मुंबई - महाराष्ट्र वस्तू, सेवाकर विभागाने ( Maharashtra Goods, Service Tax Department ) करचुकवेगिरी करणाऱ्या दोन व्यक्तींना अटक केली आहे. खोटे खरेदीचे बिजके प्राप्त द्वारे शासनाची करोडो रुपयाची महसूल बुडवणाऱ्या ( Crores of lost revenue ) व्यक्तींना अटक करण्यात आली होती. या दोन्हीही आरोपींना न्यायालयासमोर हजर केले असता 3 ऑगस्टपर्यंत न्यायालयीन कोठडीत ( judicial custody ) रवानगी केली आहे.
आरोपींना अटक - खोटी खरेदीची बिजके प्राप्त करून शासनाची करोडो रुपयांची महसूलहानी करणाऱ्या करदात्यास वस्तू व सेवाकर विभागाकडून मुंबईत ( GST scam case in Mumbai ) अटक करण्यात आली आहे. पाकीजा स्टिल कंपनीचे ( Pakija Steel Company ) भागीदार आणि मायल स्टिल प्रा.लि. चे संचालक सय्यद तैकीर हसन रिजवी यांनी या प्रकरणामध्ये वस्तूंच्या वा सेवांच्या पुरवठ्याशिवाय 185 कोटी रुपयांची बनावट बीजके प्राप्त करुन 22 कोटी रुपयांची बनावट वजावट मिळविल्याप्रकरणी दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे. ही कारवाई महाराष्ट्र वस्तू व सेवाकर विभागाने करचुकवेगिरी प्रकरणी ( Arrested in tax evasion case ) केली आहे.
हेही वाचा - Viral video : चक्क बापानेच पाजली मुलांना दारू, अमरावती जिल्ह्यातील धक्कादायक प्रकार
185 कोटी रुपयांची खोटी खरेदी - सय्यद तैकीर हसन रिजवी यांनी पाकीजा स्टिल एलएलपी आणि मे. मायल स्टिल प्रा. लि. या दोन बोगस कंपन्यांच्या माध्यमातून सुमारे 185 कोटी रुपयांची खोटी खरेदीची बिजके प्राप्त केली आहेत. त्यातून या व्यक्तीने शासनाची सुमारे 22 कोटी रुपयांची महसूल हानी केल्याचे प्रथमदर्शनी आढळून आले आहे. या प्रकरणामध्ये वस्तू व सेवांचा पुरवठा न करता महाराष्ट्र वस्तू व सेवाकर अधिनियम 2017 च्या तरतुदींचे उल्लंघन केले गेले आहे.
हेही वाचा - Assault on youth : क्षुल्लक वादातून तरूणावर कोयत्याने सपासप वार; हल्लेखोरांविरोधात गुन्हा