मुंबई - अनेक दिवसांपासून सुरु असलेल्या कर्नाटकातील राजकीय नाट्याला अखेरीस पूर्णविराम मिळाला आहे. बहुमत चाचणीत अपयशी झाल्याने कर्नाटकातील कुमारस्वामी यांचे सरकार कोसळले आहे. बहुमत चाचणीत सरकारच्या बाजूने 99 तर विरोधात 105 मते मिळाली. दरम्यान या महत्वाच्या राजकिय घडामोडीवर राज्यातील प्रमुख नेत्यांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.
कर्नाटक हा भाजपच्या सत्ता अट्टाहासाचाव बळी - अशोक चव्हाण (काँग्रेस)
-
कर्नाटकचं INC-JDS सरकार पाडण्यासाठी पहिल्या दिवसापासून BJPची कारस्थानं सुरू होती. सत्ता हवी तर आमचीच, हा एकमेव अट्टाहास त्यामागे होता. त्यासाठी पैशाचा मनमुराद वापर झाला. नैतिकता धाब्यावर बसवली गेली.
— Ashok Chavan (@AshokChavanINC) July 23, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
तूर्तास 'लोटस' जिंकलं असेल. पण लोकशाही हरली, हे दुर्दैव आहे!#KarnatakaTrustVote
">कर्नाटकचं INC-JDS सरकार पाडण्यासाठी पहिल्या दिवसापासून BJPची कारस्थानं सुरू होती. सत्ता हवी तर आमचीच, हा एकमेव अट्टाहास त्यामागे होता. त्यासाठी पैशाचा मनमुराद वापर झाला. नैतिकता धाब्यावर बसवली गेली.
— Ashok Chavan (@AshokChavanINC) July 23, 2019
तूर्तास 'लोटस' जिंकलं असेल. पण लोकशाही हरली, हे दुर्दैव आहे!#KarnatakaTrustVoteकर्नाटकचं INC-JDS सरकार पाडण्यासाठी पहिल्या दिवसापासून BJPची कारस्थानं सुरू होती. सत्ता हवी तर आमचीच, हा एकमेव अट्टाहास त्यामागे होता. त्यासाठी पैशाचा मनमुराद वापर झाला. नैतिकता धाब्यावर बसवली गेली.
— Ashok Chavan (@AshokChavanINC) July 23, 2019
तूर्तास 'लोटस' जिंकलं असेल. पण लोकशाही हरली, हे दुर्दैव आहे!#KarnatakaTrustVote
कर्नाटक मध्ये भाजपकडून लोकशाहीचा खून - नसिम खान (काँग्रेस)
कर्नाटकात लोकशाहीचा विजय झाला आहे, असे भाजपचे कर्नाटकचे नेते येदियुरप्पा यांनी म्हटले आहे. सरकार कोसळल्यानंतर भाजपाने आंनदोत्सव साजरा केला आहे. विधानसभेबाहेर भाजपा कार्यकर्त्यांनी घोषणबाजी सुरू केली. सभागृहात बीएस येदियुरप्पा यांच्यासह भाजपा आमदारांनी जल्लोष केला.