ETV Bharat / city

Breaking News Live : राष्ट्रपतींबद्दल वक्तव्य करणे भास्करराव जाधव यांना पडले महागात; गोंदियात गुन्हा दाखल - अंधेरी पूर्व पोट निवडणूक

महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज
Maharashtra Breaking News
author img

By

Published : Oct 13, 2022, 7:02 AM IST

Updated : Oct 13, 2022, 10:27 PM IST

22:25 October 13

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांच्याबद्दल वक्तव्य करणे भास्करराव जाधव यांना पडले महागात; गोंदियात गुन्हा दाखल

गोंदिया पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल...

२४९, २५३, ५००, ५०४ अंतर्गत गुन्हा दाखल...

गोंदियातील सुरेंद्र नायडू यांनी केला गुन्हा दाखल...

21:52 October 13

एसटीच्या कामगारांना दिवाळी बोनस जाहीर

एसटीच्या कामगारांना दिवाळी बोनस जाहीर

एसटीच्या कामगारांना दिवाळी बोनस जाहीर

बोनससाठी 19 ऑक्टोबरच्या आत कर्मचाऱ्यांनी अर्ज करावेत

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचा निर्णय

18:47 October 13

पणन सहसंचालक शशिकांत घोरपडे बेपत्ता, नदीत उडी मारल्याचा संशय

सातारा - राज्याचे पणन सहसंचालक शशिकांत पतंगराव घोरपडे हे बेपत्ता झाल्याने खळबळ उडाली आहे. या घटनेची नोंद शिरवळ (जि. सातारा) पोलीस ठाण्यात झाली आहे. दरम्यान, त्यांनी भोर तालुक्यातील सारोळा येथे नीरा नदीमध्ये उडी मारल्याच्या संशयावरून नीरा नदीपात्रात युद्धपातळीवर शोध कार्य सुरू करण्यात आले आहे. वरिष्ठ अधिकारी देखील घटनास्थळी दाखल झाले आहेत.

18:30 October 13

दहशतवादी विरोधी पथकाने मुंबईमधून पंजाबच्या एका दहशतवाद्यास केली अटक

मुंबई - दहशतवादी विरोधी पथकाने मुंबईमधून पंजाबच्या एका दहशतवाद्यास अटक केली आहे. चरत सिंग उर्फ इंद्रजीत सिंग कारि सिंग उर्फ करत सिंग (वय वर्ष 30) असे या दहशतवाद्याचे नाव आहे.

18:20 October 13

मीरा भाईंदरमध्ये उभारणार देशातील पहिले मराठा भवन; १५ ऑक्टोबरला भूमीपूजन

मीरा भाईंदर - मीरा भाईंदर शहरात मराठा भवनाचे भूमिपूजन शनिवारी १५ ऑक्टोबर रोजी पार पडणार आहे. देशातील पहिले मराठा भवन उभारण्यात येत आहे. यामध्ये भवनासह वस्तीगृह असणार आहे. या कार्यक्रमासाठी संभाजीराजे छत्रपती, ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराजे देसाई, उद्योगमंत्री उदय सामंत, केंद्रीय मंत्री कपिल पाटील, आमदार प्रताप सरनाईक, आमदार नितेश राणे, स्व. विनायक मेटे यांच्या पत्नी शिवसंग्राम राष्ट्रीय अध्यक्ष ज्योती मेटे यांच्या उपस्थितीत मराठा भवनाचे भूमीपूजन केले जाणार आहे.

16:42 October 13

देशात काश्मीर राहिले यात फारुख अब्दुल्ला यांच्या वडिलांचे योगदान खूप मोठे - शरद पवार

मुंबई - देशात काश्मीर राहिले यात फारुख अब्दुल्ला यांच्या वडिलांचे योगदान खूप मोठे आहे. त्यांची सर्व निष्ठा भारतासोबत आहे. असेच नेते आज इथे उपस्थित आहेत, असे शरद पवार यांनी भुजबळांच्या सत्कार कार्यक्रमात सांगितले.

