ETV Bharat / city

CM Eknath Shinde Win Floor Test : एकनाथ शिंदे यांनी जिंकला विश्वासदर्शक ठराव, १६४ आमदारांचे मत

विधानसभेच्या पहिल्या विशेष अधिवेशनाच्या दिवशी शिंदे-फडणवीस सरकारने शिवसेनेवर मात केली आहे. राहुल नार्वेकर विधानसभेचे नवे अध्यक्ष ( Rahul Narwekar Assembly Speaker ) झाले आहेत.

Eknath Shinde wins trust vote
एकनाथ शिंदे विजयी
author img

By

Published : Jul 4, 2022, 12:25 PM IST

Updated : Jul 4, 2022, 8:27 PM IST

मुंबई- विधानसभेच्या विशेष अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी एकनाथ शिंदे सरकारकडून विश्वासदर्शक मांडण्यात आला. त्यानंतर १६४ आमदारांनी एकनाथ शिंदे यांच्या बाजूने मतदान केले आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे यांनी विश्वासदर्शक ठराव जिंकला आहे. तर ठरावाच्या विरोधात महाविकास आघाडीला ९९ मते पडली. त्यामुळे गेली दहा दिवसांहून अधिक चाललेली सत्तानाट्य हे संपुष्टात आले आहे.

एकनाथ शिंदे यांनी जिंकला विश्वासदर्शक ठराव

विधानसभेच्या पहिल्या विशेष अधिवेशनाच्या दिवशी शिंदे-फडणवीस सरकारने शिवसेनेवर मात केली आहे. राहुल नार्वेकर विधानसभेचे नवे अध्यक्ष ( Rahul Narwekar Assembly Speaker ) झाले आहेत. अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी शिंदे-फडणवीस सरकार हे बहुमताला सामोरे गेले. मात्र, या निवडणुकीपूर्वी शिवसेनेने आमदारांना व्हीप बजावला होता. तो व्हीप मोडल्यामुळे 39 सदस्यांना निलंबीत करण्याची तक्रार दाखल करण्यात आली आहे.

आदित्य ठाकरे शेवटच्या मिनिटाला पोहोचले-दरवाजे बंद झाल्याने काँग्रेसचे नेते अशोक चव्हाण, विजय वडेट्टीवार, संग्राम जगताप, अण्णा बनसोडे, झिशान सिद्धीकी, धिरज देशमुख या आमदारांना सभागृहात जाता आले नाही. त्यामुळे तब्बल सहा नेत्यांना उशीर झाल्यामुळे मतदान करता आले नाही. उशीर झाल्यामुळे आदित्य ठाकरेही बालंबाल बचावले - एकीकडे काँग्रेसह इतर पक्षांच्या नेत्यांना मतदान करण्यासाठी सभागृहात जाता आले नाही. अनेक नेते अगदी शेवटच्या मिनीटाला सभागृहात पोहोचले. शिवसेनेचे युवानेते आदित्य ठाकरे हे देखील सभागृह बंद होण्याच्या शेवटच्या मिनीटाला पोहोचले. त्यामुळे आदित्य ठाकरे हे देखील मतदानापासून वंचित राहिले असते.

विरोधी पक्षांच्या मतात ८ ची घट, ५ काँग्रेस आमदारार अनुपस्थित-बहुमत चाचणी प्रक्रियेदरम्यान एकूण 22 आमदार गैरहजर राहिले. यामध्ये जितेश अंतापूरकर, जीशान सिद्दिकी, प्रणिती शिंदे, अशोक चव्हाण, विजय वडेट्टीवार, धीरज देशमुख, कुणाल पाटील, राजू आवळे, मोहनराव हंबर्डे आणि शिरीष चौधरी या काँग्रेसच्या 10 आमदारांचा समावेश आहे.कळमनुरीचे आमदार संतोष बांगर आज शिंदे गटात सहभागी झाले. विधानसभा अध्यक्ष यांना मतदानाचा अधिकार नसला तरी सत्ताधारी पक्षाची १६४ ही संख्या कायम राहिली आहे. विश्वासदर्शक ठरावात विरोधीपक्षाची 8 मते कमी झाली आहेत. 107 मते विरोधीपक्षाकडे होती. आज विरोधी पक्ष 99 वर थांबला आहे. 5 काँग्रेस आमदार अनुपस्थित राहिले आहेत. आज ही सपा आणि तटस्थ राहिले आहे. काँग्रेसचे अशोक चव्हाण, प्रणिती शिंदे, जितेश अंतापुरकर, विजय वडेट्टीवार, झिशांत सिद्दीकी, धिरज देशमुख, कुणाल पाटील, राजू आवळे, मोहन हंबर्डे, शिरीष चौधरी हे मतदानाला अनुपस्थित राहिले आहेत.

शिवसेनेची तक्रार-विधानसभेच्या पहिल्या विशेष अधिवेशनाच्या दिवशी शिंदे-फडणवीस सरकारने शिवसेनेवर मात केली आहे. राहुल नार्वेकर विधानसभेचे नवे अध्यक्ष झाले आहेत. अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी शिंदे-फडणवीस सरकार हे बहुमताला सामोरे जाणार आहे. मात्र, या निवडणुकीपूर्वी शिवसेनेने आमदारांना व्हीप बजावला होता. तो व्हीप मोडल्यामुळे 39 सदस्यांना निलंबीत करण्याची तक्रार दाखल करण्यात आली आहे.

सत्ता निरंकूश होते, तेव्हा चाणक्याला चंद्रगुप्त शोधावा लागतो, फडवीसांचा उद्धव ठाकरेंना टोला- उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, की शिंदे यांच्या पाठीशी पूर्ण ताकदीने उभा राहणार, त्यांची कारकीर्द यशस्वी करणार आहे. त्यांच्यात आणि माझ्यात कुरघोडीचे राजकारण दिसणार नाही. एवढेच सांगतो, जेव्हा जेव्हा धनानंदाची सत्ता निरंकूश होते, तेव्हा कुठल्यातरी चाणक्याला चंद्रगुप्त शोधावा लागतो, असे फडणवीस म्हणाले. एकनाथ शिंदे 24 तास काम करणारे व्यक्ती आहेत. त्यांच्यात प्रचंड माणूसकी आहे. सरकार हे संवेदनशील असले पाहिजे. आंदोलक आक्रमक झाले की कारवाई करावी लागते. मात्र काही पोस्ट केली, थोडे काही बोलले की त्यावर कारवाई होत होती. हे बरोबर नाही. कमी बोलायचं काम अधिक करायचं, त्यांच्यातील धीर, यामुळे आज त्यांची जडणघडण जी आहे ती झाली. त्यांनी महालक्ष्मी एक्सप्रेसमध्ये अडकेल्यांना बाहेर काढले. वैयक्तिक आयुष्यात त्यांना अनेक समस्यांचा सामना करावा लागला होता. पण ते त्यातून बाहेर पडले. मी पुन्हा आलो आणि शिंदे यांना बरोबर घेऊन आलो, असे फडणवीस म्हाणाले.

Last Updated : Jul 4, 2022, 8:27 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.