मुंबई - राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे आज दुपारी ईडी कार्यालयाला भेट देणार असल्याने शहरात ' मी साहेबांसोबत' या कार्यकर्त्यांनी पुकारलेल्या मोहिमेला राज्यभरातून हजारो कार्यकर्ते उपस्थित राहण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या माध्यमातून राष्ट्रवादीकडून मोठे शक्तिप्रदर्शन केले जाण्याची माहिती आहे.
-
माफ करा साहेब ह्या वेळेस पहिल्यांदा आम्ही तुमचे नाही ऐकणार...
— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) September 26, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
तुमच्या महाराष्ट्र घडवताना च्या वेदना आम्ही बघितल्या आहेत
कर्क रोग
मांडी च्या हाडाचे ऑपरेशन
पायाला झालेली इजा
तरी तुम्ही लढताय
वय वर्ष 79
हे सगळे तुम्ही आमच्या साठी सोसलय
उद्या साठी माफ करा @PawarSpeaks pic.twitter.com/EvBxyZ3zjR
">माफ करा साहेब ह्या वेळेस पहिल्यांदा आम्ही तुमचे नाही ऐकणार...
— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) September 26, 2019
तुमच्या महाराष्ट्र घडवताना च्या वेदना आम्ही बघितल्या आहेत
कर्क रोग
मांडी च्या हाडाचे ऑपरेशन
पायाला झालेली इजा
तरी तुम्ही लढताय
वय वर्ष 79
हे सगळे तुम्ही आमच्या साठी सोसलय
उद्या साठी माफ करा @PawarSpeaks pic.twitter.com/EvBxyZ3zjRमाफ करा साहेब ह्या वेळेस पहिल्यांदा आम्ही तुमचे नाही ऐकणार...
— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) September 26, 2019
तुमच्या महाराष्ट्र घडवताना च्या वेदना आम्ही बघितल्या आहेत
कर्क रोग
मांडी च्या हाडाचे ऑपरेशन
पायाला झालेली इजा
तरी तुम्ही लढताय
वय वर्ष 79
हे सगळे तुम्ही आमच्या साठी सोसलय
उद्या साठी माफ करा @PawarSpeaks pic.twitter.com/EvBxyZ3zjR
दुपारी दोनच्या सुमारास शरद पवार हे बेलोरा येथे असलेल्या ईडी कार्यालयाला स्वेच्छेने भेट देणार असून, या पार्श्वभूमीवर मुंबई आणि राज्यभरातून राष्ट्रवादीचे शेकडो कार्यकर्ते मुंबईत जमा होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. यासाठी राष्ट्रवादीकडून 'मी साहेबांसोबत' अशा नावाच्या हजारो टोप्या वाटण्यात आल्या आहेत. तसेच या आशयाची प्रिंट असलेले टी-शर्ट ही वाटण्यात येणार असल्याचे दिसते.
-
मी जातोय माझ्या विठ्ठलासाठी,
— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) September 26, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
मी जातोय पवार साहेबांसाठी..!! #महाराष्ट्रविधानसभानिवडणूक#सदैव_साहेबांसोबत pic.twitter.com/t7n9l7oPNf
">मी जातोय माझ्या विठ्ठलासाठी,
— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) September 26, 2019
मी जातोय पवार साहेबांसाठी..!! #महाराष्ट्रविधानसभानिवडणूक#सदैव_साहेबांसोबत pic.twitter.com/t7n9l7oPNfमी जातोय माझ्या विठ्ठलासाठी,
— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) September 26, 2019
मी जातोय पवार साहेबांसाठी..!! #महाराष्ट्रविधानसभानिवडणूक#सदैव_साहेबांसोबत pic.twitter.com/t7n9l7oPNf
राष्ट्रवादी विद्यार्थी संघटना तसेच युवक-युवती संघटना, राष्ट्रवादी महिला संघटना यांच्यासह काँग्रेसचे प्रमुख नेतेही या कार्यक्रमात सहभागी होणार असल्याची माहिती आहे.
हेही वाचा शरद पवार आज 'ईडी' कार्यालयात जाणार; कार्यालयाबाहेर जमावबंदी लागू
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी ट्विट करून, उद्या आम्ही हजारोंच्या संख्येने शरद पवार यांच्यासोबत उपस्थित राहणार असल्याचे सांगितले. यासाठी त्यांनी स्पष्टपणे शरद पवार यांनी केलेल्या आव्हानाला, 'माफ करा साहेब, या वेळेस पहिल्यांदा आम्ही तुमचे नाही ऐकणार..' असे ट्वीट केले आहे. यावरून शरद पवार यांसोबत ईडी कार्यालयाबाहेर मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते उपस्थित राहणार असल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत.