याप हाती आलेला नाही. पुणे शिक्षक मतदारसंघात महाविकास आघाडीचा उमेदवार आघाडीवर असून अमरावती शिक्षक मतदारसंघात अपक्ष उमेदवार आघाडीवर आहे. पदवीधर, शिक्षक मतदारसंघ निवडणुकीसोबतच धुळे-नंदुरबार या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या कोट्यातील एका जागेवरील पोटनिवडणुकीचा निकाल जाहीर झाला. तेथे भाजपचे अमरीश पटेल विजयी झाले आहेत.

हेही वाचा- विधान परिषद निवडणूक : ५८ वर्षांनी भाजपच्या बालेकिल्ल्याला नागपुरात खिंडार, पुण्याचाही गड केला काबिज

हेही वाचा- नागपूर पदवीधर निवडणूक: मतदार नोंदणीत आघाडी घेतल्यानेच माझा विजय- अभिजित वंजारी

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.