पुणे: चार वाजता सुमारास पुण्यामध्ये मुसळधार पावसाला सुरुवात झाली विजेच्या कडकड्यात पुण्यामध्ये जोरदार पाऊस पडल्यामुळे पुण्यातील विविध भागांमध्ये झाडपडीचा घटना घडल्यात अशीच एक घटना पुण्यातील रामनगर भागातील एका रिक्षा वरती एक मोठे झाड बसवून एका वयोवृद्ध व्यक्तीचा मृत्यू झालेला आहे त्याचबरोबर या भागामध्ये प्रचंड असं पाणी साठल्यामुळे वाहतूक कोंडीला प्रचंड त्रास होत आहे परंतु या पावसाचा फटका मात्र एका वयोवृत्त ड्रायव्हरचा यामध्ये मृत्यू झालेला आहे.
Breaking News Live : पुण्यात जोरदार पाऊस, रिक्षावर झाड पडून एकाच मृत्यू
18:18 September 30
पुण्यात जोरदार पाऊस, रिक्षावर झाड पडून एकाच मृत्यू
17:54 September 30
नव्याने झालेला टोलनाका सुसाट वाऱ्याने जमीनदोस्त..
नांदेड - अकोला राष्ट्रीय महामार्गावरील (161) वाशिम- हिंगोली मार्ग दरम्यान नव्याने झालेला टोलनाका अचानक आलेल्या सुसाट वार्याने जमीन दोस्त झाला आहे...या दरम्यान कोणतेही वाहन नसल्यामुळे मोठी दुर्घटना टळली आहे..
17:22 September 30
पुण्यात मुसळधार पाऊस...रस्त्यांवर पाणीच पाणी...
पुणे:- पुण्यात मुसळधार पाऊस सुरू असून अचानक सुरू झालेल्या पावसामुळे पुणेकरांची चांगलीच तारांबळ उडाली आहे.तसेच पुण्यातील अनेक सखल भागांमध्ये पाणी साचले असून त्यामुळे वाहतुकीवरही परिणाम झाला आहे. पुणे शहरातील अनेक भागांमध्ये मुसळधार पाऊस सुरू असून रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात पाणी साचलेला पाहायला मिळत आहे.
16:08 September 30
आयएसआयमध्ये तरुणांना पाठवण्याच्या आरोपातील आरोपीची मुंबई सत्र न्यायालयातून आज निर्दोष मुक्तता
आयएसआय मध्ये तरुणांना पाठवण्याच्या आरोपातील आरोपीची मुंबई सत्र न्यायालयातून आज निर्दोष मुक्तता
पाकिस्तानी संघटना आयएसआय मध्ये महाराष्ट्रातील तरुणांना पाठवण्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आलेल्या आरोपीची मुंबई सत्र न्यायालयातील विशेष एन आय ए कोर्टाने केली निर्दोष सुटका
आरोपी आर्शि कुरेशीची मुंबई सत्र न्यायालयाने केली निर्दोष सुटका
या प्रकरणात आरोपीला एन आय ए ने केली होती 2016 मध्ये अटक
सहा वर्षाच्या नंतर गंभीर आरोपातून झाली निर्दोष सुटका
14:29 September 30
मोदींनी बरीच साफसफाई केली, राज्यातही बरीच साफसफाई बाकी - मुख्यमंत्री
मुंबई - स्वच्छता अभियान २ची सुरुवात ( Start of cleanliness drive ) आज मुंबईत वाय. बी. चव्हाण सेंटर ( YB Chavan Centre Mumbai ) येथे करण्यात आली. याप्रसंगी आयोजित कार्यक्रमांमध्ये बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, ( Eknath Shinde ) त्याचबरोबर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस ( Deputy Chief Minister Devendra Fadwanis ) यांनी या कार्यक्रमाबद्दल माहिती देत स्वच्छतेबाबत राज्याने काय करायला हवे असे सांगत, आतापर्यंत यामध्ये आपण मागे कसे राहिलो हे सांगत असताना मागच्या महाविकास आघाडी सरकार ( Maha Vikas Aghadi Govt ) विशेष करून मुंबई महानगरपालिकेवर ( Mumbai Municipal Corporation ) सत्तेत असलेल्या शिवसेनेवर ( Criticism of Shiv Sena ) हल्लाबोल केला आहे.