16:34 October 13

राम केवळ हिंदूंचा नाही सर्वांचा आहे - फारुख अब्दुल्ला

मुंबई - राम केवळ हिंदूंचा नाही सर्वाचा आहे, असे जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारुख अब्दुल्ला म्हणालेत. ते मुंबईत छगन भुजबळ यांच्या सत्कार कार्यक्रमात बोलत होते. मात्र आज सर्वांना वेगळे केले जात आहे. आज घृणा पसरवली जात आहे. आज देशात महागाई वाढत चालली आहे. नोकऱ्या नाहीत, गॅस वीज दर वाढले आहेत. पण या सर्वातून देव आणि अल्लाह आपल्याला बाहेर काढेल असा विश्वास अब्दुल्ला यांनी व्यक्त केला. रावण देखील खूप विद्वान होता. मात्र जेव्हा त्याने देवाला आव्हान दिले. सीता हरण केले. त्यावेळी त्याचाही नाश झाला हे विसरून चालणार नाही, याची जाणीव त्यांनी सत्ताधाऱ्यांना करुन दिली.

म्हणून आता स्वतःला देव समजणारे आले आहेत. पण आता त्यांना जागा दाखवायची वेळ आली आहे.

मी भारतीय मुस्लिम आहे. जिना यांहा मरना यांना इसके सिव्हा जाणार कान्हा

16:09 October 13

देशाच्या स्वतंत्र्याची ही दुसरी लढाई - उद्धव ठाकरे

मुंबई - शरद पवार आणि बाळासाहेब ठाकरे अशा दोन उतुंग व्यक्तीमत्वांसोबत भुजबळ यांनी काम केले आहे, असे उद्धव ठाकरे म्हणालेत. आता वादळ निर्माण करणारे वादळ आणि पावसात सोबत असणारे सगळे एकत्र आहेत. मी लढायला तयार आहे. नुसती घोषणा देऊन चालणार नाही. सोबत सर्वांनी लढायला लागेल. देशाच्या स्वतंत्र्याची ही दुसरी लढाई आहे. भुजबळ जाताना एकटे गेले आणि आता राष्ट्रवादी आणि काँग्रेस सोबत घेऊन आले, या शब्दात ठाकरे यांनी त्यांचा गौरव केला.

15:44 October 13

आता अंधेरीची निवडणूक बिनविरोध करावी - अनिल परब यांचे आवाहन

मुंबई - ऋतुजा लटके यांना उमेदवारी मिळू नये यासाठी शेवटच्या क्षण पर्यंत प्रयत्न सुरु होते. त्यांनी 3 तारखेला राजीनामा दिला. नंतर 12 तारखेला भ्रष्टाचारचे आरोप केले जातात, हे किती घाणेरडे राजकारण आहे. अनिल परब यांनी हा आरोप केला आहे. उद्या आम्ही सर्व कार्यकर्ते घेऊन जाणार आणि उमेदवारी अर्ज भरणार असेही त्यांनी स्पष्ट केले. आता त्यांनी मनाचा मोठेपणा दाखवावा आणि ही निवडणूक बिनविरोध करावी, असे आवाहनही अनिल परब यांनी केले.

15:36 October 13

मराठा समाजाला आरक्षण नसल्यामुळे शेतकऱ्याची आत्महत्या

बीड - मराठा समाजाला आरक्षण नाही. त्यामुळे मुलांना शिक्षण देता येत नाही. त्यावर बेरोजगारी अश्या कारणांनी पाटोदा तालुक्यातील डोमरी गावचे शेतकरी दादा डिसले यांनी आत्महत्या केली आहे. त्यांच्या आत्महत्येनंतर परिसर एक चिठ्ठी व्हायरल झाली आहे. त्यात दादा डिसले यांनी मराठा आरक्षण नसल्यामुळे आपण जीवन संपवत असल्याचे लिहिल्याचे दिसत आहे.

15:33 October 13

लटके यांचा राजीनामा उद्या 11 वाजेपर्यंत मंजूर करावा असे न्यायालयाने पालिकेला निर्देश

मुंबई - ऋजुता लटके यांचा अर्ज मंजूर करण्यात आला आहे. लटके यांचा राजीनामा उद्या 11 वाजेपर्यंत मंजूर करावा असे न्यायालयाने पालिकेला निर्देश दिले. आज कोर्टात या प्रकरणी जोरदार युक्तीवाद झाला. त्यानंतर कोर्टाने हा निर्णय दिला.

