ETV Bharat / city

'मुख्यमंत्र्यांवर बंगले, तर त्यांच्या मंत्र्यांवर बायको लपवण्याचा आरोप' - kirit somaiya Slammed Dhananjay Munde

2006 पासून अत्याचार सुरू असल्याचा महिलेने तक्रारीत दावा केला आहे. त्यानंतर या सर्व प्रकरणावर धनंजय मुंडेंनीही फेसबुक पोस्ट करत खुलासा केला आहे.

संपादित
संपादित
author img

By

Published : Jan 13, 2021, 4:12 AM IST

मुंबई- - राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडेंविरोधात एका महिलेने बलात्काराची तक्रार दिली. त्यावरून भाजप नेते किरीट सौमेय्या यांनी ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे. मुख्यमंत्र्यांवर बंगला लपवण्याचा आरोप करण्यात आला. तर दुसरीकडे त्यांच्या मंत्र्यांवर बायको लपवण्याचा आरोप केला जात आहे, अशी टीका सौमेय्या यांनी केली आहे.

सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडेंविरोधात पोलिसांनी तक्रार नोंदवून घेतली नसल्याचे महिलेने ट्विटमध्ये म्हटले होते. धनंजय मुंडे यांच्याविरोधात तरुणीने ओशिवरा पोलीस ठाण्यात 10 जानेवारीला तक्रार केली. याप्रकरणी 11 जानेवारीला रोजी मुंबई पोलिसांकडून अर्ज स्वीकारण्यात आला. 2006 पासून अत्याचार सुरू असल्याचा महिलेने तक्रारीत दावा केला आहे. त्यानंतर या सर्व प्रकरणावर धनंजय मुंडेंनीही फेसबुक पोस्ट करत खुलासा केला आहे.

संबंधित बातमी वाचा-'ब्लॅकमेलिंग'साठी बलात्काराचे खोटे आरोप - धनंजय मुंडे

सामाजिक न्यायमंत्री असलेल्या धनंजय मुंडेंविरोधात हे गंभीर आरोप झाल्याने विरोधकांनीही मुंडेंवर जोरदार हल्लाबोल केला आहे. महाविकास आघाडीवर सातत्याने निशाणा साधणाऱ्या भाजप नेते किरीट सोमय्या यांनीसुद्धा ठाकरे सरकारवर टीका केली आहे. ते म्हणाले की, मुख्यमंत्र्यांवर बंगलो लपवण्याचा आरोप करण्यात आला आहे. तर दुसरीकडे त्यांच्या मंत्र्यांवर बायको लपवण्याचा आरोप केला जात आहे. ठाकरे सरकारची किती दयनीय अवस्था आहे. महाराष्ट्राची संस्कृती काय, इथली अस्मिता काय...या सगळ्यावर पाणी फिरवण्याचे काम ठाकरे सरकार करीत आहे.

हेही वाचा-घोटाळेबाज प्रताप सरनाईकवर महाराष्ट्र सरकार कधी कारवाई करणार?'

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.