ETV Bharat / city

Rituja Latke : ऋतुजा लटके यांच्या पोटनिवडणुकीच्या उमेदवारीचा आज मुंबई उच्च न्यायालयात फैसला, वाचा, आजपर्यंत काय घडले आहे?

आमदार रमेश लटके ( Ramesh Latke ) यांच्या निधनानंतर अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघात पोट निवडणूक जाहीर झाली आहे. ( Andheri east by poll election) या निवडणूकीत शिवसेनेचे पारडे जड असून लटके यांच्या पत्नीला मतदारांची सहानुभूती मिळण्याची शक्यता वतर्वली जात आहे. ( shiv sena favorite in andheri east bypoll election).

author img

By

Published : Oct 13, 2022, 7:53 AM IST

Rituja Latke
ऋतुजा लटके

मुंबई : अंधेरी पूर्व येथील शिवसेनेचे विद्यमान आमदार रमेश लटके यांचे हृदयविकाराच्या झटक्याने दुबईत निधन झाले. त्यांच्या जाण्याने शिवसेनेत मोठी पोकळी निर्माण झाली आहे. आमदार रमेश लटके (ramesh latke) यांच्या निधनानंतर अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणूक जाहीर झाली आहे. (Andheri east by poll election). या निवडणूकीत शिवसेनेचे पारडे जड असून लटके यांच्या पत्नीला मतदारांची सहानुभूती मिळण्याची शक्यता वतर्वली जात आहे. (shiv sena favorite in andheri east by poll election). मात्र, ऋतुजा लटके या रमेश लटके यांचा मुंबई महापालिकेने राजीनामा स्वीकारला नसल्याने त्यांना निवडणूक लढविताना अडचणी येत आहेत.

यंदाची निवडणूक आगामी निवडणुकांची दिशा ठरवणारी : शिवसेनेचे आमदार रमेश लटके यांनी सलग दोन वेळा विजय संपादन केला. आता या मतदारसंघावर आपली पकड मजबूत करण्यासाठी भाजपच्या वतीने पुन्हा एकदा मुरजी पटेल ( Murji Patel BJP ) यांना तिकीट दिले जाणार आहे. त्यांच्या विरोधात रमेश लटके यांच्या पत्नी ऋतुजा लटके ( Rituja Latke ) शिवसेनेच्यावतीने निवडणूक लढवण्यास उभ्या आहेत. मात्र शिंदे गट आणि भाजपा एकत्र झाल्याने यावेळी शिवसेनेची डोकेदुखी वाढणार आहे. त्यामुळे यंदाची निवडणूक ही अत्यंत अटीतटीची आणि आगामी निवडणुकांची दिशा ठरवणारी असणार आहे.

उद्धव ठाकरे गटापुढे पेच : शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाकडून लटके यांच्या पत्नी ऋतुजा लटके यांना उमेदवारी देण्यात आली आहे. ऋतुजा लटके या मुंबई महापालिकेत अंधेरी येथील के ईस्ट उपायुक्त कार्यालयात प्रशासकीय अधिकारी यांच्या अखत्यारीत नोकरी करत होत्या. त्यांनी महिनाभरापूर्वी नोकरीचा राजीनामा दिला आहे. मात्र पालिकेने ऋतुजा लटके यांचा राजीनामा मंजूर केलेला नाही. लटके यांचा राजीनामा मंजूर होत नाही, तोवर त्यांना निवडणुकीचा उमेदवारी अर्ज भरता येणार नाही. यामुळे लटके यांचा राजीनामा लवकर मंजूर करावा यासाठी उद्धव ठाकरे गटाच्या नेत्यांकडून पालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या भेटी घेतल्या जात आहेत. लटके यांचा राजीनामा मंजूर झाला नाही तर उद्धव ठाकरे गटापुढे मोठा पेच निर्माण होणार आहे.