15:16 October 13

कायदा सर्व कर्मचाऱ्यांना समान असावा - सावंत

मुंबई - ऋतुजा लटके यांचे वकील वकील विश्वजित सावंत यांनी बीएमसीच्या वकिलांच्या दाव्यांवर आपला जोरदार युक्तीवाद केला. हेमांगी वरळीकर यांचा राजीनामा पालिका प्रशासनाने मंजूर केला होता. तेव्हाही कालावधी अत्यंत कमी होता. कायदा सर्व कर्मचाऱ्यांना समान असावा असे ते म्हणाले. हेमांगी यांना वेगळा आणी ऋजुता यांना वेगळा न्याय का, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. केवळ राजकीय दबाव असल्याने राजीनामा मंजूर केला जात नाही असा आरोप त्यांनी केला.

15:09 October 13

राजीनामा नाकारायचा हा सर्वस्वी पालिका आयुक्तांचा विशेषाधिकार

मुंबई - नोटीस कालावधी माफ करून राजीनामा स्वीकारायचा की राजीनामा नाकारायचा हा सर्वस्वी पालिका आयुक्तांचा विशेषाधिकार आहे. या प्रकरणात राजीनामा पत्रही सदोष आहे. शिवाय आता तक्रार आली आहे. तर त्याचीही शहानिशा करून ते प्रकरण आधी बंद करावे लागेल. त्यानंतरच राजीनाम्याबाबत निर्णय घेतला जाईल. असे वकिलांनी स्पष्ट केले.

15:05 October 13

ऋतुजा लटके यांचा राजीनामा मंजूर केलेला नाही

मुंबई - ऋतुजा लटके यांचा राजीनामा मंजूर केलेला नाही अशी बीएमसीने कोर्टात माहिती दिली. त्यांनी राजीनामा पाठवला असला तरी त्यांनी काहीही संवाद प्रशासनाशी केला नाही. 3 ऑक्टोबरला राजीनामा दिला आणि 12 ऑक्टोबरला ऋतुजा यांच्या विरोधात एक व्यक्तीने तक्रार केली आहे.

14:43 October 13

अर्धनग्न फोटो सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी दिल्याने तरुणाची आत्महत्या

पुणे - शहरात एका तरुणाने आत्महत्या केली आहे. पैसे दे अन्यथा अर्धनग्न फोटो सोशल मीडियावर व्हायरल करण्याची तरुणाला धमकी देण्यात आली. त्यानंतर घाबरलेल्या तरुणाने आत्महत्या केली.

14:40 October 13

ऋतुजा लटके यांच्या राजीनाम्यावर निर्णय घेण्यास काय अडचण?

मुंबई - ऋतुजा लटके यांच्या राजीनाम्यावर निर्णय घेण्यास काय अडचण आहे. हायकोर्टाने मुंबई महापालिकेला सवाल.

14:04 October 13

उद्धव ठाकरे गटाने निवडणूक आयोगाला पत्र लिहून निर्णयांवर घेतला आक्षेप

मुंबई - शिवसेनेने (उद्धव ठाकरे गट) निवडणूक आयोगाला पत्र लिहून पक्षाला अंतरिम निवडणूक चिन्ह आणि नाव वाटपाच्या बाबतीत ECI च्या निर्णयांवर आक्षेप नोंदवला आहे.

13:48 October 13

ईस्टर्न एक्स्प्रेस हायवेवर एसयूव्ही झाडावर आदळल्याने 2 ठार

मुंबई - ईस्टर्न एक्स्प्रेस हायवेवर एसयूव्ही झाडावर आदळल्याने दोघांचा मृत्यू. पाचजण जखमी

13:46 October 13

वॉचमनवर 11 वर्षीय मुलीसोबत बलात्काराचा गुन्हा दाखल

मुंबई - डोंगरी येथे एका 58 वर्षीय वॉचमनवर 11 वर्षीय मुलीसोबत बलात्काराचा गुन्हा दाखल. पुढील तपास सुरू आहे.

13:33 October 13

स्पाइसजेटच्या विमानाचे हैदराबाद विमानतळावर आपत्कालीन लँडिंग

हैदराबाद - गोव्यातून निघालेल्या स्पाइसजेटच्या विमानाचे हैदराबाद विमानतळावर आपत्कालीन लँडिंग करण्यात आले. विमानाच्या कॉकपिटमध्ये धूर दिसून आल्यानंतर हे विमान तातडीने हैदराबादमध्ये उतरवण्यात आले. स्पाइसजेटच्या प्रवक्त्याने ही माहिती दिली.

