नवी मुंबई: प्रेमात अडसर ठरणाऱ्या पत्नीचा प्रेयसीच्या मदतीने सुपारी देऊन पतीने खून (Wife killing by paying money) केल्याची घटना उघडकीस आली आहे. पनवेल रेल्वे स्थानकाबाहेर या महिलेच्या गळावर चाकूने सपासप वार करून हत्या (Panvel Railway Station Woman Murder) करण्यात आली होती. यानंतर आरोपी पसार झाले होते. प्रियंका रावत (29) असे मृतक महिलेचे नाव आहे. तिच्या पतीने व त्याच्या प्रेयसीने फेसबूकवर प्रियंकाच्या हत्येची सुपारी दिली होती. (Mumbai Crime). या प्रकरणाचा छडा लावण्यात खान्देश्वर पोलिसांना (Khandeshwar Police Station) यश आले आहे.
पतीने दिली प्रेयसीच्या मदतीने पतीच्या हत्येची सुपारी: पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पनवेल रेल्वे स्थानकाबाहेर ज्या अनोळखी महिलेचा मृतदेह आढळून आला होता तिची ओळख पटली आहे. प्रियंका रावत (29 ) असे या महिलेचे नाव असून या महिलेची गळा चिरून हत्या करण्यात आली होती. या प्रकरणाचा छडा लावण्यात खान्देश्वर पोलिसांना यश आले आहे. पनवेल तालुक्यातील विहीघर येथे राहणारी प्रियंका रावत ही ठाण्याला नोकरीला होती. मृत प्रियांका ही नेहमी ठाणे ते पनवेल प्रवास असा प्रवास करायची. 15 सप्टेंबरला नेहमी प्रमाणे प्रियंका लोकल ट्रेनने पनवेल रेल्वेस्थानकात उतरल्यानंतर रेल्वे स्थानकाच्या बाहेर दबा धरून बसलेल्या तीन मारेकऱ्यांनी प्रियांकाच्या गळ्यावर सपासप वार करून तिची हत्या करून पलायन केले होते.
![अटक करण्यात आलेले हेच ते सुपारी किलर](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/mh-tna-01-husbundgirlfrindwifekilled-mh10052_22092022220823_2209f_1663864703_1071.png)
पोलिसांच्या स्मार्ट शोधतंत्राचा फायदा - या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली होती. पोलिसांनी मृत प्रियांकाच्या पतीचे कॉल रेकॉर्ड तपासले असता मृत प्रियांकाचा पती देवव्रत सिंग (32) व निकिता मटकर (24) या त्याच्या प्रेयसीने फेसबुकवर सुपारी घेणाऱ्या व्यक्तींचा शोध घेतल्याचे आढळले. आरोपींनी त्यांना सुपारी देऊन ही हत्या घडवून आणली असल्याचे स्पष्ट झाले आहे. यात प्रियंकाचा पती, त्याची प्रेयसी व अन्य चार जण अशा सहा जणांना ताब्यात घेण्यात आले आहे.
प्रियांका निकिताशी करत होती भांडण : देवव्रत सिंग आणि निकिता मटकर यांचे अनैतिक संबंध असल्याचे देवव्रत सिंगची पत्नी प्रियांका हिला समजले. तिने निकिता हिला तिच्या पतीपासून कायमची दूर हो असे सांगितले. त्यावरून प्रियांका निकिता हिच्या बरोबर भांडण करत होती. त्यामुळे निकीता व देवव्रत सिंग याने प्रियंकाचा अडसर दूर करण्यासाठी प्रियांकाच्या खुनाची सुपारी देण्याची योजना बनवली.