ETV Bharat / city

कंगनाची बहीण रंगोलीने केली 'मणिकर्णिका' कार्यालयाच्या तोडफोडीची पाहणी - Kangana ranaut news

कंगनाच्या कार्यालयावर बीएमसीकडून करण्यात आलेल्या तोडक कारवाईवरून उच्च न्यायालयात दुसऱ्यांदा सुणावणी होणार आहे. आज कंगनाची बहीण रंगोली पालिकेने तोडफोड केलेल्या मणिकर्णिका कार्यालयात येऊन गेली. रंगोली यांनी कार्यालयात 10 मिनिटे थांबून किती तोडफोड केली याचा अंदाज घेतला. त्याची माहिती दुपारी उच्च न्यायालयात सुनावणी दरम्यान दिली जाणार आहे. सोबत कंगनाचे वकीलही हजर होते.

रंगोली रणौत न्यूज
रंगोली रणौत न्यूज
author img

By

Published : Sep 10, 2020, 1:15 PM IST

Updated : Sep 10, 2020, 1:55 PM IST

मुंबई - अभिनेत्री कंगना रणौत हिच्या कार्यालयावर काल (बुधवार) अनधिकृत बांधकामाविरोधात तोडक कारवाई केली होती. काल(बुधवारी) या ठिकाणी पोहोचल्यानंतर कंगनाने झालेल्या तोडफोडीचे व्हिडिओ ट्विटरवरून शेअर केले होते. आज कंगनाची बहीण रंगोली ही पालिकेने तोडफोड केलेल्या मणिकर्णिका कार्यालयात येऊन गेली.

कंगनाची बहीण रंगोलीने केली 'मणिकर्णिका' कार्यालयाच्या तोडफोडीची पाहणी

आज या तोडक कारवाईवरून न्यायालयात दुसऱ्यांदा सुणावणी होणार आहे. रंगोलीने कार्यालयात 10 मिनिटे थांबून किती तोडफोड केली याचा अंदाज घेतला. त्याची माहिती दुपारी उच्च न्यायालयात सुनावणी दरम्यान दिली जाणार आहे. सोबत कंगनाचे वकीलही हजर होते. दरम्यान, कंगनाने ही कारवाई रोखण्यासाठी वकिलांच्या माध्यमातून मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती. कालच्या सुनावणीदरम्यान न्यायालयाने कारवाईला स्थगिती दिली होती.

कंगनाच्या पाली हिल येथील "मणिकर्णिका" कार्यालयाची पालिका अधिकाऱ्यांनी तपासणी केल्यानंतर रहिवासी घरातच व्यावसायिक कार्यालय बनवल्याचे समोर आले होते. पालिकेने तिला बेकायदेशीर बांधकाम केल्या प्रकरणी मंगळवारी 354 कलमान्वये नोटीस बजावली होती. या नोटीसला कंगनाने 24 तासांत उत्तर दिले नसल्याने नोटीसचा कालावधी संपला आहे. यामुळे पालिकेने तोडक कारवाई सुरू केली आहे. याविरोधात कंगनाने मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आहे.

'कंगनाचे कार्यालय हे कायदेशीर आहे. महापालिकेने केलेली कार्यवाही बेकायदेशीर आहे,' अशी प्रतिक्रिया अभिनेत्री कंगना रणौतचे वकील रिजवान सिद्दीकी यांनी दिली आहे. 'कंगनाच्या घरात कोणत्याही प्रकारचे काम गेली 18 महिने सुरू नव्हते. महापालिका प्रशासनाने दिलेल्या नोटीसीचे चार तासात आम्ही उत्तर दिले. तरीही ही कार्यवाही करण्यात आली. आमच्या खासगी मालमत्तेचे महापालिकेने नुकसान केले,' असे सिद्दीकी म्हणाले. किती नुकसान झाले याची पडताळणी होत असल्याची माहिती कंगनाच्या वकिलांनी दिली आहे.

दरम्यान, शिवसेना आणि कंगना रणौतचा वाद शमण्याची चिन्हे दिसून येत नाहीत. बुधवारी कंगना मुंबईत दाखल होण्यापूर्वी बीएमसीने कारवाई करत तिच्या घराचे अनधिकृत बांधकाम पाडले. त्यानंतर बेताल वक्तव्ये करणाऱ्या कंगनाने मुंबईची तुलना पाकिस्तानशी करत शिवसेनेला बाबरसेनेची उपमा दिली होती. मात्र, ती तेवढ्यावरच थांबली नसून कंगनाने आज शिवसेनेला थेट 'सोनिया सेना' म्हणत पुन्हा टीका केली आहे. यावर आता शिवसेनेकडूनही कंगनाला जोरदार प्रत्युत्तर दिले जाण्याची शक्यता आहे.

Last Updated : Sep 10, 2020, 1:55 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.