13:17 October 13

ऋतुजा लटके यांच्या राजीनाम्यावर काय निर्णय घेणार, दुपारी अडीच पर्यंत सांगण्याचे महापालिकेला निर्देश

लटके यांनी राजीनाम्याबाबत सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केलेली आहे. याबाबतचे कागदीपुरावे याचिकेच जोडलेले आहेत. लटके यांची पालिकेतील नोकरी ही लिपीकाची आहे. मात्र सध्याची राजकिय परिस्थिती पाहता हेतूपूर्वक गोष्टी या टाळल्या जात आहेत. कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केलेली आहे. मात्र कुठेही असे नियमात लिहिलेले नाही की, नोटीस पिरियड पूर्ण करावाच लागेल. लटकेंवर कुठल्याही प्रकारचे आरोप नाहीत. त्यांची कुठलीही चौकशी सुरू नाही. त्यामुळे ऋतुजा लटके यांच्या राजीनाम्यावर काय निर्णय घेणार ते दुपारी अडीच पर्यंत सांगण्याचे महापालिकेला कोर्टाने निर्देश दिलेत.

12:52 October 13

ब्युटीपार्लरमध्ये वॅक्स करण्याच्या बहाण्याने आलेली महिला दागिन्यांसह रोकड चोरून पसार

ठाणे - ब्युटी पार्लरमध्ये वॅक्स करण्याच्या बहाण्याने आलेल्या एका अनोखळी महिलेने ब्युटी पार्लरमध्ये मेकअप करण्यात गुंग असलेल्या ग्राहक महिलांच्या पर्समधून दागिन्यांसह रोकड घेऊन पोबारा केल्याची घटना घडली आहे. ही घटना कल्याण पश्चिम भागातील दोन ब्युटी पार्लरमध्ये घडली आहे. याप्रकरणी महात्मा फुले पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्या महिलेविरोधात गुन्हा दाखल करून पोलिसांनी तिचा शोध सुरू केला आहे.

12:42 October 13

आमच्या पक्षात शत्रुत्वाची भावना नाही, खरगेसाहेब माझे ज्येष्ठ नेते - शशी थरूर

नवी दिल्ली - आम्ही निवडणूक लढवत आहोत, आमच्या पक्षात शत्रुत्वाची भावना नाही. खरगेसाहेब माझे ज्येष्ठ नेते आहेत. मी त्यांच्यासोबत जवळून काम केले आहे. पक्षाला बळकट करण्यासाठी काम करत आहोत. काँग्रेसचे अध्यक्षपदाचे उमेदवार शशी थरूर यांनी दिल्लीत हे मत मांडले आहे.

12:29 October 13

पोलीस निरीक्षक किशोर खरात यांच्यावर लाच लुचपत प्रतिबंध विभागाने दाखल केला गुन्हा

मुंबई - दोन लाखांची लाच मागणाऱ्या मानखुर्द पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षक किशोर खरात यांच्यावर लाच लुचपत प्रतिबंध विभागाने दाखल केला गुन्हा.

12:13 October 13

एबीव्हीपीचे सोलापूर विद्यापीठात प्रतिकात्मक शुद्धीकरण आंदोलन

सोलापूर - एबीव्हीपीचे सोलापूर विद्यापीठात प्रतिकात्मक शुद्धीकरण आंदोलन

12:07 October 13

मुंबई विमानतळावर 15 किलो सोने 22 लाख रुपयांचे विदेशी चलन जप्त

मुंबई - विमानतळ सीमाशुल्क विभागाने 11 आणि 12 ऑक्टोबरला चार प्रकरणांमध्ये 7.87 कोटी रुपये किमतीचे 15 किलो सोने आणि दोन वेगवेगळ्या प्रकरणांमध्ये 22 लाख रुपयांचे विदेशी चलन जप्त केले. सात प्रवाशांना अटक केली आहे. कस्टम विभागाने ही माहिती दिली.

