ETV Bharat / city

तुकाराम मुंढेंची चार आयएएस अधिकाऱ्यांसह पुन्हा बदली - Tukaram Mundhe latest news

आयएएस तुकाराम मुंढे यांची काही महिन्यांपूर्वी नागपूर महापालिका आयुक्तपदावरून बदली करण्यात आली होती. त्यांच्याकडे मुंबईत महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे सदस्य सचिवपदी जबाबदारी देण्यात आली होती. ही नेमणूक होऊन पाच महिनेदेखील पूर्ण होण्याआधी त्यांची पुन्हा एकदा बदली करण्यात आली आहे.

तुकाराम मुंढे
तुकाराम मुंढे
author img

By

Published : Jan 14, 2021, 1:22 AM IST

Updated : Jan 14, 2021, 3:29 AM IST

मुंबई- राज्य सरकारने चार सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत. यामध्ये करड्या शिस्तीसाठी प्रसिद्ध असलेल्या तुकाराम मुंढेंचाही समावेश आहे. तुकाराम मुंढे यांच्याकडील महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या सदस्य सचिवपदावरून नव्या ठिकाणी बदली करण्यात आली आहे.

आयएएस तुकाराम मुंढे यांची काही महिन्यांपूर्वी नागपूर महापालिका आयुक्तपदावरून बदली करण्यात आली होती. त्यांच्याकडे मुंबईत महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे सदस्य सचिवपदी जबाबदारी देण्यात आली होती. ही नेमणूक होऊन पाच महिनेदेखील पूर्ण होण्याआधी त्यांची पुन्हा एकदा बदली करण्यात आली आहे.

हेही वाचा-'१५ वर्षात १५ बदल्या.. मुंढे यांनी लोकप्रतिनिधींना सोबत घेऊनच पुढील वाटचाल करावी'

तुकाराम मुंढे यांच्याबद्दल राजकीय नेत्यांमध्ये नेहमी असते नाराजी

तुकाराम मुंढे हे शिस्तप्रिय अधिकारी म्हणून ओळखले जातात. त्यांच्या कडक स्वभावामुळे व नियमांच्या चोख पालनामुळे अनेकदा राजकीय नेत्यांचे व त्यांचे खटकेदेखील उडालेले पाहायला मिळाले होते. नाशिक महापालिकेतही मनपा पदाधिकाऱ्यांनी त्यांच्या बदलीसाठी वारंवार मागणी केली होती.

तुकाराम मुंढे यांची १६ वर्षातील १६ वी बदली-

प्रशासकीय अधिकारी तुकाराम मुंढे नागपूरचे महानगर पालिकेचे आयुक्त म्हणून २८ जानेवारीला रुजू झाले होते. केवळ ७ महिन्यात त्यांची बदली करण्यात आली होती. महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांची बदली व्हावी, अशी मागणी सत्ताधारी पक्ष म्हणून आम्ही कधीही केली नव्हती. त्यांच्या बदलीमागील कारणांचा उलगडा राज्य सरकारने करावा, अशी मागणी नागपूरचे महापौर संदीप जोशी यांनी केली होती.

हेही वाचा-तुकाराम मुंढेंच्या समर्थनार्थ नागपूरकर रस्त्यावर; बदली रद्द करण्याच्या दिल्या घोषणा

पुढील अधिकाऱ्यांच्या बदल्या
अरविंद कुमार, आयएएस एमडी, एमपीसीएल, मुंबई यांना अतिरिक्त मुख्य सचिव (सहकार), सहकार, पणन आणि वस्त्रोद्योग मंत्रालय, मुंबई येथे नियुक्त केले गेले आहे.
तर तुकाराम मुंढे यांना राज्य मानवाधिकार आयोग सचिव म्हणून नियुक्त केले गेले आहे. डी. बी. गवाडे यांना सहसचिव म्हणून सार्वजनिक आरोग्य विभाग, मंत्रालय, येथे नियुक्त करण्यात आले आहे. उदय जाधव यांची मुख्य कार्यकारी अधिकारी, नॅशनल रूरल लाइव्हहुल्ड मिशन, महाराष्ट्र राज्य बाल हक्क आयोग, सचिव म्हणून नियुक्त करण्यात आली आहे.

Last Updated : Jan 14, 2021, 3:29 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.