मुंबई - राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी शेतकऱ्यांना कृषी पंपासाठी नवीन वीज जोडणीला मंजुरी देण्याचा निर्णय घेतला आहे. सध्या नवीन कृषी पंपासाठी ६७० कोटी रुपये देणार आहेत. तर सध्या कृषीसाठी केवळ रात्रीचा वीज पुरवठा करण्यात येत आहे. दिवसभरात वीज पुरवठा होण्यासाठी सौर पंपासाठी मोठा निधी देण्याची घोषणा केली आहे.
शेतकऱ्यांना हेलपाटे न करता कर्जमाफी दिल्याचे राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी सांगितले. शेतकऱ्यांना चिंतामुक्त करण्याचा प्रयत्न असल्याचे त्यांनी सांगितले.
- साकोली (भंडारा) नवीन कृषी विद्यापीठ स्थापन करण्यात येणार
- जलसंपदा विभागासाठी १० हजार ३५ कोटी रुपयाची तरतूद
- मृदा संधारणासाठी २ हजार ८१० कोटी
- नियमीत कर्ज भरणाऱ्यांना ५० हजार प्रोत्साहनपर देणार
- सिंचन प्रकल्पांना प्राधान्य देणार, ते पूर्ण करणार
- २ लाखांपेक्षा जास्त कर्ज असणाऱ्यांना दिलासा