11:52 October 13

एका क्लर्कचा राजीनामा मंजूर करण्याकरता किती नाटकं - किशोरी पेडणेकर

मुंबई - अनेकदा निवडणुकीआधी असे राजीनामे दिले जातात. तसेच नियमानुसार पेमेंट किंवा अधिदान चुकते केल्यानंतर एका दिवसातही राजीनामा मंजूर केला जाऊ शकतो. महापालिकेचे कुठलेही चुकीचे शेरे ऋतुजा लटकेंच्या नावावर नाहीत. असे असताना एका क्लार्कचा राजीनामा मंजूर करण्याकरता इतकी नाटकं केली जातायेत अशी टीका किशोरी पेडणेकर यांनी केली आहे.

11:14 October 13

ऋतुजा लटके यांच्या याचिकेवर मुंबई उच्च न्यायालयात थोड्याच वेळात सुनावणी होणार सुरू

मुंबई - ऋतुजा लटके शिवसेना ठाकरे गटाच्या अंधेरी पोट निवडणुकीच्या उमेदवारी दाखल करणार आहेत. महानगरपालिकेने अद्यापही राजीनामा मंजूर न केल्याने उच्च न्यायालयात याचिका दाखल आहे. अंधेरी पोटनिवडणुकी करिता उमेदवारी अर्ज भरण्याची उद्याची निवडणुकीची शेवटची तारीख आहे. ऋतुजा लटकेसुद्धा सुनावणी दरम्यान मुंबई उच्च न्यायालयात उपस्थित आहेत.

10:47 October 13

हिजाबवरुन सर्वोच्च न्यायालात दोन न्यायमूर्तींचे आली वेगवेगळी मते, प्रकरण सरन्यायाधीशांकडे वर्ग

नवी दिल्ली - कर्नाटक हिजाब बंदी प्रकरणी कोर्टाने महत्वाची टिप्पणी केली आहे. हिजाब वापरणे हा ज्याच्या-त्याच्या निवडीचा प्रश्न आहे, असे कोर्टाने म्हटले आहे. त्याचवेळी न्यायमूर्ती सुधांशू धुलिया यांनी कर्नाटक हायकोर्टाचा याबाबतचा निर्णय रद्द केला आहे. तसेच याबाबतच्या अपीलांना परवानगी दिली. तर दुसरीकडे सर्वोच्च न्यायालयाचे दुसरे न्यायमूर्ती हेमंत गुप्ता यांनी कर्नाटक उच्च न्यायालयाच्या आदेशाला आव्हान देणारी अपील फेटाळून लावण्याचे मत मांडले. त्यामुळे आता हे प्रकरण सरन्यायाधीशांकडे सोपवण्यात आले आहे.

10:42 October 13

पुणे - जांभूळवाडीत ३० वर्षीय युवकाचा शॉक लागून मृत्यू

पुणे - पुण्यातील जांभूळवाडी येथे बांधकाम प्रकल्पात काम करताना विजेच्या धक्क्याने एका कामगाराचा मृत्यू झाला. याप्रकरणी ठेकेदार आणि जागेच्या मालकावर भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

10:14 October 13

रात्री उशिरा लटके कुटुंबीय मातोश्रीवर

ऋतुजा लटके यांच्या राजीनाम्याचा पेच कायम असताना काल रात्री उशिरा लटके कुटुंबीय याना मातोश्रीवर बोलवण्यात आलं होतं. पक्ष प्रमुखांसोबत नेमकी काय चर्चा झाली हे गुलदस्त्यात आहे. तर अंधेरीतल्या विभागाची बैठक विलेपार्ल्यात पार पडली. या बैठकीला अनिल परब, प्रमोद सावंत कमलेश राय आणि इतर पदाधिकारी उपस्थित होते. यामुळे वेगळ्या चर्चांना उधाण आलं आहे.

10:10 October 13

सकाळच्या सत्रात सेन्सेक्स सुमारे २०० हून जास्त अंकांनी घसरला

मुंबई - शेअर बाजारात आज सकाळच्या सत्रात सेन्सेक्स सुमारे २०० हून अंकांनी घसरून ५७,४०० वर व्यवहार करत आहे. तर निफ्टीही घसरुन १७, १०० च्या खाली व्यवहार करत आहे. अन्नधान्यांच्या किमती वाढल्याने महागाई सप्टेंबरमध्ये ७.४१ टक्क्यांपर्यंत वाढली आहे.

