ETV Bharat / city

Ketki Chitale Post Case : आक्षेपार्ह पोस्टप्रकरणी अभिनेत्री केतकी चितळे उच्च न्यायालयाचा दिलासा

मराठी अभिनेत्री केतकी चितळे (Marathi Actress Ketki Chitale) हिने राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार त्यांच्या विरोधात अभिनेत्री केतकी चितळे हिने आक्षेपापार्ह पोस्ट केली होती ( Controversial post against Sharad Pawar ). त्यानंतर तिला ठाणे गुन्हे शाखेने ताब्यात घेतले होते. ठाणे न्यायालयाने केतकीला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी ( Ketki in judicial custody for 14 days ) सुनावली होती. आज उच्च न्यायालयाकडून केतकी चितळेला तिच्या विरोधात असलेल्या 21 प्रलंबित एफआयआरमध्ये अंतरिम दिलासा मिळाला आहे. ( Interim Relief in 21 Pending FIR )

Actress Ketki Chitale
अभिनेत्री केतकी चितळे
author img

By

Published : Jun 27, 2022, 9:13 PM IST

Updated : Jun 27, 2022, 10:08 PM IST

मुंबई : मराठी अभिनेत्री केतकी चितळे (Marathi Actress Ketki Chitale) हिने राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार त्यांच्या विरोधात अभिनेत्री केतकी चितळे हिने एक कविता फेसबुकवरून शेअर केली ( Controversial post against Sharad Pawar ) होती. ठाणे न्यायालयाने केतकीला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी ( Ketki in judicial custody for 14 days ) सुनावली होती. अभिनेत्री केतकी चितळे हिला मुंबई उच्च न्यायालयाने तिच्याविरुद्धच्या 21 प्रलंबित एफआयआरमध्ये अंतरिम दिलासा दिला आहे. न्यायमूर्ती नितीन जामदार आणि न्यायमूर्ती बोरकर यांच्या खंडपीठाने अभिनेत्रीवर कोणतीही जबरदस्ती कारवाई करू नये, असे आदेश पोलिसांना दिले आहे.

केतकी चितळे हिच्या वकिलांनी न्यायालयात मांडल्या ह्या बाजू : अभिनेत्रीच्या वकिलांनी न्यायालयाला सांगितले की, त्याच पोस्टवर राज्यभरात 22 एफआयआर दाखल करण्यात आले होते आणि पहिल्या एफआयआरमध्ये अभिनेत्रीला अटक करण्यात आली होती. ज्यामध्ये तिला जामीन मंजूर करण्यात आला आहे. तथापि, उर्वरित 21 प्रकरणांमध्ये जे देखरेख करण्यायोग्य नाहीत तेथे तिच्या अटकेला अंतरिम दिलासा देऊन स्थगिती देण्याची गरज आहे, असा युक्तिवाद केतकी चितळे यांच्या वकिलांनी उच्च न्यायालयात केला.

उच्च न्यायालयाचा दिलासा : खंडपीठाने अभिनेत्याला तात्पुरता दिलासा देण्यापूर्वी मुख्य सरकारी वकील अरुणा पै यांनाही विचारले की ती काही विधान करणार आहे का? मात्र, वरिष्ठ पोलिसांकडून सूचना मिळविण्यासाठी पै यांनी प्रकरण मागे ठेवण्याची विनंती केली आणि त्यानुसार प्रकरण मागे ठेवण्यात आले. आता या प्रकरणात जुलै महिन्यात सुनावणी होणार आहे. केतकी चितळे यांच्या विरोधात केलेल्या 21 प्रलंबित एफआयआरमध्ये उच्च न्यायालयाने अंतरिम दिलासा दिला आहे. तिच्यावर कोणतीही कारवाई करू नये, असे निर्देश पोलिसांना उच्च न्यायालयाने दिले आहेत.

