ETV Bharat / city

Deepak Kesarkar Letter to CM : भाजपसोबत युती करा; दिपक केसकर यांचे मुख्यमंत्र्याना पत्र - eknath shinde news

शिवसेनाप्रमुखांच्या विचारांचा हा लढा ( battle of ideas Shiv Sena chief ) आहे, शिवसेनेच्या अस्तित्त्वाचा आहे, मराठी आणि हिंदूत्त्वाच्या अस्मितेचा आहे, हे बंड नाही, हा शिवसेनेच्या आत्मसन्मानाचा लढा असल्याचे त्यांनी पत्रात लिहले आहे. उद्धव ठाकरेनी अमच्या भूमीकेचा विचार करून भाजप सोबत युती करण्याची विनंती त्यांनी या पत्रात केली आहे. शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर ( Shinde group spokesperson Deepak Kesarkar ) यांनी आता भाजप, सेना युतीसाठी पत्र लिहाल ( Letter for BJP, Sena alliance ) आहे. या पत्रातून ही सन्मानाची लढाई असून बंडाची लढाई नाही असे म्हटले आहे. तसेच या पत्रातून शिवसेना खासदार संजय राऊत ( Shiv Sena MP Sanjay Raut ) यांच्या बाबत तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली आहे.

Letter from Deepak Keskar to the Chief Minister
दिपक केसकर यांचे मुख्यमंत्र्याना पत्र
author img

By

Published : Jun 27, 2022, 6:17 PM IST

मुंबई - शिवसेनाप्रमुखांच्या विचारांचा हा लढा ( battle of ideas Shiv Sena chief ) आहे, शिवसेनेच्या अस्तित्त्वाचा आहे, मराठी आणि हिंदूत्त्वाच्या अस्मितेचा आहे, हे बंड नाही, हा शिवसेनेच्या आत्मसन्मानाचा लढा असल्याचे त्यांनी पत्रात लिहले आहे. उद्धव ठाकरेनी अमच्या भूमीकेचा विचार करून भाजप सोबत युती करण्याची विनंती त्यांनी या पत्रात केली आहे. शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर ( Shinde group spokesperson Deepak Kesarkar ) यांनी आता भाजप, सेना युतीसाठी पत्र लिहाल ( Letter for BJP, Sena alliance ) आहे. या पत्रातून ही सन्मानाची लढाई असून बंडाची लढाई नाही असे म्हटले आहे. तसेच या पत्रातून शिवसेना खासदार संजय राऊत ( Shiv Sena MP Sanjay Raut ) यांच्या बाबत तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली आहे.

  • हिंदूत्त्वाच्या रक्षणासाठी...

    बंड नव्हे,

    शिवसेनेच्या आत्मसन्मानाचा लढा!

    - दीपक केसरकर#mieknathshinde pic.twitter.com/y9Hfy5U7Po

    — Deepak Kesarkar (@dvkesarkar) June 27, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

बाळासाहेब ठाकरेंचे शिवसैनिक - गेल्या पाच दिवसांपासून महाराष्ट्राचे राजकारण ढवळून निघाले आहे. शिवसेनेचे 40 पेक्षा अधिक अमदारांनी बंडखोरी करीत गुवाहटी गाठले आहे. त्यावर आता ट्विटर युध्द सुरू झाले आहे. शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यामुळे महाविकास आघाडी सरकार संकटात सापडले आहे. त्यावर दिपक केसकर यांनी एक पत्र ट्विट केले आहे. आम्ही वंदतीय शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंचे शिवसैनिक काही काळासाठी बाहेर काय पडलो तर, घाण ठरलो का असा प्रश्न त्यानी पत्रात उपस्थित केला आहे. आमच्याच भरवशावर राज्यसभेत बसणारे रोज विखारी भाषा बोलता आहेत. आता तर आमच्या मृतदेहांची त्यांना आस लागली लागल्याचे ते पत्रात म्हणाले. अम्ही गुवाहाटीत बसून शिवसेनेचा आवाज बुलंद करण्याचे तेच खरे कारण आहे. तीच या सन्मानाच्या लढाईची पार्श्वभूमी आहे. हे बंड नाही तर ही शिवसेनेच्या आत्मसन्मानाची लढाई असल्याचे केसकर म्हणाले. आजच्या नेतृत्त्वाला हे समजूनही उमजत नाही, हेही आमचे मोठे दुःख आहेच. आज आम्हाला विकले गेलेले ठरविणारे कोण?असा सवाल त्यांनी पक्षप्रमुखांना विचाला.