कायदेशीर बाबींची चाचपणी : ऋतुजा लटके या महापालिकेच्या कर्मचारी आहेत. त्यांनी राजीनामा दिलेला आहे. तो पालिकेने स्वीकारलेला नाही, त्यामुळे त्या अर्ज भरू शकतात की नाही याबाबत पक्षाकडून कायदेशीरबाबी तपासल्या जात आहेत. त्यानंतर याचा निर्णय पक्ष घेईल. लटके यांचा राजीनामा मंजूर करू नये म्हणून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा दबाव पालिकेवर असू शकतो अशी प्रतिक्रिया मुंबईचे माजी माहपौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी दिली आहे.

पालिका नियम काय सांगतो : किमान सेवेची २० वर्षे पूर्ण झालेल्या कर्मचाऱ्यालाच राजीनामा किंवा स्वेच्छानिवृत्तीचा अर्ज करता येतो. हा अर्ज तीन महिन्यांच्या कालावधीत कधीही मंजूर केला जावू शकतो. परंतु तीन महिन्यांमध्ये यावर कोणताही निर्णय न घेतल्यास आणि संबंधित कर्मचाऱ्याला याबाबत न कळवल्यास त्याचा अर्ज मान्य झाला असे गृहीत धरले जाते.

शिंदे गटाकडून दबाव : महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून ऋतुजा लटके यांना घोषित देखील केलं गेले. मात्र ऋतुजा लटके यांना एकनाथ शिंदे यांच्या बाळासाहेबांची शिवसेना पक्षाकडून उमेदवारी देण्याचा प्रयत्न मुख्यमंत्र्यांचा सुरू असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. तसेच ऋतुजा लटके यांना एकनाथ शिंदे गटाकडून उमेदवारी घ्यावी, यासाठी दबाव टाकला जात असल्याचे आरोप शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाकडून केला जातोय.

कोर्टात जाण्याचा इशारा : मुंबईतील अंधेरी पूर्व येथे असलेल्या महानगरपालिकेच्या कार्यालयात ऋतुजा लटके लिपिक म्हणून कार्यरत होत्या. त्यांनी आपला पदाचा राजीनामा रीतसर दिल्यानंतरही पालिका आयुक्त त्यांचा राजीनामा स्वीकारत नाहीत. शुल्लक कारण देऊन केवळ दिवस पुढे ढकलण्याचा काम पालिकेकडून सध्या सुरू आहे. उमेदवारी अर्ज भरण्यासाठी आता या मुद्द्यावर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष कोर्टात जाणार असल्याचा इशारा उद्धव ठाकरे गटाचे नेते अनिल परब यांनी दिला आहे.

राजीनामा अद्यापही मंजूर नाही : मुंबई उच्च न्यायालयाकडून संबंधित BMC ला नोटीस बजावण्याचे निर्देश दिले आहेत. मुंबई महानगरपालिकेने ऋतुजा लटके महापालिकेत परिमंडळ उपायुक्तांच्या कार्यालयात कार्यरत आहेत. ऋतुजा लटके यांनी एक महिना अगोदर दिलेला राजीनामा अद्यापही मंजूर न केल्याने उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. ऋतुजा लटके यांनी त्यांच्या याचिकेत असे म्हटले आहे की, तीन तारखेला राजीनामा देण्यात आला आहे. मात्र, अद्यापही मंजूर करण्यात आलेला नाही. नोटीस स्प्रेडच्या तीस दिवस पूर्ण होत नसल्याचे कारण दिले असल्याने नियमाप्रमाणे एका महिन्याचा पगार देखील जमा करण्यात आला आहे. मला अंधेरी पोट निवडणूक लढवण्याचे इच्छा असल्याने राजीनामा मंजूर करण्यात यावा असे राजीनामा म्हटले आहे. मात्र तरीदेखील अद्यापही राजीनामा मंजूर करण्यात आला नाही. त्यामुळे मुंबई उच्च न्यायालयात धाव घेण्यात आली असल्याचे याचिकेत म्हटले आहे. ऋतुजा लटके यांची बाजू वकील विश्वजित सावंत यांनी मांडली आहे. ठाकरे गटाचे उमेदवार ऋतुजा लटके यांनी या याचिकेवर तातडीने सुनावणी घेण्यात यावी याकरिता खंडपीठासमोर मेंशनिंग दरम्यान मागणी केली होती. 14 ऑक्टोंबर रोजी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख असल्याने आज यावर सुनावणी होणार आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.