मुंबई - मुंबईतील विधानसभा निवडणुकीसाठी मतदानाला सुरुवात झाली आहे. चेंबूरमधील सरस्वती विद्यालयांमध्ये निवडणूक आयोगाने एक महिला सखी मतदान केंद्र तयार केले आहे. मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी महिलांनी जास्तीत जास्त सहभाग घ्यावा, या उद्देशाने असे केंद्र उभे केले जाते.
या केंद्रावर मतदानासाठी आलेल्या मतदार डिसूजा यांनी सखी मतदान केंद्रावर झालेले स्वागत पाहून भारावून गेल्याचे सांगितले. त्यांनी आता आपण इतर महिलांनाही मतदानासाठी प्रोत्साहित करू, असे म्हटले आहे.
चेंबूरचे महिला सखी केंद्रे रंगीबेरंगी फुले रांगोळी आणि वेगवेगळ्या सजावटीने सजली आहेत. महिलांना मतदानासाठी प्रोत्साहन दिले जात आहे.