12:41 September 30
अंतर्गत गटबाजी संपवून निवडणुकीच्या कामाला लागा; प्रदेशाध्यक्ष बावनकुळेंचा कार्यकर्त्यांना कानमंत्र
अमरावती: होऊ घातलेल्या अमरावती महानगरपालिका निवडणुकांसाठी कार्यकर्त्यांनी आपसातले हेवेदावे बाजूला सारून कामाला लागावे. अंतर्गत गटबाजीला थारा देऊ नका. महानगरपालिकेत भाजपाचा महापौर असला पाहिजे यासाठी कार्यकर्त्यांनी कामाला लागावे, असा कानमंत्र प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी कार्यकर्त्यांना दिला.
12:40 September 30
विजयादशमी उत्सवापूर्वी स्वयंसेवकांनी केली रंगीत तालीम
नागपूर - आज राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विजयादशमी उत्सवाची रंगीत तालीम नागपूरच्या रेशीमबाग मैदानावर पार पडली. दरवर्षी विजयादशमीच्या मुहूर्तावर आरएसएसकडून उत्सवाचे आयोजन केलं जातं, यावर्षी तब्बल दोन वर्षानंतर जाहीर कार्यक्रम होणार आहे, त्यामुळे आज झालेल्या रंगीत तालीममध्ये शेकडो स्वयंसेवक पूर्ण गणवेशात सहभागी झाले होते. ५ ऑक्टोबरला विजयादशमी उत्सवात सरसंघचालक मोहन भागवत स्वयंसेवकांना मार्गदर्शन करणार असून गिर्यारोहक संतोष यादव प्रमुख पाहुणे असणार आहेत.
12:40 September 30
मोबाईल घेऊ न दिल्याच्या नैराश्यातून बारामतीत अल्पवयीन मुलाची आत्महत्या
बारामती : आईने मोबाईल घेऊन न दिल्यामुळे एका 14 वर्षीय अल्पवयीन मुलाने गळफास घेतल्याची धक्कादायक घटना बारामती तालुक्यातील क-हावागज येथे घडली. गुरुवार दिनांक 29 रोजी सायंकाळी साडेसात वाजताच्या सुमारास सदर घटना घडली. शुभम मोतीराम धोत्रे वय 14 असे आत्महत्या केलेल्या मुलाचे नाव आहे. शुभम सोमेश्वर विद्यालय अंजनगाव ता.बारामती येथे इयत्ता नववी मध्ये शिकत होता. याबाबत राजेंद्र अशोक लष्कर वय 27 रा करावागज लष्कर वस्ती ता बारामती यांनी माळेगाव पोलीस ठाण्यात खबर दिली.
11:29 September 30
आज राजाराम सहकारी साखर कारखान्याची वार्षिक सभा; सतेज पाटील, महाडिक पुन्हा आमने सामने
कोल्हापूर : राजाराम सहकारी साखर कारखान्याची ( Rajaram Cooperative Sugar Factory ) वार्षिक सर्वसाधारण सभा आज होत आहे. यामुळे पुन्हा एकदा सतेज पाटील आणि महादेवराव महाडिक हे आमने सामने येणार आहेत. सध्या राजाराम कारखान्यात महाडिक गटाची सत्ता आहे. दरम्यान सत्ता परिवर्तन करण्यासाठी सतेज पाटील यांचा प्रयत्न सुरू असून यंदाची ही शेवटची सर्वसाधारण सभा होत आहे. यामुळे सतेज पाटील गटाच्या राजर्षी शाहू परिवर्तन आघाडीने ( Rajarshi Shahu Transformation Alliance ) सत्ताधाऱ्यांना घेरण्याची पूर्ण तयारी केली.
11:29 September 30
पनवेलमध्ये तरुणीचा विनयभंग करुन डिलिव्हरी बॉयचे पलायन
नवी मुंबई : तरुणी एकटीच असल्याचा फायदा उचलत पनवेलमध्ये एका डिलिव्हरी बॉयने चक्क तरुणीचा विनयभंग (delivery boy molesting girl in Panvel) केला. या घटनेने घाबरलेली तरुणी घरात पळाली. तरुणी घरात गेल्याची संधी साधुन तो डिलिव्हरी बॉय तेथून पसार (delivery boy absconded after molesting girl) झाला.