शिवसेना, भाजपाची युती अतिशय जुनी - आज जी परिस्थिती उद्भवली, त्याची पाळेमुळे जुनी आहेत. शिवसेना, भाजपाची युती अतिशय जुनी आहे. २०१४ मध्ये लोकसभा निवडणूक आम्ही एकत्रित लढलो होतो. त्यामुळे आम्ही विजयी झालो. शिवसेनेची ताकद होतीच, पण सोबतच नरेंद्र मोदी यांचे नेतृत्व तसेच उद्धवजी ठाकरे साहेब यांच्या परिश्रमामुळे शिवसेनेचे १८ खासदार विजयी झाले अल्याची आठवण त्यांनी या प्रत्रात करून दिली. पुढे ते लिहतात की, विधानसभा निवडणूक सुद्धा आम्ही एकत्रित लढविण्याचेच ठरविले होते. त्यावेळी युवानेते आदित्यजी यांनी मिशन १५१+ ची घोषणा केली होती. अशात भाजपाने १४० जागांचा प्रस्ताव दिला होता. मात्र, भाजपाने १२७ जागा घ्यायच्या तसेच शिवसेनेला १४७ जागा द्यायच्या, यावर शिक्कामोर्तब झाले होते. पण, चार जागांचा आग्रह काही सोडण्यात आला नाही. शेवटी जे व्हायला नको, तेच झाले. दीर्घकाळाची युती तुटली त्यामुळे आम्हाला वेगवेगळ्या निवडणुका लढाव्या लागल्याचे त्यांनी नमुद केले आहे.

लढा सत्तेसाठी नाही - सत्तेत आम्ही होतो मात्र, संजय राऊतांच्या सल्ल्याने अख्खा पक्ष शरद पवारांच्या दावणीला बांधायचा असेल तर मग शिवसेनेचे अस्तित्त्व काय ? असा प्रश्न त्यांनी विचारला आहे. ज्या काश्मीर प्रश्नी कलम ३७० च्यावेळी उघडपणे आम्हाला का बोलू दिले नाही? सोनिया गांधी, शरद पवारांना खुश करण्याच्या नादात आम्ही आमचा आत्मसन्मान घालवायचा का? सर्व महत्त्वाची खाती काँग्रेस, राष्ट्रवादीला देऊन टाकायची मुख्यमंत्रीपद तेवढे ठेवायचे. दाऊदशी संबंध असल्याचा आरोप झालेल्या मंत्र्याचा बचाव करायचा तरी कसा? असा थेट सवाल त्यांनी पत्राद्वारे उद्धव ठाकरेंना विचारला आहे.

संजय राऊत पक्ष संपवायला निघाले - जे कधीही जनतेतून निवडून आले नाहीत, ते संजय राऊत पक्ष संपवायला निघाल्याचा घनाघाती आरोप केसरकर यांनी केला आहे. संजय राऊत हेच शरद पवारांच्या गळ्यातील ताईत आहेत. भाजपापासून तुम्ही शिवसेना कदाचित दूर नेऊ शकाल. पण, शिवसेना जर हिंदूत्वापासून दूर नेणार असाल तर ते आम्ही कसे खपवून घ्यायचे? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. संजय राऊतांचे ऐकून पक्ष चालणार असेल आणि जनतेतून निवडून येणाऱ्या आमदारांना दूर ढकलले जाणार असेल तर करायचे तरी काय? उद्धव ठाकरे आणि आमच्यात दरी वाढविण्याचे पॉप संजय राऊतांनी केल्याचा आरोप त्यांनी केला केला. राष्ट्रवादी काँग्रेसच्या बड्या नेत्यांनी बंदूक चालवायची, खांदा संजय राऊतांचा वापरायचा आणि त्यातून मारले जाणार कोण तर शिवसैनिकच असे ते म्हणाले. हे आम्हाला मान्य नसल्याने हा लढा आम्ही उभारला आहे. शिवसेनाप्रमुखांच्या विचारांचा हा लढा आहे, शिवसेनेच्या अस्तित्त्वाचा आहे, मराठी आणि हिंदूत्त्वाच्या अस्मितेचा आहे, हे बंड नाही, हा शिवसेनेच्या आत्मसन्मानाचा लढा असल्याचे त्यांनी पत्रात लिहले आहे. उद्धव ठाकरेनी अमच्या भूमीकेचा विचार करून भाजप सोबत युती करण्याची विनंती त्यांनी या पत्रात केली आहे.

हेही वाचा - Maharashtra Political Crisis : बंडखोरांना दिलासा, सर्वोच्च न्यायालयाची नरहरी झिरवळांना नोटीस

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.