ETV Bharat / city

IMD Alert in Mumbai : मुंबईत वेगवान वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा

author img

By

Published : Jul 15, 2022, 10:32 AM IST

आज मुंबई, उपनगर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यात यलो अलर्ट देण्यात ( Yellow alert for Mumbai ) आला आहे. गेल्या चार ते पाच दिवसांपासून सातत्याने राज्यभरात पडणाऱ्या पावसामुळे आतापर्यंत 99 जणांचे बळी घेतले आहेत. तर जवळपास आठ हजार लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात स्थानिक प्रशासनाला यश आले आहे.

मुंबई पाऊस
मुंबई पाऊस

मुंबई - मुंबईत वेगवान वाऱ्यासह मुसळधार पाऊस पडेल अशी शक्यता हवामान ( IMD alert for Mumbai ) विभागाने वर्तवली आहे. दरम्यान मुंबईत रेल्वे आणि रस्ते वाहतूक सुरळीत असल्याची माहिती पालिकेच्या आपत्कालीन व्यवस्थापन विभागाकडून देण्यात ( Mumbai rain update ) आली आहे. गेल्या चार दिवसापासून मुंबई, ठाणे आणि मुंबई उपनगर येथे परतत असलेल्या जोरदार पावसानंतर आज सकाळपासूनच पावसाने काहीशी विश्रांती घेतली आहे.

इतक्या पावसाची नोंद - मुंबईत काल १४ जुलै सकाळी ८ ते आज १५ जुलै सकाळी ८ या २४ तासात शहर विभागात ३०.२६, पूर्व उपनगरात ४८.९२ तर पश्चिम उपनगरात ५१.३६ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. मुंबईच्या समुद्रात दुपारी १.२२ वाजता ४.८७ तर १६ जुलैला मध्यरात्री १.१९ वाजता ४.३० मीटर उंचीच्या लाटा उसळण्याची शक्यता ( Mumbai rain today ) आहे. या कालावधीत नागरिकांनी समुद्रात जाऊ नये असे आवाहन पालिकेकडून करण्यात आले आहे.

वेगवान वारे वाहणार -मुंबईत मंगळवार, बुधवार आणि गुरुवार हे तीन दिवस पावसाचा ऑरेंज अलर्ट दिला ( orange alert in Mumbai ) आहे. या कालावधीत मुंबईत मुसळधार पाऊस पडेल. तसेच ताशी ४५ ते ५५ किंवा ६५ किलोमीटर वेगाने वारे वाहू शकतात असा इशारा हवामान विभागाने दिला असल्याची माहिती पालिकेच्या आपत्कालीन व्यवस्थापन विभागाने दिली आहे.

या जिल्ह्यात अलर्ट-आज मुंबई, उपनगर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यात यलो अलर्ट देण्यात ( Yellow alert for Thane ) आला आहे. यलो अलर्टनुसार या तीन जिल्ह्यांमध्ये पावसाची रिप रिप कायम राहील. तसेच कमी अधिक प्रमाणात मुसळधार पाऊस होण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे. पावसाने विश्रांती घेतल्यामुळे वाहतूक व्यवस्थाही सुरळीत पाहायला मिळते. मात्र, आज पुणे, सातारा, कोल्हापूर, पालघर जिल्ह्यामध्ये ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला असून, या जिल्ह्यात मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

पावसामुळे आतापर्यंत 99 जणांचे बळी- गेल्या चार ते पाच दिवसांपासून सातत्याने राज्यभरात पडणाऱ्या पावसामुळे आतापर्यंत 99 जणांचे बळी घेतले आहेत. तर जवळपास आठ हजार लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात स्थानिक प्रशासनाला यश आले आहे. राज्यातली पावसाची स्थिती पाहता जिल्हाधिकार्‍यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी परिस्थितीवर लक्ष ठेवण्याचे आदेश दिले आहेत. तसेच जिथे जोरदार पाऊस सुरू आहे किंवा जोरदार पावसाची शक्यता आहे अशा ठिकाणी एनडीआरएफ आणि एसडीआरएफच्या टीम तैनात करण्यात आल्या आहेत.

हेही वाचा-Maharashtra Monsoon update : कोकणासह राज्यामध्ये वाढणार पावसाचा जोर; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.