ETV Bharat / city

Jitendra Awhad allegations : 'ज्या ताटात जेवलात त्यातच थुंकायचे हे कुठून शिकलात', जितेंद्र आव्हाडांची केसरकरांवर टीका - Balasaheb Thackeray

'ज्या ताटात जेवलात त्यातच थुंकायचे' हे कुठून शिकला आहात. 2014 ला मीच आलो होतो, साहेबांचा निरोप घेऊन. जिथे आहात तिथे सुखी राहा. खाजवून खरूज काढू नका असे उत्तर ट्विटरच्या माध्यमातून जितेंद्र आव्हाड यांनी टीका ( allegations ) केली आहे.

जितेंद्र आव्हाड यांची दीपक केसरकरांवर टीका

author img

By

Published : Jul 14, 2022, 8:44 AM IST

Updated : Jul 14, 2022, 9:05 AM IST

मुंबई - शिवसेना जेव्हा फुटली त्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार ( NCP President Sharad Pawar ) जबाबदार होते, असा आरोप शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी केला आहे. दीपक केसरकर ( Deepak Kesarkar ) यांनी केलेल्या या आरोपावर ( Accusation ) राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड ( Jitendra Awhad ) यांनी प्रतिउत्तर देत 'अहो केसरकर किती बोलता पवार साहबाविरुद्ध, एके काळी साहेबांनी अनेकांना नाराज करत तुम्हाला सिंधुदुर्ग आणि गोव्यात ( GOA ) हाताला धरून फिरवले आहे.

ट्विटरच्या माध्यमातून जितेंद्र आव्हाडांची टीका - 'ज्या ताटात जेवलात त्यातच थुंकायचे' हे कुठून शिकला आहात. 2014 ला मीच आलो होतो, साहेबांचा निरोप घेऊन. जिथे आहात तिथे सुखी राहा. खाजवून खरूज काढू नका असे उत्तर ट्विटरच्या माध्यमातून जितेंद्र आव्हाड यांनी टीका केली आहे.

दीपक केसरकर यांनी शरद पवारांवर हा आरोप केला - एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत बंडखोरी करत पक्षातील चाळीस आमदार आपल्या सोबत नेले. 40 आमदाराने देखील शिवसेना पक्षांसोबत बंडखोरी केली. त्यामुळे पुन्हा एकदा शिवसेना पक्ष फुटीच्या उंबरठ्यावर आहे. यावर बोलताना शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसर म्हणाले की, आतापर्यंत जेवढ्या वेळा शिवसेना फुटली त्यामागे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार होते. खाजगीत बोलताना अनेक वेळा शरद पवार यांनी शिवसेनेच्या फूटी बाबत आपल्याला सांगितल्याचेही दीपक केसरकर यांनी दावा केला आहे. दिल्ली प्रसारमाध्यमांशी बोलताना दीपक केसरकर यांनी शरद पवारांवर हा आरोप केला. तसेच बाळासाहेब ठाकरे हयात असताना शरद पवार यांनी बाळासाहेबांना यातना दिल्या असा आरोप दीपक केसरकर यांनी शरद पवारांवर केला होता.

जितेंद्र आव्हाड यांनी दीपक केसरकर यांच्यावर तिखट शब्दात टिका - शिवसेना पक्षात जेव्हा कधी बंद झाले आणि हा पक्ष फुटला. त्यावेळेस त्याला जबाबदार शरद पवार होते. बाळासाहेब ठाकरे यात असताना त्यांना शरद पवार यांनी यातना दिल्या असा आरोप दीपक केसरकर यांनी शरद पवारांवर केला होता. या आरोपानंतर नंतरच राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी दीपक केसरकर यांच्यावर तिखट शब्दात टिका केली आहे.

