मुंबई - सामान्यांसाठी मुंबई लोकल सुरू व्हावी या मागणीसाठी भाजपाने आक्रमक भूमिका घेतली आहे. आज मुंबईत भाजपा नेत्यांच्या नेतृत्वात यासाठी ठिकठिकाणी रेल्वेस्थानकांवर आंदोलन केले. त्या पार्श्वभूमीवर मुंबई उपरनगराचे पालकमंत्री आदित्य ठाकरे यांनी लोकल सुरू करण्याबाबत सूचक वक्तव्य केले आहे. मुंबईत सर्व सामान्यांसाठी लोकल सुरू करण्याबाबत दोन-तीन आठवड्यापासून चर्चा सुरू आहे. पुढच्या एक दोन दिवसात लोकल संदर्भात निर्णय होईल, अशी प्रतिक्रिया आदित्य ठाकरे यांनी दिली आहे. तसेच ज्यांनी कोरोना प्रतिबंधात्मक लसीचे दोन्ही डोस घेतलेल्यांना केवळ लोकलच नाही तर इतर गोष्टीत सूट देता येईल का याबाबत विचार सुरू असल्याचेही ठाकरे म्हणाले.
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत सर्व सामान्यांसाठी लोकल बंद करण्यात आलेली लोकल सेवा सुरू कऱण्यासाठी भाजपाच्या वतीने आंदोलन करण्यात येत आहे. मात्र, लोकसेवा सुरू करण्याबाबत शुक्रवारी मुख्यमंत्री ठाकरे यांनी राज्य सरकार जबाबदारीने लोकल सेवा सुरू कऱण्याचा निर्णय घेईल असे सांगितले होते. त्यानंतर आज मंत्री आदित्य ठाकरे यांनी देखील सर्वसामान्यांसाठी लोकलसेवा सुरु करण्याच्या बाबतीत प्रतिक्रिया दिली आहे. लोकल सेवा सुरू होईल त्यासोबत इतरही सेवा देण्यात येतील मात्र, हे करत असताना कोरोनाच्या विषाणूमुळे बाधितहोऊन रुग्णांनी हॉस्पिटल भरले नाही पाहिजे. लोकांंना कोरोना प्रादुर्भाव होणार नाही, याचीही काळजी सरकार घेत असल्याचे ठाकेर म्हणाले. तसेच विरोधकांनी आंदोलन करावे पण परिस्थिती समजून घ्यावी, लोकल सेवा सुरू न कऱण्याबाबत राजकारण नाही. लोकांचे जीव वाचवणे गरजेचे असल्याचे मत आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केले.
पर्यावरण जपावे लागणार आहे-
२००५ पासून मिठीचे महत्व कळायला लागले आहे. सध्या मिठी नदीचे रूपांतर नाल्यात झाले आहे. आम्ही तर बाजूलाच राहतो, पूर यायला लागला की आम्हालाही भिती वाटते. पाण्यावर तरंगणारा कचरा मशिनच्या सहाय्याने बाजूला काढण्यात येणार आहे. मात्र हे चित्र एका रात्रीत बदलता येणार नाही, त्यासाठी ५-६ वर्षे लागतील. वातावरण नाही जपले तर लोकांचे स्थलांतर करावे लागेल, अशी भीती देखील आदित्य ठाकरे यांनी मिठी नदीच्या समस्येवर व्यक्त केली
आज भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची राज यांच्या निवासस्थानी भेट झाली. मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या भेटीला महत्व प्राप्त झाले आहे. याबाबत आदित्य ठाकरे यांना विचारणा केली असता, मला राजकीय बाबींवर बोलायचे नाही. सध्या राज्यात महाविकास आघडी काम करत आहे. आता प्राध्यानाने महापालिका, एसआरए, MMRDA च्या माध्यामातून विकास करणे हे असल्याची प्रतिक्रिया आदित्य ठाकरे यांनी दिली.