09:56 October 13

देशात एका दिवसात 2786 नवीन कोरोना रुग्णांची नोंद

नवी दिल्ली - देशात एका दिवसात 2,786 नवीन कोविड-19 रुग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे भारतातील एकूण कोरोना रुग्णांची संख्या 4,46,21,319 वर पोहोचली. एकूण मृतांची संख्या 5,28,847 वर गेली आहे.

09:23 October 13

भारताच्या डिजीटल रोख हस्तांतरण योजनांची आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचे उप संचालक पाओलो मौरो यांनी केली प्रशंसा

भारताच्या डिजीटल रोख हस्तांतरण योजनांची आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचे उप संचालक पाओलो मौरो यांनी प्रशंसा केली आहे. ही प्रणाली खूपच प्रभावी आहे, असे ते म्हणाले. कमी उत्पन्न स्तरावरील लोकांना मदत करण्याचा प्रयत्न करणारी प्रणाली कोट्यवधी लोकांपर्यंत कशी पोहोचते हे महत्वाचे आहे.

08:03 October 13

कर्नाटकातील चित्रदुर्गाच्या बोम्मागोंडानहल्ली येथून भारत जोडो यात्रा पुन्हा सुरू

काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी कर्नाटकातील चित्रदुर्गाच्या बोम्मागोंडानहल्ली येथून भारत जोडो यात्रा पुन्हा सुरू केली. कन्याकुमारी येथून ७ सप्टेंबर रोजी सुरू झालेल्या यात्रेने आतापर्यंत ९२५ किमीचे अंतर कापले आहे. एकूण 12 राज्यांतून ही यात्रा जम्मू आणि काश्मीरमध्ये संपणार आहे.

07:58 October 13

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज हिमाचल प्रदेशमध्ये विविध विकास प्रकल्पांचे करणार उद्घाटन

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज हिमाचल प्रदेशला भेट देणार आहेत. उना येथे पंतप्रधान वंदे भारत एक्सप्रेस ट्रेनला हिरवी झेंडी दाखवतील. त्यानंतर, एका सार्वजनिक कार्यक्रमात, पंतप्रधान आयआयआयटी उना राष्ट्राला समर्पित करतील आणि उनामध्ये बल्क ड्रग पार्कची पायाभरणी करतील त्यानंतर, चंबा येथे सार्वजनिक कार्यक्रमात, पंतप्रधान दोन जलविद्युत प्रकल्पांची पायाभरणी करतील.

07:18 October 13

आंतरराष्ट्रीय नाणेनिधीकडून भारताच्या डिजिटल कॅश ट्रान्सफर योजनेचे कौतुक

आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचे उपसंचालक पाओलो मौरो यांनी भारताच्या डिजिटल कॅश ट्रान्सफर योजनेचे कौतुक केले. ते म्हणाले, लॉजिस्टिक चमत्कार आहे. ही योजना कमी-उत्पन्न स्तरावरील लोकांना मदत करण्याचा प्रयत्न करणाऱ्या लाखो लोकांपर्यंत पोहोचत आहे.

07:05 October 13

चालत्या बसला आग, प्रवासी सुखरुप

आंबेगाव तालुका परिसरात चालत्या बसला आग लागली आहे. प्रवासी सुखरूप आहेत.

06:41 October 13

Maharashtra Breaking News and update news

मुंबई- अंधेरी पूर्व निवडणुकीत शिवसेनेने ( Shiv Sena in Andheri East elections ) उद्धव बाळासाहेब ठाकरे ( Uddhav Balasaheb Thackeray ) दिवंगत आमदार रमेश लटके ( MLA Ramesh Latke ) यांच्या पत्नी ऋतुजा लटकेंना उमेदवारी ( Rutuja Latke Shiv Sena candidate ) दिली. मात्र, त्यांचा पालिकेतील नोकरीचा राजीनामा स्वीकारला जात नसल्याने त्यांच्या उमेदवारीवरच प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. यावरून आता उद्धव ठाकरे गट विरुद्ध शिंदे गट आणि भाजप असे चित्र निर्माण झाले आहे.

Last Updated : Oct 13, 2022, 10:27 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.