मुंबई - कोरोनामुळे बुडालेल्या भारतीय अर्थव्यवस्थेत या वर्षात 10.3 टक्क्यांची घसरण होणार असल्याची माहिती आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने (आयएमएफ) दिली. याच काळात जागतिक अर्थव्यवस्था 4.4% टक्क्यांनी घटणार असल्याचे देखील यामध्ये नमूद करण्यात आले. तसेच आर्थिक वर्ष 2021-22 मध्ये 5.2 टक्क्यांनी अर्थव्यवस्था वाढणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
2021 मध्ये भारतीय अर्थव्यवस्थेची वाढ 8.8 टक्क्यांनी होणार असून ती चीनला मागे टाकत वेगाने वाढणाऱ्या विकसनशील अर्थव्यवस्थेच्या गटात जाईल, असा उल्लेख करण्यात आला आहे. 2021 मध्ये चीनची वाढ 8.2 टक्के होण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
आयएमएफने 'वर्ल्ड इकॉनॉमिक सेन्सरिओ' बाबतच्या ताज्या अहवालात हे अंदाज व्यक्त केले आहेत. आयएमएफ आणि जागतिक बँकेच्या वार्षिक बैठकीपूर्वी हे अहवाल प्रसिद्ध करण्यात आले आहेत. त्यात म्हटले आहे की 2020 मध्ये जागतिक अर्थव्यवस्था 4.4 टक्क्यांनी घसरेल, आणि 2021 मध्ये त्यामध्ये 5.2 टक्क्यांची मजबूत वाढ होईल.
'आयएमएफच्या' या अहवालानुसार अमेरिकेची अर्थव्यवस्था 2020 मध्ये 5.8 टक्क्यांनी खाली येण्याची शक्यता आहे. तर पुढच्या वर्षी ती 3.9 टक्क्यांनी वाढेल.
सन 2020 दरम्यान, जगातील बड्या अर्थव्यवस्थांमध्ये चीन हा एकमेव देश असेल, जो 1.9 टक्के वाढ नोंदवेल. आयएमएफने आपल्या अहवालात म्हटले आहे की, भारताच्या बाबतीत आर्थिक घडामोडींच्या अनुषंगाने केलेले संशोधन हे दुसऱ्या तिमाहीत (एप्रिल ते जून, पहिल्या तिमाहीत भारताच्या वित्तीय वर्षाच्या अनुषंगाने) अंदाजपेक्षा जास्त आहे. कुठेतरी मोठी घसरण झाली आहे.