11:29 September 30
यंदाची दिवाळी जोरदार! मुख्यमंत्र्यांकडून दिवाळी बोनस जाहीर
मुंबई - मुंबई महापालिकेचे कर्मचारी, महापालिकेचे शिक्षक बेस्टचे कर्मचारी यांना २२ हजार ५०० रूपये तर आरोग्य सेविकांना एक पगार दिवाळी बोनस देण्यात येईल, ( Diwali bonus Announce by CM Eknath Shinde ) असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केले. सरकारी, निमसरकारी कर्मचाऱ्यांची दिवाळी यंदा गोड होणार ( Diwali Bonus for Govt and Semi Govt Employees ) आहे.
10:28 September 30
गद्दारीविरोधात खुद्दारी असा हा मेळावा - सुषमा अंधारे

मुख्यमंत्र्यांच्या दसरा मेळाव्याच्या टिझरवर शिवसेनेची बोचरी टीका
विजय मानेवर केस करणारे मुख्यमंत्री बाळासाहेबांची हुबेहूब कॉपी वापरून मेळावा हायजॅक करण्याचा प्रयत्न करत आहेत
स्वाभिमान विकून मिळवलेल्या पैशातून गाड्या सोडून गर्दी जमवण्याचा प्रयत्न
परंतु शिवसेनेकडे स्वाभिमानी शिवसैनिक असून स्वतःच्या कष्टाने कमावलेली भाकरी खाऊन दसरा मेळाव्यासाठी पायी चालत येतोय उद्धव ठाकरे यांच्या प्रति दाखवलेल्या मिस्टेक आहे
08:01 September 30
मुंबईत 30 वर्षीय मॉडेलची आत्महत्या
मुंबई -वर्षीय मॉडेलने आत्महत्या केली, तिचा मृतदेह मुंबईतील अंधेरी भागातील हॉटेलच्या खोलीत पंख्याला लटकलेल्या अवस्थेत सापडला, वर्सोवा पोलिसांनी ADR अंतर्गत गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे. पोलिसांनी घटनास्थळी एक नोटही जप्त केली.
08:00 September 30
पुण्यात देवीच्या वर्गणीच्या नावाखाली गुंडांची दहशत; हॉटेल चालकाला बेदम मारहाण
पुणे - पुणे शहरात गेल्या काही महिन्यांपासून गुन्हेगारीचे प्रमाण पुन्हा एकदा डोके वर काढू लागले आहे. पुणे शहरात आठवड्याभरात चारहून अधिक खुनाचे गुन्हे दाखल असताना पुण्याच्या मार्केट यार्ड परिसरात गुंडांच्या माध्यमातून देवीच्या वर्गणीच्या नावाखाली दहशत माजवली जात आहे. विशेष म्हणजे या टोळीकडून हॉटेल चालकाला बेदम मारहाण करण्यात आली असून हा संपूर्ण प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे. असे असले तरी अजूनही गुन्हा दाखल झालेला नाही.
08:00 September 30
चांदणी चौकातील जुना पूल पाडण्याची पूर्वतयारी अंतिम टप्प्यात
पुणे - चांदणी चौकातील जुना पूल पाडण्याबाबत भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणतर्फे नियोजन करण्यात येत असून त्यासाठीची पूर्वतयारी अंतिम टप्प्यात आहे.
06:32 September 30
जम्मू-काश्मीरमधील बारामुल्ला परिसरात सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरू
श्रीनगर - जम्मू-काश्मीरमधील बारामुल्ला येथील पट्टण भागात सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरू आहे. येडीपोरा परिसरात देखील पोलीस, सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरु आहे.
06:28 September 30
MAHARASHTRA BREAKING NEWS
मुंबई - राज्यात शिंदे सरकारने सत्तेवर येताच बदल्यांचा धडका सुरू केला आहे. आज ४० आयएएस अधिकाऱ्यांच्या बदलीचा वटहुकूम काढला असून महाविकास आघाडीशी निगडित असलेल्या सर्व अधिकाऱ्यांची खांदापालट केली आहे. कोविड काळात राज्य सरकारची कार्यक्षम आरोग्य यंत्रणा ठेवणारे डॉ. प्रदीप व्यास यांच्यासह मनीषा म्हैसकर, मिलिंद म्हैसकर, वळसा नायर, दीपक कपूर, संजय खंदारे, प्रवीण दराडे, तुकाराम मुंढे, दीपक कपूर, मनीषा म्हैसकर, जयश्री भोज यांचा समावेश आहे. विशेषता आदित्य ठाकरे यांच्या जवळच्या अधिकाऱ्यांवर शिंदे सरकारने बदलीची मोहर उठवल्याचे दिसून येत आहे.