केतकी चितळेला न्यायालयीन कोठडी : त्यानंतर अभिनेत्री केतकी चितळेच्या अडचणीत वाढ होताना रबाळे पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यातदेखील ठाणे सत्र न्यायालयाने ( Thane Sessions Court ) १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. यानंतर केतकीची रवानगी ( Ketki Chitale Controversy ) पुन्हा ठाणे मध्यवर्ती कारागृहात करण्यात आली आहे. शरद पवार यांच्या विरोधात आक्षेपार्ह पोस्ट केल्याप्रकरणी अटक करण्यात आलेली

मी पोस्ट डिलीट करणार नाही केतकीचा युक्तीवाद : केतकीनं कोर्टात युक्तीवाद करताना म्हटले होतं की, ती पोस्ट माझी नाही. ती मी सोशल मीडियातून कॉपी करून पोस्ट केली होती. सोशल मीडियावर आपल्या भावना व्यक्त करणे गुन्हा आहे का? असा सवालदेखील तिने केला होता. केतकीनं सुनावणीदरम्यान वकील घेतला नाही तिने स्वतः कोर्टात युक्तिवाद केला. केतकीने सांगितलं की, मी या पोस्ट मी डिलीट करणार नाही. माझा तो अधिकार आहे, असेही तिने कोर्टासमोर म्हटले होते.

१४ मे ते २२ जून पर्यंतचा केतकी कोठडी प्रवास : केतकी चितळेला १४ मे रोजी कळंबोली येथून ताब्यात घेतले. त्यानंतर पोलीस कोठडी आणि न्यायालयीन कोठडीची प्रवास केतकी चितळेचा सुरु झाला. त्याला २२ जून, २०२२ रोजी ठाणे न्यायालयात जामीन मंजूर झाल्यानंतर फुलस्टॉप लागला. शरद पवार यांच्या विरोधात पोस्ट टाकल्या प्रकरणी कळवा पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्यात केतकी चितळे हिला ठाणे गुन्हे शाखेने अटक केली होती. त्यानंतर आठवड्यापूर्वी केतकीला एक्ट्रोसिटीच्या गुन्ह्यात २५ हजारांच्या जातमुचकल्यावर जामीन मंजूर करण्यात आला. मात्र कळवा पोलीस ठाण्यातील गुन्ह्यात केतकी चितळे न्यायालयीन कोठडीत होती.

केतकी चितळेवर आक्षेपार्ह पोस्टप्रकरणी गुन्हा : केतकी चितळेने फेसबुकवर शरद पवार यांच्याबद्दल आक्षेपार्ह बदनामीकारक आणि मानहानी करणारी पोस्ट लिहिली होती. तसेच, संत तुकाराम महाराज यांच्या नावाचा उल्लेख करून बदनामी केली होती. याचे संतप्त पडसाद राज्यभरात उमटले. सर्वपक्षीय राजकीय नेत्यांनीदेखील याचा निषेध केला होता. त्यानंतर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांच्या तक्रारीवरून राज्यात अनेक ठिकाणी केतकीवर गुन्हे दाखल करण्यात येऊन तिला अटक करण्यात आली. सध्या ती तुरुंगात असून, तिला सुनावण्यात आलेली पोलीस कोठडी आज संपत आहे. अजूनही तिच्यावर गुन्हे दाखल होण्याचे सत्र सुरूच आहे.

केतकीवर आतापर्यंत कुठे गुन्हे दाखल : अंबाजोगाईबरोबरच कळवा पोलिस ठाण्यातदेखील केतकीवर गुन्हा दाखल करण्यात आला. कलम 500, 505(2), 501 आणि 153 A अंतर्गत कळवा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कळवा, पुणे, पिंपरी-चिंचवड, धुळे, सिंधुदुर्ग, अकोला, मुंबईतील गोरेगाव, नाशिक, पवई, पुणे, आमरावती आणि पिंपरी-चिंडवड येथेदेखील केतकी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

हेही वाचा : Sangli suicide case : सांगलीतील 9 जणांची आत्महत्या नव्हे हत्याकांड; दोन मांत्रिकांनी दिलं जेवणातून विष

Last Updated : Jun 27, 2022, 10:08 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.