मुंबई - गेल्या काही वर्षात मुंबईत मुसळधार पाऊस पडून पूरस्थिती, दरडी, इमारत कोसळणे आदी आपत्कालीन घटना ( Flood emergencies in flood ) घडतात. अशा परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी मुंबई महापालिकेची यंत्रणा ( BMC preparation for rain season ) सज्ज झाली आहे. एनडीआरएफसह यावेळी लष्कराच्या तुकड्याही तैनात ठेवण्यात येणार आहेत. पूरस्थिती निर्माण झाल्यास रहिवाशांना तत्काळ स्थलांतरीत करण्यासाठी एनडीआरएफसह ( NDRF team deployed in Mumbai ) आता लष्कराचाही वापर केला जाणार आहे.
एनडीआरएफसह लष्कराच्या तुकड्या सज्ज - मुंबईत मुसळधार पावसांत अनेक ठिकाणी पाणी तुंबून पूरस्थिती ( Mumbai monsoon situation ) निर्माण होते. मुंबईत सखल भागात पाणी साचून अनेक घरांत पाणी भरण्याच्या घटना घडतात. याशिवाय दरडी, जुन्या धोकादायक इमारती कोसळणे तसेच पाणी तुंबून वसाहतीत पाणी शिरत असल्याने आपत्कालीन स्थिती निर्माण होते. रस्ते, रेल्वे परिसर तसेच वसाहतींचा भाग जलमय झाल्यास मुंबई ठप्प होते. अनेकजण धोक्याच्या स्थितीत अडकून पडतात. सखल भागात पाण्याचा निचरा होत नसल्याने तलावाचे स्वरुप निर्माण होते. यासाठी पालिका आपली यंत्रणा सज्ज ठेवते. अग्निशमन दल, जीव रक्षक तसेच एनडीआरएफच्या ( Firefighters lifeguards and NDRF units ) तुकड्याही तैनात असतात.
आवश्यक भासल्यास यंदा सैन्यदलाच्या तुकड्याही सज्ज- यंदा राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद पथकाच्या तुकड्यांत वाढ करण्यात आली आहे. राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद पथकाच्या प्रत्येक तुकडीमध्ये ४५ जवानांचा समावेश आहे. मुंबईत १३५ जवानांचा समावेश असलेल्या तीन तुकड्या सध्या कार्यरत आहेत. यात वाढ केली जाणार आहे. दरडी कोसळण्याची भीती असलेल्या ठिकाणी तुकड्या ठिकाणी तैनात करण्यात येणार आहेत. ही कुमक भांडुप, चेंबूर, गोवंडी विभागांमध्ये स्वतंत्रपणे तैनात असणार आहेत. आवश्यक भासल्यास यंदा सैन्यदलाच्या तुकड्याही सज्ज ठेवल्या जाणार आहेत. त्यामुळे एनडीआरएफ व लष्कराच्या तुकड्या आपत्कालीन स्थितीवर लक्ष ठेवून असतील, अशी माहिती पालिकेच्या अधिकाऱ्यांनी दिली.
२ लाख नागरिकांची तात्पुरती सोय - मुसळधार पावसात पाणी साचते. काहीवेळा पाणी धोक्याची पातळी गाठते. अशा वेळी नागरिकांना सुरक्षित स्थळी स्थलांतरित करण्याची गरज भासते. नागरिकांना सुरक्षित स्थळी स्थलांतरित करता यावे, यासाठी शाळा, शेल्टर, वेल्फेअर सेंटरही उपलब्ध केली जाणार आहेत. यात दोन लाख लोकांची तात्पुरती राहण्याची व्यवस्था असेल अशी माहिती संबंधित अधिकाऱ्याने दिली आहे.