ETV Bharat / city

शरद पवार ईडी कार्यालयात जाणार नाहीत; पोलीस आयुक्तांच्या विनंतीनंतर निर्णय मागे - महाराष्ट्र राज्य सहकारी बँक आर्थिक गैरव्यवहार प्रकरण

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आज दक्षिण मुंबईतील ईडी कार्यालयात जाणार असल्याने कार्यालयाबाहेर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात केला आहे. तसेच राष्ट्रवादीचे शेकडो कार्यकर्ते मुंबईत दाखल होत असून, राष्ट्रवादीच्या मुंबई कार्यालयाबाहेर जोरदार निदर्शने करण्यात येत आहेत.

शरद पवार आज ईडी कार्यालयात जाणार असल्याने कार्यालयाबाहेर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
author img

By

Published : Sep 27, 2019, 7:51 AM IST

Updated : Sep 27, 2019, 2:37 PM IST

मुंबई - राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आज दक्षिण मुंबईतील ईडी कार्यालयात जाणार असल्याने कार्यालयाबाहेर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात केला आहे. या परिसरात जमावबंदीचे 144 कलम लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सध्या ईडी कार्यालयाला छावणीचे स्वरूप प्राप्त झाले असून, अनुचित प्रकार टाळण्यासाठी पोलीस प्रशासनाने प्रतिबंधात्मक कारवाई केली आहे.

LIVE : ईडी कार्यालय,मुंबई

* शरद पवार ईडी कार्यलयात जाणार नाहीत; पोलीस आयुक्तांच्या विनंतीनंतर निर्णय मागे

* समाजवादी पक्षाचे नेते अबू आजमी शरद पवार यांच्या बंगल्यावर दाखल

* मुंबई पोलीस आयुक्त संजय बर्वे तसेच कायदा व सुव्यवस्था आयुक्त विनय चौबे हे दोघेही शरद पवार यांना भेटण्यासाठी त्यांच्या घरी पोहोचले

* 'कोणाच्या सांगण्यावरून शरद पवार यांच्यावर गुन्हा दाखल केला', याचा जाब विचारण्यासाठी आम्ही ईडी कार्यालयात जाणार - नवाब मलिक यांची माहिती

* ईडी कार्यालयाकडून शरद पवार यांना नुकताच ई-मेल आला असून, त्यात आपण कार्यालयात येण्याची आवश्यकता नसल्याचे सांगण्यात आले आहे - नवाब मलिक

* थोडयाच वेळात शरद पवार राष्ट्रवादीच्या नेत्यांसोबत ईडीच्या कार्यालयात दाखल होणार

* ईडी कडून शरद पवार याना मेल द्वारे पत्र पाठविण्यात आल्याची सूत्रांची माहिती , 'सध्या शरद पवार यांच्या चौकशीची आम्हाला गरज नाही', 'पुढे सुद्धा चौकशीची गरज लागणार नसल्याचे ईडीच्या पत्रात नमूद करण्यात आले आहे.

* ठाण्यात राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी अटक केली असून, यामध्ये शहराध्यक्ष आनंद परांजपे यांसोबत पदाधिकारी व महिला कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तसेच विरोधी पक्ष नेते मिलिंद पाटील, नगरसेवक सुहास देसाई यांना पोलिसांनी नजरकैदेत ठेवले आहे.

Intro: पवार ईडी कार्यालयात जाणार यापार्श्वभूमीवर ईडी कार्यालय परिसरात 144 कलम व मोठा पोलीस बंदोबस्त

महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेतील आर्थिक गैरव्यवहार प्रकरण सक्तवसुली संचालनालयाने ( ईडी ) आपल्या ताब्यात घेतले असून , ' मनी लॉडरिंग ' प्रतिबंधक कायद्याखाली या प्रकरणाची नोंद केली आहे . यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्या नावाचा समावेश आहे . ' ईडी ' च्या वर्तुळातून मिळालेल्या माहितीनुसार , राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या नावाचा यात समावेश नसला , तरी त्यासंदर्भातील पुष्टीच्या कागदपत्रांमध्ये शरद पवार यांच्या नावाचा उल्लेख आहे.त्यामुळे ईडीने बोलवण्या आधीच शरद पवार आज ईडी नक्की गुन्हा काय आहे यासाठी ऑफिसला जाणार आहेत.त्यासाठी मोठा पोलीस बंदोबस्त व त्या परिसरात 144 कलम लागू केला आहे.

पवारांचा मागे ईडी असे वृत्त अगोदर सर्वत्र होते त्यामुळे कार्यकर्ते आक्रमक झाले होते त्यांनी परवाचा दिवशी ईडीऑफिस येथे गोंधळ घातला. त्यामुळे आज दुपारी 2 वाजता पवार ईडी ऑफिसात जाणार असल्याने , काही घडू नये यासाठी या पार्श्वभूमीवर कायदा-सुव्यवस्थेचा कोणताही प्रश्न उपस्थित होऊ नये. आणि कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलिसांनी ईडी परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त उद्या लावण्यात येणार आहे .तसेच कार्यकर्त्यांनी हिकडे गोंधळ घालू नये म्हणून 144 कलम लागू केले आहे याची अधिकृत माहिती ट्विटर पोलिसांनी दिली आहे.

आज न्यायालयाचा कलम 144 पुढील पोलिस ठाणे परिसरात लागू आहे

कुलाबा पोलीस
कफ परेड
मरीन ड्राईव्ह
आझाद मैदान
डोंगरी
जेजे मार्ग एमआरएस

तसेच मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त देखील लावण्यात येणार आहे. त्यामुळे नियमांचे उल्लंघन करू नये असे पोलिसांकडून आवाहन करण्यात आले आहे.
शरद पवार यांनी देखील ट्विटर वरून कार्यकर्त्यांना शांततेचं आवाहन केलं आहे. तसेच कुणीही ईडी कार्यालयाबाहेर जमा होऊ नये अशी विनंती त्यांनी कार्यकर्त्यांना केली आहे.

Body:।Conclusion:।
Last Updated : Sep 27, 2019, 2:37 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.