ETV Bharat / city

राज्यात बीए व्हेरिएंटचे २८२ नवीन रुग्ण, तर मुंबईत २०३ रुग्ण - corona variant

Maharashtra corona update कोरोनाच्या बीए व्हेरिएंटचा राज्यभरात झपाट्याने प्रसार होत आहे. शुक्रवारी राज्यात बीए ४, ५ व बीए २.७५ चे एकूण २८२ नवीन रुग्णांची नोंद झाली असून यापैकी २०३ रुग्ण मुंबईत BA corona variant आढळल्याने मुंबईसह राज्यात बीए व्हेरिएंटचा धोका वाढत आहे.

Maharashtra corona update
Maharashtra corona update
author img

By

Published : Aug 20, 2022, 7:10 AM IST

Updated : Aug 20, 2022, 10:36 AM IST

मुंबई कोरोनाच्या बीए व्हेरिएंटचा राज्यभरात झपाट्याने प्रसार होत आहे. शुक्रवारी राज्यात बीए ४, ५ व बीए २.७५ चे एकूण २८२ नवीन रुग्णांची नोंद झाली असून Maharashtra corona update यापैकी २०३ रुग्ण मुंबईत आढळल्याने मुंबईसह राज्यात बीए व्हेरिएंटचा BA.4 धोका वाढला आहे. भारतात एका दिवसात कोरोना विषाणूच्या संसर्गाची 13,272 नवीन प्रकरणे समोर New Corona Patients आल्यानंतर, देशातील संक्रिय रुग्णांची संख्या 1,01,166 वर पोहोचली आहे. त्याच वेळी, उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या 1,01,830 वर पोहोचली आहे. आज केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या अद्ययावत आकडेवारीनुसार, देशात संसर्गामुळे आणखी 13900 रुग्ण बरे झाले आहेत. दैनिक सकारात्मकता दर 4.21 टक्के आहे.

बी ए व्हेरिएंटचा प्रसार कोरोनाच्या बीए ४, बीए ५ व बीए २.७५ व्हेरिएंटचा प्रसार राज्यात झपाट्याने होत आहे. जीनोम सिकवेन्सिंग चाचण्यांच्या अहवालानुसार बी ए २.७५ या व्हेरियंटचे प्रमाण सध्या वाढताना दिसत आहे. याआधी राज्यात बी ए २.३८ व्हेरियंटचे रुग्ण मोठ्या संख्येने आढळून येत होते. त्यात आता घट होत आहे. या सर्व रुग्णाचा साथरोग शास्त्रीय आढावा घेण्यात येत आहे. BA corona variant राज्यात आतापर्यंत आढळलेल्या बीए.४ आणि बीए.५ रुग्णांची संख्या ३४८ तर बीए. २.७५ रुग्णांची संख्या ४५९ वर पोहोचली आहे. इन्साकॉग अंतर्गत ७ प्रयोगशाळांच्या मार्फत कोविड विषाणूचे जिनोम सिकवेन्सिंग सर्वेक्षण नियमित सुरु आहे. १० ते १९ ऑगस्ट २०२२ या कालावधीतील विविध प्रयोगशाळांच्या अहवालानुसार राज्यात बी ए.४ आणि ५ चे तर बी ए.२.७५ चे रुग्ण आढळून आले आहेत.

जिल्हा निहाय बी ए.४ आणि ५ चे रुग्ण पुणे २३५, मुंबई ७२, ठाणे १६, रायगड आणि नागपूर प्रत्येकी ७, सांगली ६, पालघर ४, कोल्हापूर १

जिल्हा निहाय बी ए.२.७५ चे रुग्ण पुणे २३४, मुंबई १३१, नागपूर ४४, यवतमाळ १९, चंद्रपूर १७, सोलापूर ९, अकोला आणि वाशिम प्रत्येकी २, सांगली

मुंबईत काल १०११ नवे रुग्ण कोरोना रुग्ण मुंबईत १० ऑगस्ट ते १४ ऑगस्टला रोज ८०० हुन अधिक, १७ ऑगस्टला ९७५ रुग्णांची नोंद Mumbai Corona Update झाली होती. १८ ऑगस्टला त्यात वाढ होऊन १२०१ रुग्णांची नोंद झाली. आज शुक्रवारी त्यात किंचित घट होऊन १०११ रुग्णांची 1011 Corona patients recorded 19 august नोंद झाली आहे. तसेच आज २ मृत्यूची नोंद झाली आहे. मुंबईत सध्या ५०९ बेडवर रुग्ण असल्याची माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे.

१०११ नवे रुग्ण : मुंबईत आज १९ ऑगस्टला १३,४६८ चाचण्या करण्यात आल्या. त्यात १०११ रुग्णांची नोंद झाली. आज २ मृत्यूंची नोंद झाली आहे. ८६९ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत एकूण ११ लाख ३६ हजार ६९१ रुग्णांची नोंद झाली आहे. त्यापैकी ११ लाख ११ हजार १६७ रुग्ण बरे झाले आहेत. तर १९ हजार ६७२ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या ५,८५२ सक्रिय रुग्ण Active Corona Patients आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९७.८ टक्के तर रुग्ण दुपटीचा कालावधी ८६३ दिवस इतका आहे. मुंबईत एकही इमारत झोपडपट्टी सील नाही. गेल्या आठवडाभरातातील कोरोना वाढीचा दर ०.०७९ टक्के इतका आहे.

हेही वाचा APMC Market मुंबई एपीएमसी मार्केटमध्ये पालक कोथिंबीर, वांगी, तोंडलीचे दर वाढले मात्र इतर भाज्यांचे दर स्थिर

Last Updated : Aug 20, 2022, 10:36 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.