शिवसेना खासदार संजय राऊत यांच्याबाबत तीव्र नाराजी - शिवसेनाप्रमुखांच्या विचारांचा हा लढा ( battle of ideas Shiv Sena chief ) आहे, शिवसेनेच्या अस्तित्त्वाचा आहे, मराठी आणि हिंदूत्त्वाच्या अस्मितेचा आहे, हे बंड नाही, हा शिवसेनेच्या आत्मसन्मानाचा लढा असल्याचे त्यांनी पत्रात लिहले आहे. उद्धव ठाकरेनी अमच्या भूमीकेचा विचार करून भाजप सोबत युती करण्याची विनंती त्यांनी या पत्रात केली आहे. शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर ( Shinde group spokesperson Deepak Kesarkar ) यांनी आता भाजप, सेना युतीसाठी पत्र लिहाल ( Letter for BJP, Sena alliance ) आहे. या पत्रातून ही सन्मानाची लढाई असून बंडाची लढाई नाही असे म्हटले आहे. तसेच या पत्रातून शिवसेना खासदार संजय राऊत ( Shiv Sena MP Sanjay Raut ) यांच्या बाबत तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली आहे.

बाळासाहेब ठाकरेंचे शिवसैनिक - गेल्या पाच दिवसांपासून महाराष्ट्राचे राजकारण ढवळून निघाले आहे. शिवसेनेचे 40 पेक्षा अधिक अमदारांनी बंडखोरी करीत गुवाहटी गाठले आहे. त्यावर आता ट्विटर युध्द सुरू झाले आहे. शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यामुळे महाविकास आघाडी सरकार संकटात सापडले आहे. त्यावर दिपक केसकर यांनी एक पत्र ट्विट केले आहे. आम्ही वंदतीय शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंचे शिवसैनिक काही काळासाठी बाहेर काय पडलो तर, घाण ठरलो का असा प्रश्न त्यानी पत्रात उपस्थित केला आहे. आमच्याच भरवशावर राज्यसभेत बसणारे रोज विखारी भाषा बोलता आहेत. आता तर आमच्या मृतदेहांची त्यांना आस लागली लागल्याचे ते पत्रात म्हणाले. अम्ही गुवाहाटीत बसून शिवसेनेचा आवाज बुलंद करण्याचे तेच खरे कारण आहे. तीच या सन्मानाच्या लढाईची पार्श्वभूमी आहे. हे बंड नाही तर ही शिवसेनेच्या आत्मसन्मानाची लढाई असल्याचे केसकर म्हणाले. आजच्या नेतृत्त्वाला हे समजूनही उमजत नाही, हेही आमचे मोठे दुःख आहेच. आज आम्हाला विकले गेलेले ठरविणारे कोण?असा सवाल त्यांनी पक्षप्रमुखांना विचाला.

शिवसेना, भाजपाची युती अतिशय जुनी - आज जी परिस्थिती उद्भवली, त्याची पाळेमुळे जुनी आहेत. शिवसेना, भाजपाची युती अतिशय जुनी आहे. २०१४ मध्ये लोकसभा निवडणूक आम्ही एकत्रित लढलो होतो. त्यामुळे आम्ही विजयी झालो. शिवसेनेची ताकद होतीच, पण सोबतच नरेंद्र मोदी यांचे नेतृत्व तसेच उद्धवजी ठाकरे साहेब यांच्या परिश्रमामुळे शिवसेनेचे १८ खासदार विजयी झाले अल्याची आठवण त्यांनी या प्रत्रात करून दिली. पुढे ते लिहतात की, विधानसभा निवडणूक सुद्धा आम्ही एकत्रित लढविण्याचेच ठरविले होते. त्यावेळी युवानेते आदित्यजी यांनी मिशन १५१+ ची घोषणा केली होती. अशात भाजपाने १४० जागांचा प्रस्ताव दिला होता. मात्र, भाजपाने १२७ जागा घ्यायच्या तसेच शिवसेनेला १४७ जागा द्यायच्या, यावर शिक्कामोर्तब झाले होते. पण, चार जागांचा आग्रह काही सोडण्यात आला नाही. शेवटी जे व्हायला नको, तेच झाले. दीर्घकाळाची युती तुटली त्यामुळे आम्हाला वेगवेगळ्या निवडणुका लढाव्या लागल्याचे त्यांनी नमुद केले आहे.

हेही वाचा - Maharashtra Rain Update : राज्यात जोरदार पावसाचा इशारा, आज 'या' ठिकाणी रेड अलर्ट

Last Updated : Jul 14, 2022, 9:05 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.